''ब्लॉग माझा''...अभिनंदन आणि शुभेच्छा..!
''ब्लॉग माझा'' या जालिय मराठी अनुदिनी स्पर्धेचा निकाल सालाबादप्रमाणे लागला आहे.
आपले लाडके मिपाकर त्या यादीत असणे अपेक्षित पण सुखावणारे आहे. सोत्रि,नरेंद्र गोळे आणि मुटे काका माहीत आहेत. याशिवाय इतरही अनेक जण मिपाकर असतील.सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा..!
दिसामाजी काही लिहीत जावे' हे ठीक, पण ते काही तितके सोपे नाही, हे आम्ही स्वानुभवाने कधीच ओळखले आहे.
काय लिहायचे जा प्रश्न नसून कसे आणि किती लिहायचे हा खरा प्रश्न असतो. शिवाय वाचणार कोण? हा तर त्याहून मोठा प्रश्न!
मिपावर येण्याचा (आणखी एक) फायदा म्हणजे स्वाक्षरीतून इतरांची मुशाफिरी पण माहीत होते.
मिसळपाव
साहित्य-
२ वाट्या वरीचे तांदूळ, ४ वाट्या आधणाचे पाणी, ३-४ हिरव्या मिरच्या, १ मध्यम बटाटा,पाउण ते १ वाटी दाण्याचे कूट, २ चमचे तूप,जिरे,मीठ,साखर,ओले खोबरे, कोथिंबिर
कृती-
वरीचे तांदूळ कोरडेच तांबूस भाजून घ्या. आचेवरुन खाली काढा.त्यात आधणाचे पाणी घालून साधारण अर्धा ते पाउण तास झाकून ठेवा.आता हे आचेवर ठेवायचे नाहीत.तांदूळ अधून मधून ढवळा.