Skip to main content

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 07/11/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
“ते घोर कलियुग का काय म्हणतात ना, त्याची प्रचीती दिली हो तुमच्या साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत. “ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या. “अहो, ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा घाट घातला आहे, म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत. “कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या. “मटातली बातमी वाचली नाही का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी हे म्हटले आहे आणि ह्याचे सत्तापीठ बारामतीत आहे ह्याची चिंता व्यक्त केलीय.”, घारुअण्णा त्याच उद्विग्नतेत . “काय?

पांडेश्वरचे देखणे शिवमंदिर

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 06/11/2012 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे पाहून परत फिरलो ते पांडेश्वरचे असेच शिल्पसमृद्ध मंदिर पाहण्यासाठी. वाटेत मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन करण्यासाठी थांबलो पण महादरवाजाच्याही पुढे आलेली प्रचंड गर्दी पाहून तसेच परत फिरलो. मोरगाव-जेजुरी रस्त्यावर मोरगावपासून ५/६ किमी अंतरावर मावडी गावातून उजवीकडे पांडेश्वरला जाणारा फाटा आहे.

मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है !

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 06/11/2012 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है, खुदा भी अभी तक जिससे अन्जान है. मिटा दी है वक्त ने मासुमियत इस चेहरेसे, आँखे बताती है इरादा, क्या करु मैं, पहलेसे. दिल तो साहब साफ है, पर जिस्म बे-ईमान है मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है, काबिल को अपनी मंजिल पे लेजाने का जो राज है बेकार हम बैठे ह्ये, काम कर रहे अल्फाज है. दिमाग ये जागा है तब जब दिल हुआ बेजान है मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है, तू ही साहिल, तू ही मंजिल, तू ही है ये जिंदगी तू नही तो कुछ नही, ये जिंदगी है बेतुखी तेरे दीदार से समझता हु की मुझमे जान है मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है, हुस्न का ये रंग कभीसे मुझपे क्यु नाराज है ना तेरा साय

मका बटाटा टोस्ट

लेखक neeta यांनी मंगळवार, 06/11/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : चार ब्रेड स्लाईस, उकडलेले बटाटे दोन, उकड्लेले मक्याचे दाणे अर्धीवाटी,१ सिमला मिरची बारीक चिरून, मीठ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, आले लसूण पेस्ट १ चमचा, लिंबाचा रस थोडासा, १ चमचा बटर. एका कढईत थोडेसे बटर घेऊन वितळल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घाला, नंतर त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची , कुस्करलेले बटाटे, उकड्लेले मक्याचे दाणे, मीठ, चिली फ्लेक्स, लिंबू रस घालून थोडे ढवळावे व खाली उतरवावे. मिश्रण गार करावे. ब्रेडचा स्लाईस घेऊन त्याला बटर लावावे त्यावर हे मिश्रण घालावे त्यावर किसलेले चीझ घालावे व दुसरा ब्रेड्चा स्लाईस ठेवावा व टोस्टरमध्ये घालून टोस्ट करावा.

महाराष्ट्राचे मद्यर्षी!

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 06/11/2012 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17093036.cms शिवाजीमहाराजांच्या नंतर जाणता राजा ह्या पदवीवर हक्क सांगणारे आपले अत्यंत लाडके, कर्तृत्ववान, तळागाळातील लोकांचे नेते हे महाराष्ट्राचे मद्यर्षी आहेत असे दिसते आहे. महाराष्ट्राचा मद्यराष्ट्र बनवायची महत्त्वाकांक्षी योजना ह्या राजाने अत्यंत विचारपूर्वक आखली आणि लोकांना, विशेषतः तरूणांना अंमलाखाली आणून अमलात आणली. वाईन अर्थात वारूणी हा एक प्रकारच फळांचा रस आहे अशी रसभरित वर्णने करुन हे पेय लोकांच्या गळी उतरवले जाते असा समाजसेवक डॉ.

