Skip to main content

जंगलातले चालणे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 07/10/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
(c) pashanbhed
जंगलातले चालणे
दुर रानात रानात शीळ घुमली कानात पाखरांची किलबील पानात पानात उभा बाजूला डोंगर झरा वाहतो समोर पाणी पिण्यासाठी त्यात सोडले कुणी जनावर शिवालय शांत भग्न गुंतले त्यात मन थेंब थेंब पाण्याचा होई अभिषेक अर्पण होती बरोबर शिदोरी झाली तीची न्याहरी दुपारी होईल काहीबाही त्यालाच काळजी सारी एकटेच चालायाचे स्वत:शीच बोलायाचे जंगल मोठे निबिड निघून एकटेच जायचे आला सुर्य माथ्यावर थेंब घामाचे अंगावर पाय
काव्यरस

झटपट पौष्टिक वड्या

लेखक नूतन यांनी रविवार, 07/10/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
vadi साहित्यः ओट्स २ वाट्या पिस्ता, बदाम, खारीक, आक्रोड, शेंगदाणे यांचे जाडसर कूट १ वाटी वेलची पूड १/४ चहाचा चमचा चिरलेला गूळ २ वाट्या पाणी २ चहाचे चमचे साजुक तूप १ चहाचा चमचा पिस्ता बदाम काप सजावटीसाठी कृति १ तव्यावर मंद आचेवर ओट्स हलके

ट्रेन आणि थुंकी

लेखक वडापाव यांनी रविवार, 07/10/2012 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा संपली; दहावी पास झालो. चांगल्या कॉलेजात प्रवेशही मिळाला. आणि ओघानेच ट्रेनने नियमितपणे प्रवास करण्याचे दिवस सुरु झाले. ट्रेनमध्ये गर्दी असते, त्यापेक्षा बस बरी - अशा मताचा मी होतो. पण माझं हे मत, मला लहान असताना आईबरोबर लेडिज कंपार्टमेंटात दरवेळी चढावं लागल्याने तयार झालं होतं, तेव्हा आता ते मत बदलून, जनरल डब्यातला माझा रोजचा प्रवास माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक सुखमय होऊ लागला. कधी जास्त गर्दीतून जावं लागलं, तरी मजा यायची. आणि मग ट्रेनपेक्षा बसचा प्रवासच कितीतरी जास्त क्लेशकारक आहे, अशा मताचा मी झालो. पहिला महिनाभर सेकंडक्लासात घालवला.

द्वंद्व

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 06/10/2012 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
जिव्हाळा आसक्ती द्वंद मनामधे मन झाले मिंधे हतबल कुढत बसणे त्यांचा न स्वभाव उरातला घाव साहतो मी कळे ना मजसी ऐसे कैसे झाले प्रश्नांची वादळे घोंगावती मीही ठरविले नाही रडणार सांडती अपार अश्रू परी सुटता सुटता सुटेना हे कोडे झालो आम्ही वेडे जनांसाठी बुडवली गाथा पुन्हा इंदायणी वाचुनीया कोणी संत झाला....???

फाउलं वायबर कुकन!

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 06/10/2012 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
DSC04308 आमच्या त्सेंटाआजीची मैत्रिण ख्रिस्टिन.. तिच्याकडे गेलेलो असताना तिने हा केक खिलवला.. केकचे नाव आणि रेसिपी विचारल्यावर ती हसायलाच लागली.

राष्ट्रद्रोह - राजजामात राबर्टजींवर राळ

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 05/10/2012 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचे अनभिषिक्त राजघराणे म्हणजे नेहरु गांधी कुटुंब. ह्या कुटुंबाच्या अफाट त्यागामुळेच हा देश बनलेला आहे त्यामुळे त्या कुटुंबात जन्मलेल्या वा त्या कुटुंबाशी नातेसंबंध असणार्‍या तमाम विभूतींकडे लोकांचे बारीक लक्ष असते. मग महाराणी सोनियाजींच्या स्वखर्चाने केलेल्या परदेश वार्‍या असोत वा राजजमाई राबर्टसाहेबांकरता असणारी खास सुरक्षा व्यवस्था असो.

नायगरा आणि शिकागो...

लेखक दीपकशेठ यांनी शुक्रवार, 05/10/2012 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शुद्धलेखन इतके शुद्ध नाही आहे म्हणून क्षमा असावी... पहिल्यांदाच अमेरिकेला येण्याचा योग आला आहे... आणि इथल्या जीवन शैली नुसार एका लांब सुट्टी च्या वेळी नायगारा आणि शिकागो जाण्याचा योग आला त्याचेच वर्णन देत आहे... सर्वात आधी नायगारा ला गेलो... खरच निसर्गचा चमत्कार बघितल्याचा अनुभव आला...(असा बरेचसे ठिकाण बघितल्यावर येतो)...आम्ही अमेरिकेच्या दिशेनेच बघितला बारा का फक्त..(बरेच लोक लगेच विचारतात कॅनडा च्या दिशेने बघितला कि अमेरिकेच्या?? आम्ही तर दोन्ही कडून बघितले आहे बाबा...

घो टा ळा

लेखक विदेश यांनी गुरुवार, 04/10/2012 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
एकजण दुसऱ्याला सांगत होता कंटाळलो आता इतके घोटाळे करून दुसरा म्हणाला कंटाळून कसे चालेल ? आपल्याला देश चालवायचा आहे ना ? पहिला उत्तरला आपली वारस मंडळी आहेत ना तयार , मग कसली काळजी ? दुसरा म्हणाला एका घोटाळ्यातून दुसरा करायचा त्यात नको त्याला अडकवायचं परत त्याची सुटका करण्यासाठी, आपणच धडपड करायची स्वागतासाठी कमानी, ओवाळण्यासाठी पंचारत्या, मोठाले फलक ... हे सगळ सांगायलातरी " आपल्यासारखे आणखी कुणी " नकोत का ? पहिला म्हणाला खर आहे दोस्ता ... असे म्हणून- तो पहिला दुसऱ्याला पुढच्या घोटाळ्यात कधी कसे कुठे अडकवायचे ह्याचा मनातल्या मनात विचार करून आळस झटकू लागला !!! .