आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी..
ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत..
वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच. दिवसभराच्या दगदगीने आलेला शीणवटा म्हणा, खाडीवरून येणारा खार्या चवीचा थंडगार वारा अंगाखांद्यावरून खेळू लागताच, बायको खिडकीला डोके टेकवून लवंडली. मी मात्र जागाच होतो.. नेहमीप्रमाणेच.. बोटांची नखे खात.. हातात नावाला म्हणून पेपर, मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. एका नजरेतच ओळखले. आजही तशीच तर दिसत होती.. जशी तीन-साडेतीन वर्षांपूर्वी..
रिलायन्समधील नेहमीसारखीच एक सकाळ. नाश्त्याच्या ऑर्डरची वाट बघत कॅटीन काउंटरला रेलून उभा होतो. हातात नावालाच म्हणून मेनूकार्ड धरलेले, मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. माझ्याच दिशेने येताना. खरे तर काऊंटरच्या दिशेने येताना. अगदी बाजूलाच येऊन उभी राहिली. तिच्या एका कटाक्षाच्या अपेक्षेत तिला न्याहाळत असलेलो मी. पहिल्या नजरेत भरावेत ते तिचे कुरळे कुरळे आखूड केस.. कानांमागे ओढलेले.. मानेवर रुळणारे.. थोडासा टॉमबॉईश लूक देणारे. अन साजेसाच पेहराव. निळ्याशार जीन्सवर पांढरी आखूड कुर्ती. डाव्या हाताच्या मुठीत घट्ट धरलेली पर्स अन तिलाच जणू मॅचिंग असे मनगटी घड्याळ. दुसर्या मनगटात मात्र जाडसर काळे कडे.. हो कडेच.. बांगडी तरी कशी म्हणावे त्याला. इतक्यात अचानक तिने माझ्या दिशेने पाहिले. अन मी अनुभवले ते आतापर्यंतच्या सार्या वर्णनाला छेद देऊन जाणारे, समोरच्याचा मनाचा भेद घेऊन जाणारे, तिचे काळेभोर डोळे.. आखीव रेखीव भुवयांच्या कोंदणात. त्या नजरेच्या कैचीत अडकणार नाही ते मन कसले.. कितीही चंचल का असेना, काही काळ रेंगाळणारच. त्या नजरेला कोणाची नजर लागू नये म्हणून काजळाने मढवलेले.. ते तिचे डोळे.
हसली तशी माझे आणखीनच भान हरपले. हाताला काहीसा झटका बसून भानावर आलो तेव्हा लक्षात आले की हातातले मेनूकार्ड खेचले जात होते. किंचित ओशाळल्यासारखे सॉरी पुटपुटलो खरे, पण तीचे लक्ष कुठे होते त्याकडे. कसलीशी ऑर्डर देऊन निघून गेली ती. अन तिला पाठमोरा न्याहाळणारा मी. केस अगदीही काही आखूड नव्हते. जीन्स-कुर्तीचा पेहराव तिला किती शोभत होता हे पाठीमागूनच समजावे.
अन मग हे रोजचेच झाले. तीच वेळ तीच जागा. तिचे बदलणारे कपडे पण तेच तसेच रुपडे. अन नजर, कातिल की काय म्हणतात अगदी तश्शीच. ज्यूस अन सॅंडवीचशिवाय वेगळे काही घेताना तिला कधी पाहिले नाही. ती मला बघते की नाही हे कधी कळले नाही. पण एकदा मी सुद्धा चीज सॅंडवीच घेऊन तिच्या जवळच्याच टेबलवर बसलो. मी मागायच्या आधीच हसून तिने सॉसची बाटली माझ्यापुढे सरकवली. पुन्हा ती आपल्या खाण्यात मग्न. मी हलकेच अंदाज घेत होतो, पण पुन्हा काही तिने माझ्याकडे पाहिले नाही. तिचे उरकले अन पर्स उचलून ती निघून गेली. कॅंटीनबाहेर पडून दिसेनाशी होईपर्यंत तिला नजरेनेच सोबत देत, सावकाशपणे मग मी देखील उठलो. ती उजवीकडे "ए" "बी" "सी" ब्लॉकच्या दिशेने आणि माझी पावले वळली डावीकडच्या "डी" ब्लॉककडे.
