मोहनथाळ
दिवाळी स्पेशल!!
साहित्यः जाडसर दळलेले बेसन पाव किलो, साजूक तूप पावणे दोन वाट्या, साखर अडीच वाट्या, थोडेसे दुध, अर्धा चमचा वेलची पावडर, बदाम काप सजावटीसाठी, चिमुट्भर केशर अगर केशरी रंग.
क्रुती: प्रथम बेसन एका परातीत घ्यावे. दोन चमचे तूप गरम करून त्यात घालावे. थोडया दुधाचा हबका मारावा. पाच मिनिटे पीठ झाकून ठेवावे. त्यानंतर पाच मिनिटानी रव्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे. कढईत बाकीचे तूप घेवून, त्यात बेसन घालून तांबूस रंगावर भाजून घ्यावे. दुसय्रा पातेल्यात साखर घेऊन त्यात साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करावा.
मिसळपाव