Skip to main content

एकांकीका : धडा

लेखक गणपा यांनी सोमवार, 11/03/2013 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
अंक पहिला / प्रवेश पहिला. वेळ : सकाळी ७:३० प्रसंग रोजचाच. मावशी (किचन मधून) : अनोखी, लवकर लवकर आटप बस येईल इतक्यात. मोजे काढुन ठेवलेत, बूट घालून तयार रहा. नायिका (ओसरीत बुटाला पॉलिश लाण्यात मग्न.) : ह्म्म्म. मावशी बाहेर येते. नायीका दिवाणखान्यातून दिसत नाहीये. मावशी : हे काय? मोजे अजुन ईथेच पडलेत? अनोखी बस चुकेल. नायिका (वस्स्क्न खेकसुन): बुटांना पॉलिश करतेय ना?" मावशी : बरं बरं आटाप लवकर. प्रवेश दुसरा. वेळ : सायंकाळ ७:३० आई : अनोखी, आपण एक नाटक बसवायचय. नायिका (अभिनयाचं नाव काढताच कळी खुललेली): कसलं? कसलं? आई : असच घरगुती नाटक आहे. हीरोईन तुझ्या येवढीच शाळेत जाणारी मुलगी. नायिका : ओक्के. आई : तर सीन असा आहे की हीरोईन शाळेची तयारी करतेय. नायिका : बरं. (दप्तर भरायचा अभिनय सुरु.) आई : नंतर ती बुटांना पॉलिश करतेय. नायिका : बरं. (इक भुवई नकळत वर जाते.) मावशी : अनोखी, लवकर लवकर आटप बस येईल इतक्यात. मोजे, बुट घाल. . . . मावशी : हे काय? मोजे अजुन ईथेच पडलेत? नायिका (मंजुळ आवाजात): आधी बुटांना पॉलिश करते मग घालते. यानंतर नायिका स्वतःच खदखदुन हसायला लागते. आई : काय झाल गं? नायिका (गालातल्या गालात हसत) : समजलं. कळलं मला. :) आणि पडदा पडतो. ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8619
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

नाटक लिहिण्याची कल्पना छान! पण 'नायिका' तुमच्या डोक्यावर मिरे वाटणार बघा मोठेपणी!

असेच पॅरेन्टींगचे किस्से टाकत जा...! नव, होऊ घातलेले, विंगेतले, तिकीटबारीवरचे, घरातून मेकप करुन निघालेले ;) अशा सगळ्या पालकांसाठी उपयुक्त धागे आहेत.