ठरवले तर कंपनीच्या पोर्टलवर तिची माहिती मिळवणे सोपे होते. तिचे नाव, तिची बसायची जागा, तिची कामाची पोस्ट, तिचे वयच नव्हे तर तिचा रक्तगट कोणता या सारखी वैयक्तिक माहिती सुद्धा सहज उपलब्ध होती. गरज होती ती फक्त पंधरा-वीस मिनिटांचा वेळ काढून पोर्टलवर फीड असलेला डेटा चाळायची. पण तशी गरज आहे हे मन कबूल करत नव्हते. कदाचित त्याला गुंतायची भिती वाटत असावी.
दिवस सरत होते. फारसे काही वेगळे घडत नव्हते. तरीही या नात्यातील वीण घट्ट होतेय असे जाणवत होते. येणार्या सकाळची वाट आदल्या रात्री डोळे मिटण्यापासून बघू लागलो होतो. सकाळचे तिचे दर्शन पुढच्या दिवसभराला पुरत होते. मध्ये एकदा तिला सुट्टे पैसे कमी पडत होते, तेव्हा मी माझ्याकडचे दोन रुपयांचे कूपन पुढे सरकवल्याचे आठवतेय. हात किंचित थरथरतच होता माझा त्यावेळी. तिने त्याकडे दुर्लक्ष करतच ते स्विकारले. त्या कूपनाची परतफेड म्हणून तिचे ते हसणे.. नंतरही कित्येकदा आम्ही एकमेकांना सामोरे गेलो. नजरेतील ते ओळखीचे भाव, ना लपवायचे प्रयत्न ना दाखवायची ओढ.. कधी कधी व्यक्त होण्यासाठी शब्दांचीही गरज भासत नाही, किनार्यावर उभे राहूनही लाटांशी खेळायचा आनंद लुटू शकते तेच खरे मन.. एकेक घर करत आमच्यातील नाते पुढे सरकत होते एवढे मात्र खरे..
या दिवसांत एखादा दिवस असाही यायचा जेव्हा ती दिसायची नाही. मन खट्टू तर व्हायचेच पण आयुष्यातील एक दिवस फुकट ही गेल्यासारखे वाटायचे. दुसरा दिवस येणार हेच काय ते समाधान. एखादा दिवस आपणही तिच्या नजरेस न पडून तिलाही तसेच वाटते का बघावे, असा विचार मनात यायचा. पण तिला काय वाटेल हे समजण्याचा मार्ग नसल्याने त्या विचाराला बगल दिली जायची.
अन अश्यातच एक दिवस मी तिचे वेगळे रूप पाहिले...
दुपारच्या वेळेला जेवण आटोपून काही कामानिमित्त "ए" ब्लॉकला जाणे झाले. उन्हाची झळ लागू नये म्हणून थोडेसे लांब पडत असले तरी पायवाटेवर केलेल्या शेडखालूनच मी सहसा जातो. पण आज आभाळ भरून आल्याने शॉर्टकट घ्यायची संधी साधली. थोड्याश्या अडनाड्या रस्त्याने जिथे चिटपाखरांचा अड्डा वसावा, खुरटी झुडपे तुडवत चालता चालता हातातल्या मोबाईलशी चाळा.. नेहमीप्रमाणेच.. मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. आपल्याच धुंदीत, बरोबर तीनचार मित्र. ऑफिसचेच असावेत. हातात सिगारेट अन तोंडातून निघणारा धूर.. सर्वांच्याच.. अन हो, तिच्याही. धूराच्या वलयात धूरकट धूरकट होत जाणारा तिचा चेहरा, अन नकळत मंद झालेली माझी पावले. परत परत मान वळवून तिला पाहताना, अखेरच्या वळणावर तिची माझ्याकडे नजर गेलीच.. झटक्यात मान वळवली.. पण नजरानजर झालीच.
