मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आजूनहि मी

श्रीमत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अजूनही अजूनही मी वावरतो ह्या माणूस हरवलेल्या सनातन शहरात ऐकतो पवित्र परंपरा अन संस्कृतीचा झिंगलेला जयघोष, नग्न करून धिंड काढलेल्या स्त्री बद्दलचे, भाड्याने आणलेल्या रडव्यांचे मुक्त पंचतारंकित परिसंवाद गरिबी हटाव आणि जाती वादाच्या मादक गर्जना.......... पहातो लोकशाहीच्या शाही सुपुत्रांकडून लोकांवर झालेला पाशवी बलात्कार निर्विकारपणे मनावर एकही ओरखाडा उमटू न देता मी मित्रांबरोबर चहा पितो ,सिगारेट ओढतो, हिंदी सिनेमा पहातो प्रयेसीच्या दारावर चक्कर मारतो............ मग रात्री निर्लज्जपणे माझ्यातला मी, स्वत:ला विचारतो एवढा का मी षंढ अजून ही???????????? -- सुतार अंबेजोगाई ( कवितेच्या मूळ लेखका बद्दल एवढेच माहित आहे माझ्या काहि संग्रहित कवितेमधली ऐक)

वाचन 875 प्रतिक्रिया 0