Skip to main content

कोंबडी मसाला(मालवणी पद्दत)

लेखक ज्योति प्रकाश यांनी सोमवार, 26/11/2012 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-एक किलो चिकन्(मी गावठी घेतली होती) तीन मोठे बारीक चिरलेले कांदे. एक मोठी वाटी लसूण. अर्धी वाटी चिरलेले आलं. मीठ. दोन चमचे हळद. एक वाटी मालवणी मसाला.(तिखट आपल्या आवडीनुसार) एक चमचा धणे. ५-६ लवंग. ८-१० काळी मिरी. एक मध्यम उभा चिरलेला कांदा. तेल. बारीक चिरलेली कोथिंबीर. अर्धी नारळाची वाटी खोबरे खवलेले. कृती :-प्रथम आले-लसूण यांची पेस्ट करून घ्यावी.चिकन धुवून त्याला वाटलेली पेस्ट व हळद घालून अर्धा तास मॅरिनेट करत ठेवावे.भांड्यात तेल घालून तापले की त्यात बारीक चिरलेला कांदाघालून मऊ होईपर्यंत परतावा. नंतर त्यात मॅरिनेट केलेले चिकन घालावे.त्यातच मालवणी मसाला घालून चांगले परतावे.पाणी घालून चांगले शिजू द्यावे.कढईत थोडे तेल घलून त्यात प्रथम धणे,लवंग्व मिरी परतून घ्यावे त्यातच उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा.नंतर त्यात खवलेले खोबरे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे.हे सर्व मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे. चिकन शिजले की त्यात हा वाटलेला खोबर्याचा मसाला घालावा.पाहिजे तेव्हडे पातळ करून चांगली उकळी येऊ द्यावी.त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.सर्व्ह करतांना वरून सजावटीसाठी थोडी कोथिंबीर घालावी. चपाती,ब्रेड किंवा भाकरी बरोबर खायला द्यावे.

वाचने 10443
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

एकदम जबरदस्त असेल यात शंकाच नाही पण...... एक सांगा एक वाटी लसुण ... ठीक आहे अर्धी वाटी आलं ....आलं अर्धी वाटी ??????????

देवा मी मालवणी घरात का नाही जन्मलो म्हणजे तारुण्यात प्रवेश करेपर्यंत ह्या उदर भरणाच्या मालवणी स्वर्गीय सुखाला मला मुकावे लागले नसते.

अप्रतिम दिसतयं चिकनः)

चिकन अनेक प्रकारे करता येते. तुमची पध्दत आवडली. जनरली तयार केलेला कुठल्याही रश्याच्या चिकनला दुसर्‍या दिवशी आणखीनच चव येते-उरल्यास.

बाई ग! प्रत्येकवेळी प्रतिसाद द्यायला आले की गेल्यासारख होउन रहातय त्या इरसालरावांमुळे. पण आज अजिबात वर न बघता टंकते. लय भारी. करुन पाहेन अन कळवेन.

मस्त दिसतासा चिकन. एकदम साग्रसंगीत मसाले-वाटण-घाटणासकट!