बस्स, तीच शेवटची नजरानजर.. पुढेही काही सकाळ आल्या, पुढेही नजरेच्या भेटी झाल्या. पण नजरेतील अर्थ आता बदलले होते. जाणूनबुझून मी तिच्यापासून नजर चोरू लागलो होतो. अन ती काही फरक पडत नाही असे दाखवत असली तरी तिची नजर खरं काय ते बोलत होती.
कधी कधी शब्दांना पर्याय नसतो.. नजरेची भाषा नातं जुळवण्यास कितीही समर्थ असली तरी जेव्हा तुटायची वेळ येते, तिथे शब्दच हवे असतात.. पण तो संवाद आमच्यात कधी झालाच नाही. इतक्यात तिची नजर माझ्याकडे गेली. आणखी एक नजरानजर, जवळपास तीन साडेतीन वर्षांनी.. पण नजरेत तेच तेव्हाचे ओळखीचे भाव. यावेळी मात्र लपवायचे प्रयत्न.. दोघांकडूनही.. शेजारी माझी बायको आहे याचे भान होते मला.. माझ्या शेजारी बसलेली मुलगी माझी बायकोच असणार याची जाण होती तिला.. तरीही नजर अडकली होती.. अन सोबतीला निर्विकार चेहरा.
पुढचे स्टेशन आली तशी ती उठली. नजरेची साखळी नाही म्हटले तरी तुटलीच. मुद्दामच ती उतरायला माझ्या विरुद्ध दिशेच्या दरवाज्याला गेली असावी. आजही ती पाठमोरीच छान दिसत होती. आजही सिगारेट पित असावी का.. तिला उतरताना पाहून माझ्या मनात आलेला शेवटचा विचार, मन पुन्हा एकदा चलबिचल करून गेला. खिडकीच्या बाहेर नजर टाकून ती दिसते का याचा शोध घेतला. मात्र ट्रेनने वेग पकडला तसे त्या गर्दीत हरवलेल्या तिला शोधणे अशक्यच.. कदाचित तिचे ते शेवटचे अपेक्षित दिसणे समाधान देऊन गेले असते. पण नशीबात नव्हतेच.. होती ती एक हलकीशी चुटपूट.. नकळत हात खिश्यात गेला.. सवयीप्रमाणेच.. पाकीटातून सिगारेट काढून तोंडात सरकवली.. नेहमीप्रमाणेच.. ट्रेनमध्ये आहे याचा विसर पडून ती शिलगावणार इतक्यातच..........
.
.
.
चुरगाळलेली ती सिगारेट खिडकीबाहेर जाताना पाहून........... किती बरे झाले असते ना, जर मनातल्या आठवणीही अश्याच काढून फेकणे सोपे असते तर..
- तुमचा अभिषेक
वाचने
33488
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
छान लिहिले आहे..
मस्त
.
कसे शक्य आहे, कालच लिहिले आणि
In reply to . by आशु जोग
मुलगी सिगरेट पिते म्हणजे ती
मुलगी सिगरेट पिते म्हणजे ती वाइट??
In reply to मुलगी सिगरेट पिते म्हणजे ती by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to मुलगी सिगरेट पिते म्हणजे ती वाइट?? by निनाद मुक्काम …
+1
In reply to मुलगी सिगरेट पिते म्हणजे ती by टवाळ कार्टा
मुलगी सिगरेट पिते म्हणजे ती
In reply to +1 by सोत्रि
लेखनशैली आवडली
ह्म्म कदाचित "ओढणारी" समर्पक
In reply to लेखनशैली आवडली by श्रीरंग_जोशी
प्रमाण मराठीत सिगारेट ओढतात.
In reply to ह्म्म कदाचित "ओढणारी" समर्पक by तुमचा अभिषेक
धूम्रपान बद्दल काय म्हणाल?
In reply to प्रमाण मराठीत सिगारेट ओढतात. by विश्वनाथ मेहेंदळे
मग धूर पिणे म्हणा, सिगारेट
In reply to धूम्रपान बद्दल काय म्हणाल? by तुमचा अभिषेक
फुंकणे
In reply to प्रमाण मराठीत सिगारेट ओढतात. by विश्वनाथ मेहेंदळे
झुरका मारणे किंवा दम मारणे..
