Skip to main content

हुकुमाचा एक्का टाकण्यात आलेला आहे. कसाबला फाशी?

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 21/11/2012 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
गुजराथ निवडणुका, महागाई, सत्ताधा-यांवर सतत होणारे अपहाराचे आरोप, देशांतर्गत वाढता विरोध, मा.बाळासाहेबांचे अंत्यविधीचे वेळी उसळलेला जनसागर इत्यादी गोष्टीपासुन लक्ष वळवण्यासाठी हुकुमाचा एक्का काढण्यात आलेला आहे. वरिल अनेक मुद्यांप्रमाणे अजून एक मुद्दा वारंवार उपस्थीत केला जातो. तो म्हणजे "अफजल गुरू" आणि "कसाब" यांची फाशी. अफजल गुरूची फाशी अजून होत नाही कारण सत्ताधारी आघाडितील घटकपक्षाचा असलेला विरोध.

मलाला ( परकीय प्रसारमाध्यमांचा बळी )

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी बुधवार, 21/11/2012 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक गोष्ट कळत नाही आपण प्रसार माध्यमांच्या एवढे अधीन का आहोत. मलाला विषयी परकीय प्रसारमाध्यमांनी वृत्त जगभर प्रसिद्ध केले. आणि अचानक भारतीयांना ती अन्यायाचे विरोध करणारे एक प्रतिक दिसली ( काही दिवसांपूर्वी त्यांना आण्णा हजारे आणि केजारीवाल सुद्धा वाटायचे ) सोशल मिडिया वर तिच्यासाठी इंग्रजी व मराठीतून प्रेम उतू जाऊ लागले. मला तिचे कौतुक वाटते , मात्र प्रसार माध्यम आपल्याला सांगतील ती पूर्व दिशा समजून त्यांच्या पाठी खुळ्यासारखे वाहत जाणे कितपत योग्य आहे. मात्र ह्या प्रसारमाध्यमांनी नाण्याची एक बाजू मांडली आहे.

सलाम!

लेखक विकास यांनी मंगळवार, 20/11/2012 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात भाउबीजेच्या मागे-पुढे जेंव्हा बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल शेवटची काळजी वाटणे चालू झाले तेंव्हा (केवळ माध्यमात वाचल्यावरूनच, जास्त कल्पना नाही) थोडेफार बंदसदृश प्रकाराचे केलेले समर्थन आणि काल-परवा पालघरला घडलेला प्रसंग सोडल्यास जे काही शिस्तीत पार पडले ती काही सामान्य बाब नव्हती. आता हे सर्वशृत झाले आहे की मुंबईच्या इतिहासात लोकमान्य टिळकांच्या नंतर सार्वजनिक ठिकाणि अंत्यसंस्कार झालेले बाळासाहेब हे दुसरे व्यक्तीमत्व ठरले.

लग्न

लेखक अविनाश लोंढे. यांनी मंगळवार, 20/11/2012 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एका जीवाभावाच्या मित्राचा फोन आला... " का बे ..कुठ असतोस ..mobile काय ............. हा बोल ..मी बकिचा सगळ न बोलता लवकरच आटोपतो... मी लग्न करतोय..७/१२ लक्शात ठेव..... "काय????????????" स्तब्ध होउन मी त्याला विचरल.." कोनाचा नशिब फोड्तोय...?" "आहे..गावाजवळची च आहे...तो थोडा हसुन न ओरडून बोलला....( मध्ये दोघामधे ३-४ शीव्या देउन झाल्या..हे वेगळ....) बस.....फोन ठेवला...अन त्याची college love story डोळ्यासमोरुन भिर भिर करु लगली.... तिला बारमतीला तिचा नकलि भाऊ म्हनुन जाण......! hotel मध्ये तीला lunch देण.... ! तिच्या मैत्रिनिसोबत मि वेगळ्या table वरती बसन ...त्याना privacy देण...!

निसर्ग दत्त महाराज

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 20/11/2012 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
. निसर्ग दत्त महाराज नवा विचार.... नवी दृष्टी . *म्हणजे याचा नेमका अर्थ असा का?????????? *हातामध्ये सोनचाफ्याचे फुल जरूर घ्या पण त्याचा वास घेवू नका .... असेच ना ???? *असे असावे का? कि ..वास घ्या..आनंद अनुभवा....आणि पुढे चला... सारखा वास घेत बसू नका..... *आनंद अनुभवा....आणि पुढे चला...>>>> नुसते एव्हडे नाही चालणार तर त्यामागे धावू नका , विरक्त व्हा ! *निसर्ग महाराज नवा विचार.... नवी दृष्टी .. -जय हो............

