Skip to main content

मराठी गुलामगिरी

लेखक पोप्य्लोन यांनी सोमवार, 29/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आता मराठी माणसांना गुलामगिरी शिवाय पर्यायच नाही . कारण आता मराठी मुले एजिनिअर आणि डाक्टर सुद्धा बनणार नाहित . देशात एकच परीक्षा असणार आहे , उत्तर भारतीय मुले सार्वजनिक कॉपी करुन महाराष्ट च्या उत्तम कॉलेजात प्रवेश मिलवितिल आणि आपल्या मुलांसाठी फक्त कारकूनाच्या नोकरया असतील . सीबीएसई अभ्यासक्रम हा उत्तर भारतीयांसाठीच बनविला गेलेला आहे . तसेच हिंदी मधून सुद्धा परीक्षा देता येते . हिन्दि मधुन लिहलेले पेपर हिन्दि लोकच तपासनार, I.A.S च्या परीक्षेत मराठी मुले पास होत नाहीत याला कारण हेच आहे .आता मराठी मुले मराठी मधुन परीक्षा देवुन I.A.S आणि I.P.S अधिकारी होताना दिसत आहेत .आता म्हने मराठीतुन लिहिलेले पेपर ENGLISH मध्ये भाशान्तर करुन तपासनार . मग आतापर्यन्त हिन्दि मधुन लिहलेले पेपर ENGLISH मध्ये भाशान्तर करुन का तपासले नाहित ? देश भर एकाच परीक्षेचे गाजर दाखवून मराठी माणसांना गुलाम करण्याची ही चाल आहे .कपिल सिब्बल ची ही चाल आहे. महाराष्ट्रात चांगली कॉलेजे आहेत , ती मराठी जनतेच्या पैशांतून निर्माण झालेली आहेत. उत्तर.भारतातील राजकारणी लोकांनी पैशाचा भ्रष्टाचार करुन, पैसा खाल्ला .त्या राज्यांना मागासलेले ठेवले . . दक्षिण भारतातील राज्यानी आपली बाजू बलवान केलेली आहे. .त्यांची भाषा येत नसेल तर कोणीच तिथे जावू शकत नाही . तसेच ते साधा पत्ता ही बाहेरच्या लोकांना सांगत नाहित तर शिक्षणाची गोष्ट फार पुढची आहे . आपण हिंदी स्वीकारुन आपल्या पायावर कुर्हाड़ मारून घेतली आहेच.आज आपणच आपल्या भूमीत गुलाम झालो आहोत.व्यापार गुज्ररात्याकदे , होथल शेत्त्याकदे ,ब्यान्क साउथ इन्दियन कदे , आपल्यकदे काय फक्त गुलामगिरी. साध इंग्लिश न येणारे आईपीएस ATS पोलिस अधिकारी आपण सर्वांनी टी.वि वर पाहिले असतीलच .हे उत्तर.भारतातील I.A.S आणि I.P.S अधिकारी दक्षिण भारतातील राज्यात जात नाहित , कारण तेथे त्याना काम करता येत नाही . त्या कारणाने केंद्र सरकारला दक्षिण भारतियाना परीक्षेत पास करावच लागते .पोलिस चौकशी साठी सुद्धा सीबीआई अधिकारी लोकांना स्था निक भाषा यावी लागते मग गुन्हेगारांना शब्दात हे उत्तर.भारतातील I.A.S आणि I.P.S अधिकारी पकड़णार कसे ? राजिव गांधींच्या खुनाच्या पोलिस चौकशी दरम्यान हां अनुभव आला आहे. . महाराष्ट सरकारचा एकमेव परीक्षेत सामिल होण्याचा निर्णय हा आत्मघातकी व महाराष्ट्राला गुलाम बनविण्यासाठी आहे .हा निर्णय महाराष्ट्रातील उत्तर प्रदेशीय सनदी अधिकारि लोबिने घेवुन सरकारच्या माथी मारलेला आहे . याला सर्वत्र विरोध व्हायला हवा ..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4637
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

