पहिली ते सातवी सकाळची शाळा असायची. दप्तर सांभाळत शाळेच्या रस्त्यावरून जाताना घरोघरी सिलोन रेडिओवर ‘पुरानी फिल्मोंके गीत’ वाजत असायचे. लतादीदी आशा यांच्या सुरेल गीतांच्या मध्येच एक वेगळाच खडा सूर ठेक्यात कानाची पकड घेई अन नकळत पाय त्या स्वरांच्या तालावर झूम उठत. ..’बूझ मेरा क्या नाव रे नदी किनारे गाव रे..
पिपल झुमे मोरे आंगना ठंडी ठंडी छाव रे ...’
..सुरुवाती-सुरुवातीला बाई गातेय का पुरुष असा प्रश्न पडायचा. पण जेव्हा लक्षात आले की हिंदी चित्रपटगीतांच्या बालवाडीत सगळ्या पुरुषांनी बायकी आवाजात अन स्त्रियांनी खड्या पुरुषी आवाजात गाण्याची प्रथा होती, तेव्हा या तलवारी सारख्या धारदार आवाजाचा मालक नसून मालकीण आहे, हेही लक्षात आले.
लता आणि आशाच्या मंजुळ सुरांना सोकावलेल्या कानांच्या कोपऱ्यात हा जरासा हटके असा देवळातल्या घंटेसारखा खणखणीत सूर एक बंडखोर घर करून राही. हा सूर इच्छा नसतानासुद्धा जणू तलवारीच्या धारेवर धरल्यासारखा आपल्या तालावर नाचवत राहायचा. दिवसभर वेळ असेल तेव्हा अन नसेल तेव्हा त्या बंडखोर सुरावटी त्या घरातून बाहेर पडून कानात धुमाकूळ घालत. जेव्हा जेव्हा विविध भारती किंवा ऑल इंडिया रेडिओवर पुराने गीत लागत तेव्हा इतर गायक-गायिकांच्या स्वरांमधून हा खडा स्वर आपल्या हटके अस्तित्वाचा, ‘कभी आर कभी पार लागा तीर-ए-नजर’ अशी तिरंदाजी कानावर करून जाई.
...त्या हुकुमतबाज सुराचे नाव ‘शमशाद बेगम’ हे जरासे उशीरच कळाले. म्हणजे साधारण दहावी-अकरावीत गेल्यावर. तोपर्यंत मी नूरजहां, सुरैय्या, अन गीता दत्त यांच्या स्वरात तरतम भेद भाव करू शकत नसे. पण शमशाद बेगमचा आवाज कुठेही ऐकला की कान बरोब्बर prompt देत.
वयाच्या दहा बाराच्या रेंजमध्ये बेगमजींनी ‘लेके पहला पहला प्यार भरके आंखोमे खुमार’ माझ्या स्वर-जीवनात प्रवेश केला. अन सोळाव्या वर्षानंतर दीदींच्या ‘मोरे कानका बाला’च्या बरोबरीने हा ‘कजरा मुहब्बतवाला’ अखियोमे ऐसा फिट्ट झाला की शमशाद बेगमची गाणी लता आशा यांच्या बरोबरीने ‘तेरी महफिलमें किस्मत आजमाकर हम भी देखेंगे’ म्हणत माझ्या स्वर साम्राज्यात मिरवू लागली.
‘होली आई रे कन्हाई रंग छलके’ म्हणत शमशादजींनी आमच्या तारुण्यात स्वररंग भरले. त्यांची खड्या सुरातली गीते कधी ‘रेशमी सलवार कुर्ता जालीका, रूप सहा नाही जाये नखरेवालीका ,,,’असा नखरा दाखवू लागली, तर कधी ‘सैंय्या दिलमे आना रे , आके फिर ना जाना रे ...’ असे म्हणून तमतमा तम तम करू लागली. कधी ‘कहींपे निगाहे, कहींपे निशाना’ किंवा ‘उडनखटोलेपे उड जाउं, तेरे हाथ ना आउं’ असा खट्याळपणा करू लागली, तर कधी ‘छोड बाबुलका घर, मोहे पीके नगर आज जाना पडा’ असे म्हणून डोळ्यात पाणी भरवू लागली.
‘एक दो तीन आजा मौसम है रंगीन ‘ असे म्हणत शमशादजीनी आमच्या होस्टेलमधल्या रात्री रंगीन करून टाकल्या. तर त्यांच्या ’चांदनी आई बनके प्यार’ने आमची उत्तररात्र चांदणेमय केली.
सकाळी सकाळी ‘गोरे गोरे, ओ बांके छोरे’ कानावर पडलं तर उरलेला दिवस ‘...चाहे रोज बुलाया करोया करो.’ च्या ठेक्यातच जाई.
इतक्या वर्षानंतरसुद्धा ‘ओss बचपनके दिन भुला न देना आज हंसे कल रूला न देना’ ची माधुरी आजही बचपनकी याद विसरू देत नाही अन ‘आना मेर्री जान संडे के संडे’ ची मजा दिलका कब्जा सोडत नाही.
....अन परवा कानावर आले की १४ एप्रिल १९१९ला पहिला घंटानाद घुमलेल्या अन पन्नास साठ ची दोन दशके हिंदी चित्रपट सृष्टीत एक ठणठणीत ठसा उमटवलेल्या या खणखणीत सुराची मालकीण मात्र ‘पीके घर आज प्यारी दुलहनिया चली ‘ म्हणता म्हणता ९४ वर्षांचा दीर्घ प्रवास करून आपणा सर्वाना सोडून गेली आहे.
शमशाद बेगम यांना श्रद्धांजली....!
वाचन संख्या
5709
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी सुरेल श्रद्धांजली स्नेहा
अगदी सुरेल श्रद्धांजली स्नेहा
In reply to अगदी सुरेल श्रद्धांजली स्नेहा by स्पंदना
मस्त लेख...
सुरेल लेख
+१
In reply to सुरेल लेख by इनिगोय
+१
In reply to सुरेल लेख by इनिगोय
जुन्या आठवणी जागवत लिहिलेला
लेख आवडला
सुरेल श्रद्धांजली
In reply to लेख आवडला by बहुगुणी
आहाहा!!!!!
In reply to सुरेल श्रद्धांजली by अन्या दातार
श्रद्धांजली
छान लेख..!
शमशाद बेगम यांना श्रद्धांजली
बाई....
"ठसकेवाज" !!
In reply to बाई.... by चौकटराजा
खूप छान
In reply to "ठसकेवाज" !! by सस्नेह
११ वी त पहील्यांदा हे गाणे
अतिशय सुंदर आणि समर्पक श्रद्धांजली.
याद ना जाये बिते दिनोकि ....
शमशाद
'मिलतेही आंखे दिल हुआ..' Most
In reply to शमशाद by तिमा
लेख आवडला.
मस्तच..
‘कजरा मुहब्बतवाला’
शमशादजींना सुरेल श्रद्धांजलि.
वा!
सुरेख लिहिलं आहे.
+१
In reply to सुरेख लिहिलं आहे. by यशोधरा
सुरेख लिहिलं आहे
+१
In reply to सुरेख लिहिलं आहे by पैसा
ही काही गाणी
छान अतिश्य सुरेल लेख