Skip to main content

सवा डॉलर चढाऊंगी (एक आध्यात्मिक दृष्टीकोन)

लेखक सूड यांनी मंगळवार, 13/11/2012 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सहज गाणं ऐकत ऐकत मला अचानक हा दृष्टांत झाला की ही लावणी नव्हेच!! ही तर एका ईश्वराच्या प्रेमात पडलेल्या कन्यकेने त्या ईश्वराला केलेली आळवणीच !! गाण्याची सुरुवात ऐकताच आपल्याला कन्यकेच्या आध्यात्मिक विचारांची जाणिव व्हायला लागते. गाण्याची सुरुवात काहीशी अशी आहे. हिंदी फिल्मों में देखा जीवन का सारा लेखा। पेडों के आगे बच्चन पेडों के पिछे रेखा॥ वरच्या ओळींमध्ये क्न्यकेला नव्वदच्या दशकात प्रसारीत होणारी रामायण ही मालिका अभिप्रेत आहे. 'हिंदी सिरीयलों मे देखा' हे मीटर मध्ये बसणार नाही म्हणून फिल्मों मे हा शब्द वापरला आहे. तर कन्यका म्हणते, या हिंदी रामायण मालिकेत जीवनाचं सारं सार आहे.

कोफ्ता करि....उपासाची

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 13/11/2012 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
Tayar Kofte Kofta Curry नमस्कार मंडळी, सर्वांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. हि दिवाळि सगळ्यांच्या सगळ्या ईच्छा / आकांक्षा सुफळ सपुर्ण करो. तर इतके दिवस मीपाचा नीयमीत वाचक होतो आणि इथे प्रकाशित होण्यार्या सर्व गोष्टींचा मनापासुन आनंद घेत होतो आणि राहिन.

झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो..................

लेखक रणजीत देशमुख यांनी मंगळवार, 13/11/2012 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
मला वाट्ते लहानपणी नककीच मी डोक्यवर पड्लो, झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........ सतत नाईलाज म्हणुन लिहाव्या लागतात असाइन्मेन्ट्स, विसराव्या लागल्या स्वत:शी केलेल्या क्मीट्मेन्ट्स.. म्रुगजळामागे धावल्यामुळे "माझ्या" आनन्दाला मुकलो, झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........ टयुटोरियल्सच्या नावाखाली आम्हाला दिला जातो मानसिक त्रास, सहन करावा लागतो कारण व्हायच असत पास.. गुलामगिरी करावी लागते सर्रास, नाहीतर शिक्शकच के टी लावतात हमखास.... माझ्या स्वप्नाला मी ह्याचमुळे हुकलो, झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........ कॉलेजच्य

डॉन

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 13/11/2012 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
दुबईच्या आलिशान हॉटेलच्या स्विमिंग पुलाच्या कठड्या वर बसून सिगारेट चे झुरके घेत तो बसला होता .संध्याकाळचा लालभडक सूर्य जसजसा अस्ताला जात होता ,तसतसा त्याला आपला २५ वर्षापूर्वीचा भूतकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर दिसू लागला ..... हैदराबाद मधल्या झोपडपट्टीतील ती छोटीशी खोली .पप्पा आणि मम्मी दिवसभर कामाच्या शोधात दिवसभर वणवण भटकत होते ,घरात दोन वेळच्या जेवणाची सुद्धा मुश्कील होती .तो आणि छोटी बहिण सुरीली तिथेच मातीच्या ढिगार्यात खेळत होते .तेवढ्यात तिथे एक गाडी आली .गाडीतून ३-४ माणसे उतरली आणि त्यातल्या एका गॉगलवाल्याने त्याला एक चॉकलेट दिले .दिवसभर भुकेला असल्याने त्याने पटकन ते खाल्ले

हल्ली तुम्ही भलतंच काही करत आहात का ?

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 13/11/2012 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही हल्ली भलतंच काही करत आहात ? असाल, तर हा धागा खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आपण मिपाकर म्हणजे छांदिष्टांची मांदियाळी - आपण काय काय करत नाही? कशानंतरी भारून जाऊन, रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी नवीन, वेगळंच, भलतंच - असं काहीतरी करण्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच नाद असावा. खाजच म्हणा हवंतर. तर सध्या तुम्ही असं भलतंच काय करत आहात ? ते लिहिण्यासाठी हा धागा. सुरुवात स्वत:पासून करतो: --------------------------------------------------------------------------------------------------------------- सध्या मी 'उदरनृत्य' अर्थात 'बेलीडान्स' शिकण्याच्या खटाटोपात आहे.

माझी शाळा

लेखक निश यांनी सोमवार, 12/11/2012 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या आठवणीत रमता रमता माझी शाळा अजुनही पुन्हा पुन्हा आठवते डोळ्यातील आसवांवाटे परत ती पाझरते. शाळेचा तो पहिला दिवस आठवणीतुन काही जात नाहीत. बाईंचे ते प्रेमळ शब्द आता काही ऐकु येत नाहीत.

'शुद्ध सात्विक' मोर आणि भगवान रमण महर्षी

लेखक मूकवाचक यांनी सोमवार, 12/11/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान रमण महर्षी - संक्षिप्त परिचयः "मी कोण आहे?" (तत्वार्थाने - माझे मूळ स्वरूप कसे आहे?) या सनातन प्रश्नाचे उत्तर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अचानक मृत्युसमान अनुभव येउन ज्यांना सहज गवसले असे एक लोकविलक्षण, आत्मसाक्षात्कारी आणि ज्ञानी सत्पुरूष अशी श्री. रमण महर्षींची आज जगभर ख्याती आहे. आत्मचिंतनाच्या धारदार तलवारीने सारे लौकिक पाश कापून काढत, त्या दृष्टीने सर्वसंगपरित्याग करून साक्षात शिवस्वरूप मानल्या गेलेल्या दक्षिण भारतातल्या परमपवित्र अरूणाचल पर्वताच्या आश्रयाला ते सोळा वर्षांचे असताना जे आले, ते शेवटच्या श्वासापर्यंत वास्तव्य करण्यासाठीच.

कुंठीत...!!!

लेखक शैलेंद्रसिंह यांनी सोमवार, 12/11/2012 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीतुन येणारे कवडसे आता प्रखर किरणं बनुन आता डोळ्यांना जाचु लागले...डोकं जाम झालं होतं...पण आता तिथे पडुन राहणं शक्यच नव्हतं...खिडकीशेजारी झोपायची सवय, रात्रभर येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळका आणि रात्री कितीही वाजेपर्यंत धिंगाणा घातला तरी सकाळी ९ वाजता उठवणारी सुर्यकिरणं. पुण्यातली रेव्होसॉफ़्ट जॉईन केल्यापासुनच असा दिनक्रम होता...गेली पाच वर्ष असंच सुरु होतं. दिवसभर ऑफ़िसमधे मरमर काम...मग रात्री मित्र-मैत्रीणींबबरोबर पब-डिस्क...घरी किती वाजता परत यायचे याची शुद्ध असायचीच कुठे? पुण्यात आल्या आल्याच स्वत:च फ़्लॅट बुक केला होता..कंपनी विनाव्याजी कर्ज देत होती. पझेशन मिळाल्यापासुन एकटीच रहायची सवय.