In reply to फुंकणे by श्रीरंग_जोशी
त्याचा खास बोलीभाषेतील उच्चार
In reply to फुंकणे by श्रीरंग_जोशी
तंबाखू वापरणारे
In reply to त्याचा खास बोलीभाषेतील उच्चार by बॅटमॅन
भुंके - विशेष आवडले
In reply to तंबाखू वापरणारे by सुबोध खरे
सरस !
In reply to तंबाखू वापरणारे by सुबोध खरे
बरोबर
In reply to त्याचा खास बोलीभाषेतील उच्चार by बॅटमॅन
किती बरे झाले असते ना, जर
लेखनशैली अतिशय प्रभावशाली. लिहते झालात हे बघुन फारच छान वाटलं.
किनार्यावर उभे राहूनही
होती ती एक हलकीशी चुटपूट..
लेखन
टाकली काडी???
In reply to लेखन by मन१
:)
In reply to टाकली काडी??? by शुचि
हा ही लेख मस्तच...
मी पण रिलायंस मध्येच होतो
सिगरेट पिताना काही मुली
सिगरेटच्या जाहीरातींचे ग्लॅमर
In reply to सिगरेट पिताना काही मुली by अप्पा जोगळेकर
मलातर सिग्रेट पिणार्या मुली
In reply to सिगरेट पिताना काही मुली by अप्पा जोगळेकर
+१ मला सुध्दा.
In reply to मलातर सिग्रेट पिणार्या मुली by टवाळ कार्टा
बरोबर
In reply to +१ मला सुध्दा. by अग्निकोल्हा
मी असेच काहीसे लिहिणार होतो.
In reply to बरोबर by इरसाल
"गुडन गरम"
In reply to मी असेच काहीसे लिहिणार होतो. by विश्वनाथ मेहेंदळे
प्रॉब्लेम "गुडन गरम" न
In reply to "गुडन गरम" by नन्दादीप
धुम्रगंधरसविरहितओष्ठ्संपर्कात
In reply to मी असेच काहीसे लिहिणार होतो. by विश्वनाथ मेहेंदळे
फोटो जालावरुन साभार
In reply to मी असेच काहीसे लिहिणार होतो. by विश्वनाथ मेहेंदळे
ओष्ठ्संपर्क
In reply to बरोबर by इरसाल
हॅहॅहा... :D
In reply to बरोबर by इरसाल
अथवा सिगारेट ओढणार्या मुलिबाबत
In reply to हॅहॅहा... :D by अग्निकोल्हा
सिगरेट पिताना काही मुली
In reply to सिगरेट पिताना काही मुली by अप्पा जोगळेकर
अरे वा.........एक
भावना पोचल्या
एक मुलगा चहा पितो ह्या
In reply to भावना पोचल्या by कालिन्दि मुधोळ्कर
छान लिहिलय. आवडलं.
सिगरेट ओढणारी मुलगी कशी काय
Reliance मध्ये अनेकदा मुलींना सिगारेट ओढताना पाहिलं आहे .
छान लेख
लेखन आवडले..
सिगरेट
असे काही असल्यास ते
In reply to सिगरेट by तिमा
अहो गरोदरकाळ कसला. मूल नीट
In reply to असे काही असल्यास ते by तुमचा अभिषेक
सिगरेट व त्यानंतर कॉफी
In reply to सिगरेट by तिमा
हं!
हा हा.. भलत्याच अवाजवी
In reply to हं! by आतिवास
खुप छान लिहीलय
खिक्क...
In reply to खुप छान लिहीलय by शिलेदार
छान!
गोष्ट चांगली ए पण लोकांच्या
तुमची गोष्ट वेगळी आहे. तुमचा
In reply to गोष्ट चांगली ए पण लोकांच्या by शिल्पा ब
अर्थातच. आमचं वागणं दुसर्या
In reply to तुमची गोष्ट वेगळी आहे. तुमचा by विश्वनाथ मेहेंदळे
?????
अगायायायाया, कोण आहे रे तो
In reply to ????? by मृणालिनी
छान..
मला ही...
In reply to छान.. by रुपी
छान वाटले . .
मस्त लेख