Skip to main content

पनीर मिक्सव्हेज रोल

लेखक नेहरिन यांनी शनिवार, 22/06/2013 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- २०० ग्रॅम पनीर ,१वाटि बारिक चिरलेला फ्लॉवर, १ वाटी बारीक चिरलेला श्रावण घेवडा , १ मध्यम आकाराचे गाजर बारीक चिरून, ८-१० पुदिन्याची पाने , १ वाटि बारिक चिरलेली कोथिंबीर , १वाटि स्वीट कॉर्नचे दाणे , २ टेबलस्पून Cornflower , ८-१० पालकाची पाने , ११/२ टीस्पून बारीक वाटलेले आले ,२ टीस्पून जिरे पावडर, ११/२ टीस्पून मिरे पावडर , ३/४ हिरव्या मिरच्या वाटून , १ लिंबाचा रस .११/२ वाटि ब्रेड crumb , मीठ ,तळण्यासाठी तेल . कृति :- प्रथम गाजर , श्रावण घेवडा , फ्लॉवर, कोर्न थोडेसे वाफवून घ्यावे ( पूर्ण शिजवायचे नाही ).

गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

लेखक सुज्ञ माणुस यांनी शनिवार, 22/06/2013 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे. आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते.

फ्रेश बेरी आल्मड टार्ट

लेखक चेरी यांनी शनिवार, 22/06/2013 03:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बाजारात भरपूर बेरीज येत आहेत. का कुणास ठाऊक पण, ब्ल्यूबेरी माझ्या जरा जास्तच आवडीची. ह्या बेरी वापरुन फ्रेन्च टार्ट बनवला होता, लग्नाच्या वाढदिवसासाठी. त्याचीच ही कॄती- साहित्य - टार्ट बेस करिता-- आल्मड पावडर- ३/४ कप मैदा- १ कप सा़खर- ३ टे.स्पून लोणी(गार)- ६ टे.स्पून मीठ- १/८ टि.स्पून अंड- १ पिवळा बलक( ओप्शनल) हेवी क्रीम- २ टे.स्पून पेस्ट्री क्रीम करिता-- दूध- १ कप अंडी- ४ पिवळा बलक हाफ अ‍ॅन्ड हाफ क्रीम- १ कप कॉर्न स्टार्च- ३ टे. स्पून साखर- १/२ कप लोणी- १ टे.

२१ जून, मॉस्को..(२)

लेखक लाल टोपी यांनी शनिवार, 22/06/2013 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी घरी आल्यावर जेवून ८.४५ च्या सुमारास घराजवळील 'व्हिक्टरी पार्क' कडे निघालो. व्हिक्टरी पार्क सोव्हियत युनियनच्या अंतीम काळात तयार झाले. हे रशिया आणि नाझी जर्मनीच्या 'ग्रेट पेट्रीयोटिक वॉर'(१९४१ ते १९४५ दुसरे महायुध्द)च्या विजयाचे स्मारक आहे. १९९५ मध्ये या विजयाच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी या स्मरकाचे उद्घाटन झाले. या जागेला आणखी ऐतिहासिक महत्व देखील आहे.

सावधान........

लेखक अमोल सहस्रबुद्धे यांनी शुक्रवार, 21/06/2013 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली सगळ्यांच्या तोंडी सेकंड होमचा बोलबाला आहे. ते ऐकल्यावर मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवली ..... एक वृद्ध माणूस असतो. त्याला तीन मुले असतात. तो त्यांना काही पैसे देतो आणि सांगतो की तुम्ही प्रत्येक गावात घर करा. तेंव्हा त्यातला एक प्रत्येक गावात घरे घ्यायचा सपाटा लावतो. दुसरा सगळ्या गावातन माणसे जोडतो. आपण सगळे पहिल्यासाखरे वागायला लागलो आहोत. आणि सृष्टीचा समतोल बिघडवण्यात हातभार लावतो आहोत आपण वेळीच सुधारायला हवे अन्यथा आत्ताच्या विनाशाची पुनरावृत्ती सगळीकडे व्हावयाला वेळ लागणार नाही.. सावधान....... सावधान....... सावधान.......

