सर्व मासेषु च उत्तम - कार्तिकाचे कौतुक
|| वनस्पतीनाम् तुलसी, मासानाम् कार्तिकः प्रियः ||
|| एकादशी तिथी नाम च क्षेत्रम् द्वारका मम ||
स्कंद पुराणातल्या या श्लोकात श्रीकृष्णाच्या प्रिय गोष्टींमध्ये ज्याचं नाव येतं तो सर्व महिन्यांत श्रेष्ठ असलेला महिना म्हणजे कार्तिक महिना. या महिन्यात श्रीविष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण, विठ्ठल, शिवशंभू या देवांच्या विविध प्रकारे उपासना करतात. दिवाळी, तुळशीचं लग्न, दीपोत्सव, वैकुण्ठ चतुर्दशी (शैव-वैष्णवांनी परस्परांच्या दैवतांना प्रणिपात करण्याचा दिवस), त्रिपुरारी पौर्णिमा हे दिवस कार्तिकात साजरे होतात. कार्तिक स्नानाचेही अपार महत्त्व आहे.
तू म्हणजे,,
तू म्हणजे अशी नशा
ग्लास इतका फ़ुल्ल भरलेला,
की ग्लास सुद्धा होई शराब !!!
तू म्हणजे अशी हट्टी की ;
आधीच घाट रस्ता
आणि त्यात पुन्हा गाडी खराब !!!
तू म्हणजे वैशाख वणव्यात
वळवाचा पाऊस !!
तू म्हणजे कुडकुडत्या थंडीत
आईस्क्रीम खायची हौस !!!
तू म्हणजे काळे ढग
आणि नाचणारा मोर
तू म्हणजे हळूच चिमटा
काढणारं खोडकर पोर
तू म्हणजे अस्सं प्रेम आईचं तान्ह्यावरती
तू म्हणजे असा राग बापाचा पोरावरती
तू म्हणजे वाफ़ाळलेली कॉफ़ी
आणि हवासुध्दा अशी धुंद
तू म्हणजे पावसची पहिली सर,
आणि सुटलेला मातीचा गंध….
तू म्हणजे कागदी नाव,
आणि इवलासा पाण्याचा ओहोळ,
तू म्हणजे माझ्या डॊळ्यातलं पाणी
आणि असंख्य आठवणींचा मोहोळ !!
कधी
मनकर्णिका
तिचे नाव मनकर्णिका. साताऱ्याची. अस्सल कऱ्हाडे ब्राह्मण घर. आज तिचा वाढदिवस. 19 नोव्हे. वय २९ - तेही एका युवतीचे - फार नव्हे. फारतर वय २९ असेल. म्हणजे तरुणाईच्या वसंताचा बहर. आज तिची मला आठवण येते. बहुदा दरच वर्षी. तिच्या आठवणीने उभारी येते. रक्त सळसळून उठते.उत्साह संचारतो. विषेत: मी खिन्न असतो तेव्हा.
पाटेश्वरचा गूढरम्य लेणीसमूह
वास्तविक ५० फक्त यांनी पूर्वीच येथे पाटेश्वरच्या अद्भूत लेणीसमूहाबद्दल लिहिलेले असल्याने पुन्हा त्यावर लिहायचा तसा विचार नव्हताच पण त्याबद्दलच जरा वेगळे काही लिहिता आले तर बघावे या उद्देशाने पाटेश्वरावर चार शब्द खरडायला बसलो.
तर मी, ५० फक्त, विलासराव, किसनदेव, पिंगू आणि नाद खुळा असे ६ जण पुणे- सातारा-देगाव अशी मजल मारून एक पाटेश्वरला पोचलो. पावसाळ्याचे दिवस असल्याने सगळीकडे हिरवेगार वातावरण होते. पाटेश्वराच्या मुख्य मंदिरापाही जायला दीड दोन किमी पायी चालावे लागते.
सेन्टी- मेन्टी : बांधावर ....बांधातीरी....
डॅड म्हणतात, आयुष्य जगणं म्हणजे बासरी वाजविण्यासारख आहे, एका बाजुने मुख-रध्रांतून शेवटचा श्वास असेपर्यंत ते फुकायचेच असते आणि दुसर्या बाजुला स्वर-रध्रांची उघड-झाप करावी लागते, ही स्वर-रध्रं म्हणजे मनाची कवाडे आहेत, जर सगळी सताड ऊघडी सोडशील किंवा सगळी बंद करशील तर त्यातुन निर्माण होणार संगीत एकसूरी असेल.
कंट्री क्लब चिकन
कोंबडी मसाला(मालवणी पद्दत)
साहित्यः-एक किलो चिकन्(मी गावठी घेतली होती)
तीन मोठे बारीक चिरलेले कांदे.
एक मोठी वाटी लसूण.
अर्धी वाटी चिरलेले आलं.
मीठ.
दोन चमचे हळद.
एक वाटी मालवणी मसाला.(तिखट आपल्या आवडीनुसार)
एक चमचा धणे.
५-६ लवंग.
८-१० काळी मिरी.
एक मध्यम उभा चिरलेला कांदा.
तेल.
बारीक चिरलेली कोथिंबीर.
अर्धी नारळाची वाटी खोबरे खवलेले.
कृती :-प्रथम आले-लसूण यांची पेस्ट करून घ्यावी.चिकन धुवून त्याला वाटलेली पेस्ट व हळद घालून अर्धा तास मॅरिनेट
करत ठेवावे.भांड्यात ते
सपाट डोंगर व टेकडीफोड
'पुढून डोंगर साजरे' याप्रमाणे सातारा-पुणे या महामार्गावर डोंगर, टेकड्यांचे लचके तोडून ते भुईसपाट करण्याचे काम खुलेआम सुरु आहे. डोंगरमाथ्याचे सपाटीकरण करून विक्रीसाठी भूखंड पाडणे, बंगले, मोठ्या इमारती उभारणे, निसर्ग-खनिजाची चोरी करणे असले उद्योग बेदरकारपणे केले जात आहेत. त्या अनुषंगाने काही प्रश्नांची माहिती हवी होती.
१. डोंगर किंवा टेकड्या या खाजगी मालकीच्या असतात कि सरकारी?
२. जर खाजगी मालकीच्या असतील तर त्यांचे उत्खनन करण्यासाठी सरकारची आवश्यकता असते का?
३. डोंगर सरंक्षणासाठी कोणता कायदा अस्तिवात आहे का? डोंगर सरंक्षण हे वन सरंक्षण कायद्याअंतर्गत येते का?
४.
झटपट ढोकळा.
साहित्यः-एक वाटी चण्याचे पीठ्.(बेसन)
पाऊण वाटी पाणी.
५-६ लसूण पकळ्या.
४-५ हिरव्या मिरच्या(तिखट असल्यास कमी घेतल्या तरी चालतील)
एक बोटाचे पेर आलं.
अर्धा चमचा सायट्रीक अॅसिड.
एक सॅशे इनो फ्रुटसॉल्ट.
मीठ.
एक चमचा साखर.
चार चमचे तेल.
मोहरी व तेल फोडणीसाठी.
ओल्या खोबर्याचा चव व चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी.
कृती :-प्रथम लसूण,आलं व हिरव्या मिरच्या यांची पेस्ट करून घेणे.एका मोठ्या भांड्यात बेसन घेऊन त्यात वाटलेली प
मिसळपाव