तसेच हिंदी मधून सुद्धा परीक्षा देता येते . हिन्दि मधुन लिहलेले पेपर हिन्दि लोकच तपासनार, I.A.S च्या परीक्षेत मराठी मुले पास होत नाहीत याला कारण हेच आहे
मराठी मुलांनी हिदीतूनच पेपर द्यावेत अशी कोणतीही सक्ती नाही.आणि हिंदीतूनच काय तर मराठी (फॉर दॅट मॅटर कोणत्याही भारतीय भायेते)) यु.पी.एस.सी परीक्षा देता येते. भूषण गगराणी सगळे पेपर मराठीतून देऊनच आय.ए.एस झाले. मराठी मुले यु.पी.एस.सी मध्ये मागे आहेत याला वेगळी कारणे आहेत (पहिल्यापासून महाराष्ट्रात खाजगी नोकरी इतर प्रदेशांपेक्षा जास्त असल्याने सरकारी नोकरीला उत्तर भारतात जे ग्लॅमर आहे ते महाराष्ट्रात नसंए, अगदी स्वातंत्र्यलढ्यापासून उत्तर भारतात जास्त राजकीय वातावरण असल्याने आपसुकच तिथे अशा प्रकारची नोकरी कराविशी वाटणे इत्यादी). त्याला उगीच यु.पी.एस.सी चा महाराष्ट्रावर आकस वगैरे वेगळे फाटे फोडू नका.
महाराष्ट्रात चांगली कॉलेजे आहेत , ती मराठी जनतेच्या पैशांतून निर्माण झालेली आहेत.
काय सांगता? महाराष्ट्रात कोणती चांगली कॉलेजे आहेत? इंजिनिअरींगमध्ये आय.आय.टी आणि नागपुरची एन.आय.टी केंद्र सरकारने स्थापन केलेली, व्ही.जे.टी.आय आणि सी.ओ.ई.पी इंग्रज काळातील, मेडिकल कॉलेजांमध्ये मुंबईतील आघाडीचे के.ई.एम पण ब्रिटिश काळातील, पुण्यातील फर्ग्युसन इंग्रज काळातील, मुंबईतील शासकीय लॉ कॉलेज पण इंग्रज काळातील....... अशी पराभूत मनोवृत्ती असलेले लेख वाचले की अगदी संतापच येतो. काय करणार जाऊ दे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

पुण्यातील फर्ग्युसन इंग्रज काळातील वाह फर्ग्युसन इंग्रजानी काढले का? :) स्वातंत्र्यलढ्यापासून उत्तर भारतात जास्त राजकीय वातावरण असल्याने आपसुकच तिथे अशा प्रकारची नोकरी कराविशी वाटणे इत्यादी). भयंकर विनोदी वाक्य. हहपुवा. राजकीय वातावरण म्हणजे काय बरे? आणि तसे राजकीय वातावरण मग महाराष्ट्रात नव्हते का? :) लेखातील भावनांशी सहमत आहेच. लॉबिंग वगैरे सगळे चालत असतेच. या सरकारी निर्णयाचा कडाडून विरोध केलाच पाहीजे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

वाह फर्ग्युसन इंग्रजानी काढले का?
खरं म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत कॉलेजांच्या यादीत फर्ग्युसनचा समावेश करायलाच नको.आय.आय.टी/ के.ई.एम, व्ही.जे.टी.आय यांच्या तुलनेत फर्ग्युसन कुठेच येणार नाही. त्यापेक्षा गोखले इन्स्टिट्यूट (मराठी माणसांनी काढलेली) चा समावेश अधिक योग्य ठरेल.

वाह फर्ग्युसन इंग्रजानी काढले का?
हो फर्ग्युसन इंग्रजांनी काढले नाही आणि मराठी माणसांनीच काढले हे मान्य.पण वर उल्लेख केलेली इतर कॉलेजे मराठी माणसांनी काढली नाहीत ना? त्याचे काय?
भयंकर विनोदी वाक्य. हहपुवा.
जरूर हसा.