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 21/06/2013 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
८ जुन २०१३ पहिल्या पावसाची चाहूल लागल्यापासून बायकोचे कुठेतरी लांबवर फिरायला घेऊन चल चालूय.. तिचेही खरेच आहे.. पावसाळा हा काही खिडकीतून बघायचा उत्सव नाही.. कडाडणारी वीज अन गडगडणारे ढग.. घरबसल्याच धडकी भरवतात.. जणू काही शत्रू अंगावर चाल करून येतोय.. पण मैदानात उतरायचे ठरवल्यास तेच जोडीदार बनून राहतात.. तरीही लांबवर कुठे जायचे म्हणजे वेळ हवा, सुट्टी हवी.. पैशाचेही सोंग काही घेता येत नाही.. जमेल तेव्हा जाऊच, पण आजची संध्याकाळ भाऊच्या धक्क्यावर घालवूया म्हणालो.. हो ना करता झाली तयार.. भाऊचा धक्का..! टॅक्सी पकडली की मीटर पडायच्या आधी येते.. तरीही चार सहा महिने वर्षातूनच जाणे होते..

युग

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 21/06/2013 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी हे लिहून काढतो मग ते लिहितो ,मग आणखीन ते .. त्या त्या क्षणाचे , वर्षांचे ,जन्मान्मांचे संदर्भ ! कधी कधी शब्द फारच पोचट वाटू लागतात , मग मी कागद चुरगाळून फेकून देतो असेलही कदाचित त्या चुरगाळून गेलेल्या ओळींत एखादा निखाऱ्यासारखा जळजळीत शब्द, मनाचा एखादा कापून काढलेला तुकडा एखादा वाळवंटासारखा तप्त अश्रू आणि तुझ्या आठवणीत वाहून गेलेले कदाचित एखादे युग .. !

सावली

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 21/06/2013 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी मुंबईला येणा-या गाडीत बसल्यापासून सुनंदाला एकदम शांत वाटत होतं. उन्हातान्हात भटकून झाडाच्या सावलीत आल्यावर वाटावं तसंच काहीसं! थकल्याभागल्या अवस्थेत डोळे मिटून निवांत पडावं, कशाचाही विचार करू नये अशी काहीशी तिची अवस्था झाली होती. अर्थात मागे वळून पाहण्याइतकं काही तिचं आयुष्य लांबलचक नव्हतं – अवघी सतरा वर्षाची तर होती ती. हं, आता लग्न लावून द्यायचं म्हणून मामाने दडपून तिचं वय दोन वर्षांनी वाढवून सांगितलं . पण मामाच्या घरातून बाहेर पडायची लग्न ही एकच संधी होती सुनंदाला, आणि तिने ती घेतली होती.

२१ जून, मॉस्को..

लेखक लाल टोपी यांनी शुक्रवार, 21/06/2013 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
आज आहे २१ जून. वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र. खरतरं दरवर्षीच ही तारीख येते आणि जाते. भारतातही काही प्रमाणात दिवस रात्रीच्या वेळेतील हा फरक जाणवतो मात्र भारत विषुवृत्ताच्याही एकदम जवळ नाही आणि भूमध्याच्याही फारसा जवळ नाही. दिवस रात्र किंवा ऋतूमानातील बदल याभागात म्हणजे विषुवृत्ताजवळ जेवढ्या प्रखरपणे जाणवतात किंवा भूमध्याजवळ फारसे जाणवतच नाहीत तसा प्रकार भारतात घडत नाही. मध्यरात्रीचा सूर्य: नॉर्वे शाळेच्या पुस्तकात हा धडा वाचल्यपासूनच 'कसा असेल मध्यरात्रीचा सूर्य?' हे कुतुहल शालेय दिवसांपासून मनात होते.