ऐलोमा पैलोमा गणेश देवा.
ऐलोमा पैलोमा गणेश देवा.
परवा गाडीत माझी आई, आणि माझा अडीच वर्षाचा भाचा होता. बरोबरचे भरपूर समान बाजूच्या सीटवर ठेवून त्या दोघांना मागे बसू दिले. थोड्या वेळाने गडी गाऊ लागला. आधी शाळेत शिकवलेल्या "पोएम्स" झाल्या. मग गाडी घसरली "शिवाजी अमुचा राणा" वर . हे ऐकून मी चकित. पूर्ण गाणे त्याला म्हणता येत होते. मधेच अडले तर शेजारी आजी होतीच. त्याला विचारले "कोणी शिकवले तुला हे?"
"माज्या आईला येतं हे गाणं, तिला खूप खूप गाणी येतात."
"हुशारच आहे तुझी आई. अजून काय शिकवले तुझ्या आईने?"
"जिलेबीचे गाणे, कारल्याचे गाणे, लाडूचे गाणे आणि शिवाजीचे" (आम्ही सारे खवय्ये!
मिसळपाव
वाघजाई देवी - घनगड