व्वा.. एकदम फऽतकन टाकल्यात की विचार-लेंड्या..
हिन्दि मधुन लिहलेले पेपर हिन्दि लोकच तपासनार, I.A.S च्या परीक्षेत मराठी मुले पास होत नाहीत याला कारण हेच आहे .आता मराठी मुले मराठी मधुन परीक्षा देवुन I.A.S आणि I.P.S अधिकारी होताना दिसत आहेत .
लॉजिक अजिबात कळले नाही, असल्यास.. पु.व. आधी बोललेत त्याप्रमाणे महाराष्ट्रात खाजगी नोकर्‍यांच्या संधी जास्त असल्याने स्पर्धापरीक्षांकडे कल कमी असतो लोकांना. तरी मागील १०-१५ वर्षांत स्पर्धापरीक्षांमधे यशस्वी मराठी युवक/युवतींची यादी लक्षणीय आहे..
साध इंग्लिश न येणारे आईपीएस ATS पोलिस अधिकारी आपण सर्वांनी टी.वि वर पाहिले असतीलच.
तुम्हाला खरेच काही वैचारीक भुमिका / माहिती आहे, का उगाच भकलताय? भारतात काम करायला इंग्रजीची गुलामगिरी का हवी? की इंग्रजी न येणारे सगळे अकार्यक्षम असतात? बाकी, इंग्रजीचा पेपर पास झाल्याशिवाय बाकीचे पेपर्स तपासत नाहीत युपीएससी मध्ये, हे आपल्या माहितीकरीता.. अनेक वर्षांपासून कुठल्यातरी तथाकथित आय ए एस अधिकार्‍याचा "काऊ" वरचा प्रचंड फनी निबंध नेटवर फिरतोय, असं ऐकतोय, पण कुणीच लिंक देऊ शकला नाहीय. असो..
हे उत्तर.भारतातील I.A.S आणि I.P.S अधिकारी दक्षिण भारतातील राज्यात जात नाहित , कारण तेथे त्याना काम करता येत नाही . त्या कारणाने केंद्र सरकारला दक्षिण भारतियाना परीक्षेत पास करावच लागते .पोलिस चौकशी साठी सुद्धा सीबीआई अधिकारी लोकांना स्था निक भाषा यावी लागते मग गुन्हेगारांना शब्दात हे उत्तर.भारतातील I.A.S आणि I.P.S अधिकारी पकड़णार कसे ?
राजा रे.. २००९ च्या बॅच पर्यंत कोण कुठे जाईल, ह्यावर चयनित अधिकार्‍याचे कुठलेही नियंत्रण नव्हते.. त्यानंतर "प्रिफरन्स सिस्टम" सुरु झाली. त्यामुळे वरील विधान अत्यंत मुर्खपणाचे आहे. तसेच प्रत्येक IAS/IPS अधिकार्‍याला तो/ती ज्या राज्यात कार्यरत असेल त्या राज्याची भाषा शिकायलाच लागते, व त्या भाषेच्या परीक्षेमध्ये उत्तिर्णही व्हावे लागते. त्याशिवाय "इन्क्रीमेंट्स" हुकतात, मालक.. तेव्हा किबोर्ड बडवायच्या आधी थोडा विचार करा. तुमची जळजळ समजण्यासारखी आहे, पण म्हणून कायपण बोलाल का राव..

एकदम 'मनसे' लिहिलंय ;) ह.घ्या.

आधीच धनदांडगे उत्तर भारतीय (दिल्लीकर, पंजाबी वगैरे, बिहारी नव्हे) विद्यार्थी, कमी मार्क असून, कुवत नसून सुद्धा मराठी एजंटाना पैसे चारून प्रवेश मिळवतातच... आता तर काय कुरण मोकळंचे.. असो, चालावयायचेच!!!!

नोकरी हीच गुलामगिरी आहे असे का नाही मानत ? व्यवसाय करा, श्रीमंत व्हा. कोणी अडवलंय ?

ऑनवा रे कोणितरि ...

महाराष्ट्रातील किती खाजगी कंपनी मध्ये मराठी माणुस मोठ्या पदावर आहे याची यादी द्यावी .आणि ही पदे I.A.S.च्या तोडिची आहेत का ? मुंबई तील १२००चौ फुटाच्या वरील सदनिके च्या मालकांची यादी काढा .तसेच मोटर गाडी च्या मालकांची यादी काढा.आणि मराठी माणसांना मोजा ,म्हणजे खाजगी कंपनी मध्ये नोकरी मिलाल यामुले मुले I.A.S.कड़े जात नाहित यातील फोलपना कलेल . ही अफूची गोली मराठी द्वेषी लोकांनी पसरविली आहे आणि आपण त्यात चारी मुंडयाचित झालो आहोत .दक्षिण 'भारतीय आणि पंजाब्यानी commitee of डायरेक्टर्स भरलेली आ हेत . सर्वात जास्त पगार घेणार्या corporates यादी पहा आणि मराठी माणुस शोधा .प्रत्येक corporate मराठी माणसासाठी शंभर तामिल ,पंजाबी .तेलगु माणसाँची नावे देवू शकतो .मराठी समाज वेगाने नामशेष होन्याकडे चालला आहे .नव्या शिवरायांची गरज आहे

In reply to by पोप्य्लोन

प्रत्येक corporate मराठी माणसासाठी शंभर तामिल ,पंजाबी .तेलगु माणसाँची नावे देवू शकतो
तुझ्या आवडीची कंपनी निवड आणि यादी दे. बघुया. चंदिगढ,कोईम्बतुरमधली सहकारी बँक नाही निवडायची. देशभर जाळे आहे अशी कंपनी निवड.

