तिचे नाव मनकर्णिका. साताऱ्याची. अस्सल कऱ्हाडे ब्राह्मण घर. आज तिचा वाढदिवस. 19 नोव्हे. वय २९ - तेही एका युवतीचे - फार नव्हे. फारतर वय २९ असेल. म्हणजे तरुणाईच्या वसंताचा बहर. आज तिची मला आठवण येते. बहुदा दरच वर्षी. तिच्या आठवणीने उभारी येते. रक्त सळसळून उठते.उत्साह संचारतो. विषेत: मी खिन्न असतो तेव्हा. अगणीतांचे, अगतीकांचे हिसकावून घेवून फक्त स्वत:च्याच तुंबड्या भरणाऱ्या अमानवी माणसांना सभोवताली बघतो तेव्हा, कुंपणाला शेत खाताना आणि बुजगावण्याला पक्षांशी पार्टी करताना पाहतो तेव्हा, भयाण दलदलीत सापडलोय आता इथेच संपायचे अशा नैराशाचे ढग भोवती धिंगाणा घालून बिभत्स नाचत असतात तेव्हा मनूची फक्त आठवण प्रचंड दिलासा देते. नैराश्यवादी माझ्या कडे तुच्छतेने पहायला भाग पाडते. मनु स्वत:च किती खमकी ! वयाच्या चवथ्या वर्षी आई गेली. तेविसाव्या वर्षी चारच महिन्याचा मुलगा गेला. मुलगा जाण्याचे दु:ख सहन न होवून वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी नवरा गेला. पण बाई ठाम, खंबीर. नवरा असताना दत्तक घेतल्या बाळाला - दामोदरला- इस्ट इंडिया कंपनीचा डलहौशी वारस म्हणून मान्यता देईना. त्याने सरळ ६० हजार रुपये घेवून गाव, वाडा, घोडे सगळे वैभव वगैरे सोडून निघून जा नाईतर बळजबरी करून, हल्ला करून तिचे सर्व काही ताब्यात घेवू अशी धमकी दिली. पण बाई ठाम, खंबीर - वयाच्या २६ व्या वर्षी ! पठ्ठीने इंग्रज वकीलच पैसे देवून कंपनीशी भांडायला कोर्टात लावला. पेन्शन घेवून वाड्यात मुक्काम करू देण्याची मुभा डलहौशी ला द्यावी लागली. जोखण बागेत इंग्रजांच्या काही अधिकाऱ्यांची त्यांच्या बायका मुलासह १८ जून १८५७ च्या दिवशी मोठ्या प्रमाणात तिने अमानुष कत्तल केल्याचे एक प्रकरण आजही वादग्रस्त आहे. ह्यु रोझ ने झांशीला वेढा टाकला पण बाई सुटल्या आणि न थांबता ग्वालेरचा किल्ला जिंकला. ह्यु रोझ म्हणाला "rani "remarkable for her beauty, cleverness and perseverance" had been "the most dangerous of all the rebel leaders" " पण अवघ्या एकोणतिसाव्या वर्षी या गदारोळात बाई गेल्या - लढता लढता.!
..........फक्त गीधाडेच बघायची सवय लागलेल्या माझ्या डोळ्यांना बाई तुमच्या आठवणीने तरतरी येते, तुमच्या आठवणीने या देशातल्या गोंधळाचे निमित्त करून सतत तक्रार करणाऱ्या माझ्या स्वरांची मला लाज वाटते.
वाचन संख्या
5923
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
वो झाशीवाली राणी थी!
झाशीवालीला प्रणाम.
प्रणाम
मनकर्णिकेला प्रणाम.
मनकर्णिकेला माझाहि प्रणाम!!
भा. रा.तांब्यांची कविता वाचून
नेहमी प्रमाणेच उत्कृष्ट.
रावबहादूर पारसनीसांनी
चालू आहे अजून
In reply to रावबहादूर पारसनीसांनी by बॅटमॅन
सादर प्रणाम मनकर्णिकेला.
ग्रेट! झाशीची राणी. तिच्या
त्रोटक लेख
--^--^--^--
प्रणाम!! -------/\----------
आवडला
मनुला मानाचा मुजरा !
__/\__
__/\__
सुंदर,
राणीस मानाचा मुजरा !
जाओ रानी याद रखेंगे हम कृतज्ञ भारतवासी
(No subject)
In reply to जाओ रानी याद रखेंगे हम कृतज्ञ भारतवासी by बहुगुणी
धन्यवाद!
In reply to जाओ रानी याद रखेंगे हम कृतज्ञ भारतवासी by बहुगुणी
मस्तच!
In reply to जाओ रानी याद रखेंगे हम कृतज्ञ भारतवासी by बहुगुणी
क्या बात
In reply to जाओ रानी याद रखेंगे हम कृतज्ञ भारतवासी by बहुगुणी
झासेवाली
विनम्र प्रणाम
मनकरर्णिका की मणिकर्णिका??
राणी लक्ष्मीबाईंना आदरपूर्वक
नुकताच नात-नातुंच्या शाळेत