Skip to main content

मला भेटलेल्या अफलातून व्यक्ती

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 31/10/2012 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी ३ वर्षापूर्वी कतार ला असताना आमच्या ग्रुप मध्ये राजू मिरचंदानी म्हणून एक टेक्निशियन होता ,वय वर्षे फक्त ६३ ! अतिशय जॉली आणि हसतमुख .अगदी अनोळखी असणाऱ्या व्यक्तीशीही त्याच्या तासनतास गप्पा चालत . इजिप्शियन , फिलिपिनो , थायलंडी , पाकिस्तानी, कतारी, अमेरिकन ,ब्रिटीश कोणीही असो ! ऑफिसर ,म्यानेजर , असो कि झाडूवाला असो ,राजू म्हटलं की सगळ्यांना माहित ! हा राजू मुळचा सिंधी ! फाळणीनंतर वडील मुंबईला स्थाईक झाले . मग राजूचा जन्म .सुमारे १९५० चा ,राजूने इलेक्ट्रीशियन चे शिक्षण घेवून मुंबईत छोट्या-मोठ्या कंपनीत जॉब केले . १९७८ ला सर्वप्रथम कतार ला आलां , लग्न झाले ,पण बायको मुंबईतच!

चक्रव्यूहात अडकलेले प्रकाश झा

लेखक आळश्यांचा राजा यांनी बुधवार, 31/10/2012 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिनेमाच्या हाताळणीऐवजी त्यातील कथानक/ माहिती या सामग्रीवर लिहीत आहे. त्या अर्थाने ही चित्रपटाची समीक्षा नसावी. प्रकाश झा यांनी काही चांगले चित्रपट अलीकडे दिलेले आहेत. मला आवडलेले म्हणजे अपहरण, गंगाजल. व्यवस्थेचे बर्‍यापैकी ज्ञान त्यात दिसले होते. पोलीस इन्स्पेक्टर रँकच्या अधिकार्‍यांना आयजी रँकचे गणवेश चढवणार्‍या आणि पोलीस कमिशनर या पदाच्या अधिकार्‍यांना हास्यास्पद पद्धतीने रंगवणार्‍या हिंदी सिनेसृष्टीकडून फारशा अपेक्षा कधीच नव्हत्या. काही अपवाद आहेत, त्यात झा आहेत असे वाटत असतानाच हा चक्रव्यूह नावाचा वैचारीक गोंधळ बघण्यात आला.

शुक्रतारा ....मंदवारा ... नाबाद ५० वर्षे

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 31/10/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रतारा मंदवारा या गाण्याला जन्मून ५० वर्षे झाली. आज ही हे गीत आजच्या तरूण पिढीत लोकप्रिय आहे. आणि आठवण म्हणून म्हातार्‍या-कोतार्‍यातही. एक समर्थ भावगीत गायक म्हणून या गीताने अरूण दाते ( खरे अरविन्द दाते ) याना ओळख मिळवून दिली.सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने. त्यावेळी आकाशवाणी मुंब्ई केंद्रावर जे लोक नोकरीस होते त्यांची सांस्कृतिक चंगळच होती. नीलम प्रभू.

दु:ख झाले पाखरू

लेखक जयवी यांनी बुधवार, 31/10/2012 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या वेदनेला पंख हसरे लाभले दु:ख झाले पाखरू अन नाचू गाऊ लागले भिरभिरीची पाखराच्या सवय होऊ लागली वेदनेच्या जाणिवेची गरज भासू लागली दूर झाले मग सुखाच्या पाश सारे तोडले जीव जडला वेदनेवर दु:ख मिरवू लागले. भेटते जेव्हा नव्याने वेदनेला त्या जुन्या जाग येते जीवनाच्या मैफिलीला मग सुन्या जयश्री

घरटी एक गॅसजोड

लेखक बाळ सप्रे यांनी बुधवार, 31/10/2012 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन सरकारी नियमानुसार एकाच पत्त्यावर एकापेक्षा अधिक जोड असल्यास ते अवैध ठरतील. अधिक गॅसजोड परत न केल्यास पहिला जोडदेखिल ब्लॉक केला जाईल. गॅस गीझरधारकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. आंघोळीचे पाणी गॅसवर तापवले काय आणि गॅसगीझर मध्ये तापवले काय गॅसचा वापर तेवढाच होणार. आणि हा घरगुती वापरच आहे ज्यावर सरकारी सवलत आहे. खरंतर वीजेचा प्रश्न त्याहून गंभीर असल्याने खरंतर गॅस वापराला प्रोत्साहन द्यायला हवे. पण तो वेगळा विषय आहे.. सध्या यावर उपाय काय? सरकारी सवलत न वापरता जास्त दराने (पण कायदेशीर) सिलेन्डर मिळण्याचा विकल्प अस्तित्वात आहे का?

मनास वाटे -

लेखक विदेश यांनी बुधवार, 31/10/2012 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
. . मनास वाटे उगाच वाटे उदास वाटे भकास वाटे मनात वारे उगाच सारे भलते सारे गोळा सारे मनात काय उगाच काय भलते काय वाटते काय मनास नाही उमगत काही भलते प्रवाही वहातच राही ! .
काव्यरस

पाठशिवण!

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 31/10/2012 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
सांजेला तसा वेळ होता. अजुन शिवारात लगबग जाणवत होती. आताशा पाहुणा म्हणुन आलेल्या मला, माझ नेहमीच ठिकाण......मोटवन खुणावत होती. तस तिच माझ नात फार वर्षांच. आजोळी आईचा पदर धरुन येउ लागल्यापासुनच माझ्या आजोबांनीच पहिला हिची ओळख करुन दिली होती अन, शाळा कॉलेज संपवुन आलेल्या माझ्या गद्धेपंचवीशीला निवांतपणासाठी हिची ओढ होती. नेहमीसारख मी मोटवनीवरुन विहिरीत डोकावुन पाहिल. काळशाऽऽर पाणी खोलवर डुचमळत होत. क्षणभर भारल्यासारख झाल..... आजुबाजुचे आवाज विरले..... "थंड आहे पाणी ते!", मी दचकलो. मला माहितही नाही आणि माझ्याशेजारी एक निटस नवयौवना उभी! नाही म्हंटल तरी जरा मोहरलो... "खाली

रख्स-ए-बिस्मिल (DANCE OF A WOUNDED)

लेखक हरवलेल्या जहाजाचा कप्तान यांनी बुधवार, 31/10/2012 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
या शहरात, इंद्रियांची भूमिका विस्तारते क्षणोक्षणी. देह शिणत नाही. पण, जीव शिणतो नेमाने. इथेही आहेत वारुळांचे चक्रव्युह, सनातन वेदनांचे अमानुष पर्याय, गिधाडं-प्रेतांच्या बेगुमान वस्त्या, सावलीला दिवस आणि करुणेला रात्र. इथे काळोखाच्या ओठांतून, बर्फाळ प्रार्थनाही वाहत जातात, अवरोधाच्या उगमाकडे. भळाभळा अस्तित्व सांडत गर्दी जगत रहाते, होकार नकारांमध्ये अडकलेल्या ऐतिहासिक आवृत्त्या... इथल्या किंकाळीतच, नग्न आत्म्याचा देह वस्रांसकट जन्म घेतो. भयमग्न आवेगात देह नग्न होतो. आत्मा वस्र घेतो... या गर्दीतच माझाही चेहरा असतो हुबेहूब. सुरा घेतलेले तरुण आणि फुलं माळलेल्या बायकांमध्ये. आणि मी असतो, काळोख ज
काव्यरस