प्यार का पहला ख़त - भावानुवाद

लेखक स्पा यांनी मंगळवार, 06/11/2012 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्यार का पहला ख़त लिखने में वक्त तो लगता हे | नए परिंदो को उड़नेमे वक्त तो लगता हे || परमेश्वरा , अरे अनादी अनंत बसला आहेस तिथे .. हजारो , कोटी कोटी रूपे तुझी प्रेमात पडलोय तुझ्या .. किती रुपात पाहू ? कसाही तुला जाणून घ्यायचा प्रयत्न केलास तरी तू अपूर्णच भासतोस रे तुझ्या प्रेमात पडायची हिम्मत केलीये ... जिथे तुकाराम, ज्ञानेश्वर , मीरा , शबरी यांचा कस लागला .. तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा तुझी भक्ती करायची.. कशी.. काय .. काहीच ठावूक नाही रे ..

उडत्या तबकड्यांचे गूढ आणि सैन्य दलातील भोळसटपणा

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 06/11/2012 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
चीनच्या सरहद्दीजवळ उडत्या तबकड्यांचे गूढ आणि सैन्य दलातील भोळसटपणा उडत्या तबकड्या किंवा आकाशात (बातमी नुसार) 3 ते 5 तास तरंगत राहणाऱ्या त्या अज्ञात वस्तू वस्तुतः मानवी मनाचे खेळ असतात. अशा खोट्या वस्तूंचे अस्तित्व भारतीय लष्कराने मान्य करणाऱे रिपोर्ट्स वरिष्ठांना पाठवले ही बातमी वाचून भारतीय सैन्य दलात अजूनही किती अंधश्रद्धा आहेत याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळते. बातमी नुसार संरक्षण खात्यातील वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या संस्थांना देखील 'काय आहे काही सांगता येत नाही' असे म्हणावे लागणे म्हणजे विज्ञानिक दृष्टीला आव्हान आहे.

धन्य ते गायनी कळा..!

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 06/11/2012 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
'गाणं' या गोष्टीशी सर्वांचाच आयुष्यात कधी ना कधी संबध आलेला असतो. पण ‘गायन’ करण्याचा प्रसंग मात्र सर्वांवरच आलेला नसावा. म्हणजे शाळकरी वय किंवा कॉलेजचं ग्यादरिंग वगैरे सोडून. तरीसुद्धा, ‘गायनी गळा’ असो अथवा नसो, ‘गायनी कळा’ मात्र सर्वांनाच आयष्यात केव्हा ना केव्हा हमखास येऊन गेलेल्या असतात. आणि प्रत्येक घराच्या बाथरूमच्या भिंतींना, घरातल्या सर्वांच्या या ‘गायनी कळा’ चांगल्याच परिचित असतात. (आणि काही घरांच्या टॉयलेटच्या भिंतींनासुद्धा ! ) या गायनी कळांनी आणलेल्या गमतीदार प्रसंगांचे काही किस्से. मंगल कार्याला पार्श्वभूमीवर गाणी वाजत ठेवण्याची पद्धत आहे.

कणकेचे लाडू

लेखक Pearl यांनी मंगळवार, 06/11/2012 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझे अत्यंत आवडते लाडू. पोटभरीचे, चविष्ट आणि पौष्टीकसुद्धा. बच्चेकंपनी हे लाडू खाउन खूप खूष होते. साहित्यः १ कप गव्हाचे पीठ, अर्धी वाटी तूप, पाऊण वाटी पिठी साखर, चिमूटभर वेलदोडे पूड, बेदाणे (ऑप्शनल) कृती: १) एका पॅनमध्ये तूप घेऊन ते गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात गव्हाचे पीठ घालून तूपावर परता. २) ५-१० मिनिटं मध्यम गॅसवर गव्हाचे पीठ अधेमधे परतून चांगले भाजून घ्या. ३) गॅस बंद करून त्यात साखर, वेलदोडे पूड घालून चांगले हलवून मिक्स करून घ्या. ४) मिश्रण लाडू वळण्याइतकं कोमटं झालं की लाडू करायला घ्या. प्रत्येक लाडू वळताना त्याला १ बेदाणा लावा.