साहित्यः
पापलेट - २
सुक्या लाल मिरच्या - ७-८
ओले खोबरे - १/२ वाटी
धणे - १ चमचा
मेथी दाणे - १/२ चमचा
आले - १ इंच तुकडा
लसुण पाकळ्या - २-३
हिरवे वाटण - १ चमचा (आले, लसुण, हिरवी मिरची व कोथिंबीर)
मोहरी - १/२ चमचा
कडिपत्ता - ३-४ पाने
अमसुल - २
लाल तिखट - २ चमचे
हळद - १ चमचा
हिंग - १ चमचा
लिंबु - १/२
मिठ चवीनुसार
कृती:
१. पापलेट स्वच्छ करुन त्याचे तुकडे करुन घ्यावेत. त्याला हिरवे वाटण, १/२ लिंबुचा रस, १/२ चमचा हिंग, १/२ चमचा हळद व थोडे मिठ लावुन ठेवावे.
२. एका वाटीत थोडे गरम पाणी घेउन, त्यात सुक्या लाल मिरच्या, धणे व मेथी दाणे १/२ तास भिजवुन ठेवावेत.
३. मिक्सर मधे, गरम पाण्यात भिजवलेल्या लाल मिरच्या, धणे, मेथी दाणे, आले, लसुण व ओले खोबरे ह्याची smooth paste करुन घ्यावी.
४. कढईत तेल गरम करावे. त्यात १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा हिंग व कडिपत्ता टाकावा.
५. हे थोडे परतल्यावर त्यात वरील पेस्ट, लाल तिखट, १/२ चमचा हळद टाकावी व ४-५ मिनिटे निट परतुन घ्यावे.
६. थोड्या वेळानी त्याचे तेल सुटायला लागेल. तेव्हा त्यात १-२ वाटी पाणी ओतावे.
७. करीला उकळी आल्यावर त्यात marinate केलेले पापलेटचे तुकडे व अमसुल टाकावे. हे सर्व अगदी अलगद हाताने मिक्स करावे.
८. करीवर झाकण ठेवुन ५ मिनिटे शिजु द्यावे. पापलेट शिजल्यावर वरतुन कोथिंबीरने सजवावे व गॅस बंद करावा.
९. पापलेट करी तयार आहे. तांदुळाची भाकरी किंवा गरम भातासोबत serve करावे.
* तुमच्या आवडीप्रमाणे करीमधील पाणी कमी-जास्त करु शकता.
* तुमच्या आवडीप्रमाणे करीमधील पाणी कमी-जास्त करु शकता.
वाचने
8495
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
बेश्ट..
वा!
हो.. केरळी पदार्थात टाकतात...
In reply to वा! by पैसा
इतके भारी फोटू दाखवू नकोस
अहाहा!
आहा.. खल्लास...
... धन्स गवि... आता next पाकॄ
In reply to आहा.. खल्लास... by गवि
मसाला भिजवुन करायचे हे
हो.... हि निशांतच्या आईची
In reply to मसाला भिजवुन करायचे हे by स्पंदना
अगदी चविष्ट पाकृ आहे. नोंद
छानच
बादलीभर लाळ गळल्या गेली आहे.
या शुक्रवारचा बेत फिक्स...
भारी
वा वा. नक्की करुन बघीन
आहे आहे खोबर आहे.
In reply to वा वा. नक्की करुन बघीन by आर्णव