Skip to main content

"ह्या बेहोशितचं जगणं असतं"

लेखक रसायन यांनी सोमवार, 19/11/2012 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांनंतर मी, पुन्हा तुझ्यासाठीच लिहिणार आहे माझ्याच नकळत मी आज तुझ्याशी बोलणार आहे तु कोण आहेस?कशी आहेस?...माहित नाही ह्यां शबदांत तुला पाहण्याचा प्रयत्न मी करणार आहे असशील तु हसरी,थोडी लाजरी स्वप्नांमध्ये रमणारी असशील तु ही माझ्यासारखीच भावविश्वात जगणारी तुझ्याशी भेट होईल की नाही..? हे मलासुद्धा ठाऊक नाही ह्या मनःपटलावरचे चित्र पुसता पुसल्या जात नाही तुला आठवुण तुझ्यावर लिहिणं हेच तर कवितेचं कारण असतं ! खरं सांगु, तु नसताना तुला अनुभवणं "ह्या बेहोशितचं जगणं असतं"

स्वातंत्र्याची सकाळ

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 19/11/2012 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
भोवताली सर्वत्र अंधार आहे,सगळीकडे त्याचाच संचार आहे कोण कुणाच रक्त पितोय,कुणी आपलेच खिसे भरतोय ज्याला काही जमत नाही तो मात्र हताशपणे बघतोय पण त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे? कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे.................. अंदाधुंदी माजली आहे,जो तो मनाला येईल तसे वागतोय स्वतः बरबटलेला आहे पण दुसऱ्याच्या शुद्धतेचा पुरावा मागतोय यातून पुढे काय साध्य होणार आहे? कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे.................. एकेकाळी सोन्याचा धूर होता,आज दारिद्र्याचा पूर आहे बासष्ट वर्षे झाली तरी लक्ष्य अजून खूपच दूर आहे ज्या दिशेला धावतोय ती बरोबर का चूक ते कसे कळणार आहे? कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे.......

राम लड्डू (दिल्ली चाट)

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 19/11/2012 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
. राम लड्डू साहित्यः ५-६ तास भिजवलेली १ वाटी पिवळी मुगाची डाळ ५-६ तास भिजवलेली १/२ वाटी चणा डाळ १ बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथींबीर चवीनुसार मीठ . पुदीना चटणी साहित्यः मुठभर कोथींबीर मुठभर पुदीना १ बारीक

नवयुगाची नार

लेखक बरखा यांनी सोमवार, 19/11/2012 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
नवयुगाची नार पुजिले कोणी मला देवता मानुनी भोगिले कोणी मल दासी समजुनी ब॑ड करता स्वतासाठी ठेविले डा॑बुनी कर्तुत्वास बेड्या घातल्या कधी कुलटा ठरवुनी अपेक्शील्या ईच्छा किती त्यागमुर्ति समजुनी कितीदा तरी मेले जगताना मनातुनी १ उभी उ॑बरठ्यावर नवशतकाच्या आठवणी मनी या गत काळाच्या झगड्ले विरोधात मी पर॑परेच्या सोसल्या,साहिल्या यातना दु:खाच्या सा॑गु किती कहाण्या मी माझ्या त्यागाच्या जाणिवल्या नाही तरी वेदना जखमेच्या २ अनेक रुपा॑नी मी झाले समर्पित स॑साराचा कणा पण मान नाही घरात यशाचे सारे धनी,अपयश माझ्या पदरात का? कोणासाठी?

