कबूल नाही नसलेपण तव
निगूत जपले आहे वैभव
सरले ऋतू कितीक युगाब्धे
हिरमुसले ना जीवन लाघव
अदृष्यातिल दृष्य आभासे
चंचल डोळ्यांमधील बारव
स्मितरेषा गालांवर अंकित
खोल खळ्या ओठांचे पल्लव
भल्या किनारी रुसवा फसवा
अबोल्यात वठले गुंजारव
आभास; विझल्या खुणा सणाच्या
भिजले काळिज हसले शैशव
............................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1606
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
अदृष्यातिल दृष्य आभासे
अबोल्यात वठले गुंजारव
"निगूत" नीट नेटकेपणाने,
In reply to अबोल्यात वठले गुंजारव by स्पंदना
मस्त