In reply to by पोप्य्लोन

यादी: लार्सन अ‍ॅन्ड ट्युब्रो: अनील नाईक, यशवंत देवस्थळी हिंदुस्तान युनीलीव्हरः नितीन परांजपे आयडिया सेल्युलरः प्रकाश परांजपे आदित्य बिर्ला ग्रुप: अजित रानडे किर्लोस्कर ग्रुपः संजय किर्लोसकर बोईंग इंडिया: केसकर आय-फ्लेक्स (आता ओरॅकलने विकत घेतले): दिपक घैसास विप्रोचे गिरीश परांजपे दोन वर्षापूर्वीपर्यंत आणि हो अमेरिकेतही आपल्या नावाचा ठसा उमटविणारे: विक्रम पंडित आणि टिबकोचे रणदिवे. इत्यादी इत्यादी
,म्हणजे खाजगी कंपनी मध्ये नोकरी मिलाल यामुले मुले I.A.S.कड़े जात नाहित यातील फोलपना कलेल .
मराठी मुलांनी आय.ए.एस ची परिक्षा देऊ नये असा कोणताही नियम नाही. मराठी मुले उत्तर भारतीय मुलामुलींप्रमाणे आय.ए.एस का करू बघत नाहीत याचे महाराष्ट्रात खाजगी नोकरी जास्त असणे हे एक कारण आहे.तरीही कोणाला आय.ए.एस करायचे असेल तर कसलीही आडकाठी नाही.जर आय.ए.एस करायची मुळातच इच्छा महाराष्ट्रात कमी असेल तर त्याचे खापर इतरांवर फोडू नका ही विनंती.
मराठी समाज वेगाने नामशेष होन्याकडे चालला आहे
खरं की काय?१०-१५ वर्षांपूर्वी कॉम्प्युटरच्या प्रसारामुळे मराठी भाषेचा वापर हळूहळू कमी होईल आणि त्यातूनच मराठी समाज नामशेष होईल अशी भिती मी स्वतः ऑफिसात ऐकली आहे. पण कुठचे काय.मिसळपावसारख्या साईटींमुळे मी दहावी झाल्यानंतर अनेक वर्षात जितके मराठी लिहिले नसेल तितके गेल्या एका वर्षात लिहिले आहे. काही मराठी समाज नामशेष वगैरे होत नाही उगीच पराभूत मनोवृत्ती नको.
.नव्या शिवरायांची गरज आहे
हे वाक्य मला वाटते अगदी शंभूराजे गादीवर आल्यापासून अब्जावधी वेळा कोणीना कोणी कधीनाकधी उच्चारले असेल.नव्या शिवरायांच्या पोस्टची व्हेकन्सी कायमचीच आहे आपल्याकडे. कालाय तम्सै नमः :)

अरे, ह्यांना अवरा...
.त्यांची भाषा येत नसेल तर कोणीच तिथे जावू शकत नाही .
मी चेन्नॆत तमिळ भाषा न येताहि आलो आहे आणि एका अधिकाराच्या पदावर काम करतो आहे आणि विषेश म्हणजे मी चक्क मराठीही आहे. :-) -(मराठी नोकरपेशा गुलाम)सोकाजी

ह्याच लॉजिकने परदेशातील लोकांनी मराठी/भारतीय लोकांविरुद्ध बोंबा ठोकायच्या का !? कणेकरांच्या एका लेखात त्यांनी अमेरीकेत मराठी लोकांना "अरे, परवा न्यु जर्सीत चक्क एक अमेरीकन माणूस बघितला म्हणे.." असा जोक करतांना ऐकल्याचं लिहीलंय, म्हणून म्हटलं..

काही लोक anxiety attack आल्यावर लेख काथ्याकुट टाकतात असं वाटतं नेहमी

जरा एक सांगा तुम्ही आधीही मिपावर होतात का ? कारण हे टोपणनाव असलेले एक जण आहेत मिपावर तुम्ही पुन्हा अवतरीत झालात का ?

लेख्ह अवद्ला .. चान चान...... वाक्डं बोल्नार्यांकडं लक्स देउ नये.. हस्तिल त्यन्चे दात दिस्तिल... तुम्चे लेख्ह चान अस्तात

मला राष्ट्रीय स्तरावर एकच परीक्षा आणि एकच अ‍ॅडमिशन प्रोसेस असण्यामागचे लॉजिकच कळत नाही. राज्यातल्या कॉलेजांच्या अ‍ॅडमिशन जर राज्यपातळीवरच्या परिक्षांमधून करायच्या नसतील तर राज्यपातळीवरचे बोर्डही रद्द करावेत. हलकट सरकार त्याही विचारात आहे परंतु त्याचा कडाडून विरोध झालाच पाहीजे.