यक्कू क्रूरसिंग..

लेखक गवि यांनी मंगळवार, 20/11/2012 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
यकुविषयी ती घाणेरडी बातमी इथूनतिथून पहिल्यांदा कानावर आली तेव्हापासून सुरुवातीला डिनायलमधे जाणं पसंत केलं. नंतर वर्तमानपत्राची लिंक आणि त्यातला स्पष्ट उल्लेख.. आणि सगळीकडून येणारी कन्फर्मेशन्स यामुळे एकदम लटपटायलाच होत होतं. आता लिहिण्याइतपत बाहेर आलोय असंच नव्हे, पण लिहायला बसलो की आपण शब्दांशी खेळतो. मॅन्युप्युलेट करतो. या बिलंदरपणामुळे आपण लिहीता लिहीता, आकर्षक शब्दरचना करता करता सावरत सावरत आपल्या रोजच्या स्थिरस्थावर जगण्याकडे येतो. त्यामुळे या लिहिण्याच्या मार्गे तरी विचारसाखळीतून बाहेर येता येईल या आशेने लिहीतोय.

दु:खाला गालबोट!

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 20/11/2012 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
बाळासाहेब ठाकरे गेले हे अत्यंत वाईट झाले पण त्यानिमित्त जो बंद पुकारला गेला त्याविरुद्ध एका तरुणीने फेसबुकवर सौम्यसा निषेध व्यक्त केला आणि तिच्या एका मैत्रिणीने ते लाईक करुन आपले समर्थन व्यक्त केले तर पोलिसांनी दोघींना तात्काळ अटक केली. समाजातील विविध घटकात तेढ निर्माण करणे असला काहीसा आरोप होता. माझ्या मते हे अतिरेकी आहे. जबरदस्तीने बंद लादला तर निषेध व्यक्तही करायचा नाही हा जुलूम आहे. ही लोकशाही नसून मोगलाई आहे. खुद्द ठाकर्‍यांना असली जोरजबरदस्ती आवडली नसती असे मला वाटते. एखाद्याच्या बंदविरोधी मतावर इतकी टोकाची भूमिका घेणे हे व्यक्तीप्रेमाचे स्तोम वाटते.

नाविन्याची साद

लेखक जयवी यांनी मंगळवार, 20/11/2012 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
सुटला पहाट वारा अंतरात सळसळ मन सुगंधी सुगंधी पसरला दरवळ नको स्वप्नातून जाग नको जाग इतक्यात नीज हलके हलके पुन्हा आली पापण्यात कसा मुजोर हा वारा रेंगाळला खिडकीशी पावा मंजुळ मंजुळ जणु कृष्णाचा कानाशी मन सैरभैर झाले वेडावले, खुळावले कृष्ण रंगाने रंगाने चिंब चिंब भिजवले रेशमाच्या सोनसरी आला सोबती घेऊन ओला पाऊस पाऊस ढगातून उतरून सतरंगी झाले नभ धरा पाचूने नटली ऊन कोवळे कोवळे पसरली गोड लाली आज सृष्टी देते हाळी ऐक नाविन्याची साद सुख दारात दारात दे तयाला प्रतिसाद. जयश्री

यकु

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 19/11/2012 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
यकु गेला. इथल्या अनेकांशी बोलून, भांडून, मनात येईल ते येईल तेव्हा बेधडक सांगून. मैत्री करून. पंगे घेऊन. शाब्दिक हाणामार्‍या करून. म्हणतात तसं, एक तर आपण त्याचे मित्र झालो, किंवा शत्रू; पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. यकु गेला. अनेक अर्धवट गोष्टी मागे ठेवून. अनेक प्रश्न घालून. एका अत्यंत बुद्धीमान माणसाचं हे असं का व्हावं हे त्यातलं सगळ्यात मोठा प्रश्न. अखेरीस त्याच्या मनात काय होत होतं हे आता नीटसं कधीच कळायचं नाही. त्याचे अलीकडचे विचार ऐकून, त्याच्याशी बोलताना नेहमीच याचा हा असा काहीतरी शेवट असेल हेच वाटत राहायचं.