काही कामासाठी खरगपुरात असल्याने मित्राच्या खोलीवर राहतोय. या मित्राला मेसचे जेवण अज्जिबात आवडत नाही. (मला खूप आवडते असे नाही, पण सहन तरी करु शकतो, पण ते असो!)
आज रविवार असल्याने रुमवरच काहीतरी बनवू असे त्याने आज सकाळी सुचवले. म्हणलं ठिकेय. दुपारी १२च्या सुमारास मित्र भाजी घेऊन आला आणि आमचा स्वयंपाक चालू झाला.
मित्र कन्नडिग असल्याने भात ठरलेलाच. (रुमवर इतर काही करण्यासारखेही नव्हते)
जिन्नसः तांदूळ, घेवडा, १ गाजर, १ कांदा, गरम मसाला, तेल, जिरे, २ मिरच्या, कोथिंबीर
कृती:
सर्व भाज्या धुवुन चिरुन घेतल्या. एका कुकरमध्ये धुतलेले तांदूळ घेऊन सर्व भाज्या टाकल्या. कांदा जरा मोठाच चिरला.