सहकारातून सम्राटाकडे

लेखक अमितसांगली यांनी सोमवार, 19/11/2012 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
३००० रुपयांचे मृगजळ व किमान २७०० रुपयांचा पहिला हप्ता या वाटेकडे आस लागलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेवटी २५०० रुपयांची गाजरे खाण्याची वेळ आली आहे. उस हंगाम सुरु झाला कि शेट्टी व साखरसम्राट यांच्यातील कलगीतुरा सर्वांनाच अंगवळणी पडलाय. दोन-तीन जाहीर सभा, एक-दोन ठिकाणी रास्तारोको, उस अडविणे, टायरमधील हवा सोडणे व नंतर तडजोड हि पारंपारिक चौकट सोडून अनपेक्षित रीतीने यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

मंगला

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 19/11/2012 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
मंगला “अग तू बस आता बाहेर. इथली आवरा आवरी जवळ जवळ झालीच आहे. मंगलला बाकीचे सांगून मीही येते. मग बसू निवांत गप्पा मारीत.” पूजाने विशाखाला म्हटले. कालच तिची नणंद विशाखा, विनयसोबत दोन-तिन दिवसासाठी आले होते. दुपारची जेवणे नुकतीच आटोपली होती. चिपळूणमधले ऐन हिवाळ्यातले दिवस. बाहेर हिरवळीवर उन्हं खात बसण्यात वेगळीच मजा येणार होती. हॉलमधे पुष्कर आणि विनयच्या जुन्या आठवणी रंगात आलेल्या होत्या. विशाखाला बाहेर पाठवून पूजाने निरीनिपटी केली. मंगलाला ओटा स्वच्छ करायला सांगून पूजा हॉलमधे आली. थोडा वेळ गप्पांमधे मस्त गेला. “बाहेर उन्हात बसायचे कां?” पूजाने विचारले.

बघा उत्तर देता येते कां ?

लेखक शरद यांनी सोमवार, 19/11/2012 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही मजेदार कोडी आमचे मित्र प्रा. यनावाला यांच्या तर्कक्रीडा या कोड्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. पण माझ्यासारख्या तर्कशास्त्रात "ढ" असणार्‍या लोकांना त्यातले ओ की ठो काही कळत नसे. उदा. बारा नाण्यात एक नाणे निराळे आहे. कमी की जास्त वजन हेही ठाऊक नाही. फक्त तिनदा काट्याचा उपयोग करून निराळे नाणे ओळखा. आमची मजल ते हलके (किंवा जड) आहे हे माहीत असेल तर उत्तर काढण्यापर्यंतचीच. आणि नंतर त्यांनी उत्तर सांगितले तेही आमच्या डोक्यावरून गेले. ते जाऊ द्या. माझी कोडी सोपी आहेत. अगदी शाळकरी म्हणालात तरी चालेल. पण नम्र विनंती की तुमचे उत्तर द्याच. वर कोणाशी सहमत असाल तर +१ म्हणा, पण प्रतिसाद द्याच. कां ?

हायकू -

लेखक विदेश यांनी सोमवार, 19/11/2012 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
१. उत्साही माळी मोसम पावसाळी रोपटी चूप .. २. झाडाचे पान गळते अवसान पाला पसार .. ३. मेघ नभात बरसात ढंगात मोर रंगात .. .
काव्यरस

... देवाशी भांडण !

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 19/11/2012 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
ओ माय गॉड अर्थात देवाशी भांडण एवढ्यातच 'ओह माय गॉड' पाहीला. मिसळीवरही खूप चर्चा झालेला हा चित्रपट आहे. एकाने त्याची गोष्ट मांडली आहे तर दुसर्‍याने त्या चित्रपटाच्या विषयावर लिखाण केले आहे. चर्चेला विषय मिळवून देणारा हा चित्रपट आहे हे नक्की. वरकरणी हा चित्रपट काही वेगळ्या विषयाला हात घालणारा, भाष्य करणारा वाटत असला तरी हा विषय नवा नाही. चावून चोथा झालेला हा विषय आहे त्यामुळे पिळून काढलेल्या चिपाडातून रस काढण्याचा हा प्रयत्न वाटतो. टिळेमाळा, ढोंग, बकध्यान, बुवाबाजी हे शब्द भाषेत अस्तित्वात येऊन कित्येक वर्षे होऊन गेली आहेत. विमलदांच्या 'परख' सारख्या चित्रपटातदेखील थोड्या प्रमाणात हा विषय