Skip to main content

केरळ स्टाईल व्हेजिटेबल स्ट्यू

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 27/02/2013 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
kerala style vegetable stew सामग्री: १ गाजर, फोडी १ बटाटा, फोडी १/२ वाटी हिरवे मटार १ छोटा कांदा, बारीक चिरलेला ५-६ करी पत्ता २ हिरव्या मिरच्या, मधून चिरा दिलेल्या १ चमचा आलं लसूण पेस्ट १ वेलची २ लवंगा १/२ इंच दालचिनी चा तुकडा ३-४ काळे मिरे १ चमचा तेल २०० मी लि नारळाचे दाट दूध मीठ स्वादानुसार कृती: - एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मिरची, करी पत्ता, आलं लसूण पेस्ट आणि लवंग, दालचिनी, मिरे , वेलची घालून थोडं तडतडल कि मग त्यात कांदा घाला. कांदा मऊसर झाला कि मग बटाटा, गजर आणि मटार घालून झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्या. - भाज्या शिजल्या कि त्यात नारळाचे दूध आणि मीठ घालून एक उकळी आणा. गरम गरम अप्पम किंवा भात बरोबर सर्व्ह करा. - अश्याच पद्धतीने चिकन आणि मटण स्ट्यू पण करता येते.

वाचने 40244
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

आवडली रेसेपी,सोपी आहे,ते आपम काय छान दीसत आहेत्,त्याची पण रेसेपी द्या ना पिल्ज

छान रेसेपी, सोपी आणि दिसायलाही छान आहे. नक्की करुन बघणार. धन्यवाद. :)

आहा... क्या बात है. पण.. केरळ स्टाईल मटन स्ट्यू अशी पाककृती देऊन शेवटचं वाक्य "अश्याच पद्धतीने व्हेजिटेबल स्ट्यू पण करता येतो" असं लिहायला हवं होतं.. ;) बाकी एका दुष्ट क्रूर डायेटिशियनने आम्हांस असले पदार्थ खायला बंदी केली आहे. त्यामुळे नुसते दर्शन घेतो..

In reply to by खादाड अमिता

नक्की काय झुट बंदी का ....त्या डाएटिशियन दुष्ट आहेत वगैरे.

मस्त फोटो आणि पाकॄ. पण स्ट्यूला पिवळा रंग कसा आलाय? हळद घातलीये का?

मस्तच. स्टयु पेक्षा शेजारी ठेवलल्या आंबोळ्या जास्त भाव खाऊन गेल्यात. ;)

सहज,सोपी व तितकीच देखणी पाककृती :) आवडली :)

एकदम मस्त... पण सुप सोबत मला त्या अप्पमची सुद्धा पाकृ पाहिजे आहे... बरेच वेळा प्रयत्न केला, पण मला काही केल्या ते स्पॉन्जी अप्पम जमले नाहित.

सहज आणि सोपी पाककृती ,आणि फोटो तर अगदीच सुरेख ! http://mejwani.in/

मस्त........अप्पम फार फार आवडले..:)