साहित्यः-एक वाटी चण्याचे पीठ्.(बेसन)
पाऊण वाटी पाणी.
५-६ लसूण पकळ्या.
४-५ हिरव्या मिरच्या(तिखट असल्यास कमी घेतल्या तरी चालतील)
एक बोटाचे पेर आलं.
अर्धा चमचा सायट्रीक अॅसिड.
एक सॅशे इनो फ्रुटसॉल्ट.
मीठ.
एक चमचा साखर.
चार चमचे तेल.
मोहरी व तेल फोडणीसाठी.
ओल्या खोबर्याचा चव व चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी.
कृती :-प्रथम लसूण,आलं व हिरव्या मिरच्या यांची पेस्ट करून घेणे.एका मोठ्या भांड्यात बेसन घेऊन त्यात वाटलेली पेस्ट
चवीपुरते मीठ्,साखर,तेल व सायट्रीक अॅसिड घालून मिक्स करावे.थोडे-थोडे पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे.
कुकरच्या भांड्याला तेल लावून ठेवावे.आता मिश्रणात इनो घालून जोरात एकाच दीशेने चांगले ढवळावे.तयार
मिश्रण कुकरच्या भांड्यात ओतावे.झाकण न ठेवता डबा कुकरमध्ये ठेवावा.शिटी काढून ढोकळा १५-२०
मिनीटे शिजवून घ्यावा.तयार ढोकळ्याचा डबा बाहेर काढून थंड करत ठेवावा.थंड झाल्यावर त्यावर मोहरीची
फोडणी करून घालावे.ढोकळ्याच्या वड्या कापाव्या.खोबरे व कोथिंबीर घालून सजवावे.
वाचने
12403
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटु फोटु फोटु .....
दिसला दिसला दिसला ....
ढोकळे छान दिसताहेत.
एव्हढे तरी आहेत हे नशिब
In reply to ढोकळे छान दिसताहेत. by सस्नेह
वावावा!
फोटू छान आलाय. यावरून आठवले
एकंदर पाकृ चित्राप्रमाणे हा
अय्यो ! बर झाल रेवती आठवण
ज्योतिताई, सायट्रिक अ
लिंबू किति वापरायचा सायट्रिक
अर्धा चमचा सायट्साठीअ
In reply to लिंबू किति वापरायचा सायट्रिक by भाग्यश्री अमित
आज रात्री बनवुन पहिला. चविष्टही झाला.
अरे वा..
माझा तर रेडी मिक्सचाही बिघडतो
In reply to अरे वा.. by स्वाती दिनेश
अतिशय सुंदर..................
मने तो ढोकलो बहु गमे छे !
मस्त
येकसक्युजमी ज्योतिजि !!!
शिजवताना झाकण ठेऊ नका. नाहितर
In reply to येकसक्युजमी ज्योतिजि !!! by पियुशा
मस्त.
छानच दिसतोय (जमलाय)