Skip to main content

अजाणता

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 29/08/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
अजाणता जाणले कसे इप्सित शब्दांनी मनातले भातुकलीने लक्ष्य वेधले गतकाळात विखुरलेले चिमणी पोपट बुलबुल आदी सवंगडी सारे जमले चित्त हरखले हरली चिंता वय उरले शैशवातले बडबडगाणी हिरव्या रानी राज्य परीचे सापडले नितळ मोगरी अवकाशावर बाळ निरागस बागडले …………… अज्ञात
काव्यरस

ज्ञानदीप उजळू दे..

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 29/08/2013 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा? नूतन समर्थ विद्यालय, विजय मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २. विद्यार्थीवर्ग? आजूबाजूच्या वेश्यावस्तीतील आणि इतर कामकरी वर्गातील मुले. दुसर्‍या एका संस्थळातर्फे चालवल्या जाणार्‍या काही चांगल्या उपक्रमांमध्ये मला सहभागी व्हायची संधी मिळाली आहे, त्यापैकी हा एक उपक्रम. ह्या उपक्रमातून गेली काही वर्षे ह्या छोट्यांना शिक्षणासाठी मदत करत आहोत आणि सातत्य राखण्याचाही प्रयत्न करत आहोत.सावली सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ही मदत केली जाते.

एका गाजलेल्या पुस्तकाचे परिक्षण

लेखक दशानन यांनी बुधवार, 28/08/2013 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रदर्शनात दुपारी थोडावेळ मिळाला म्हणून एक पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतले. प्रथमदर्शनी पुस्तकाचे निर्माण कसे करु नये? याचे उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक नक्कीच खपून जाईल, त्यामुळेच तर याला उत्कृष्ट वाडमयीन त्यावर्षी मिळाला होता. कव्हर ३०० जीएसम च्या जागी ३०५ आणि आतील पाने ५८ जीएसम च्या जागी ६० वापरली असती तर अजून हे पुस्तक चांगले घडू शकले असते, मॅथलीतो च्या जागी नॅचरल असता तर जगात भारी पुस्तक निर्माण झाले असते. पुस्तकाचे वजन अंमळ जास्त आहे, थोडी काही शे पाने कमी केली असती तर वजन नक्कीच कमी झाले असते.

पुत्र व्हावा ऐसा गुंडा...

लेखक पिलीयन रायडर यांनी बुधवार, 28/08/2013 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा... ह्याचा कवीला जो काही अर्थ अपेक्षित असेल तो असेल.. पण आमच्या लेकरानी शब्दशः घ्यायचा ठरवला आहे. आणि तो बहुदा "गुंडा" सिनेमाच्या हिरो सारखा "गुंडा" हा असावा.. असो.. तर..आमचे सुपुत्र झोपेतुन उठतात तेच मुळी बटन दाबुन मशिन चालु केल्या सारखे.. एकदम धो धो एनर्जी कोसळायला सुरवात होते. तिथुन पुढे दिवसभर ती तशीच कोसळणार असते. दम दिल्या सारखा हाका मारत सुटतो..चावतो..उड्या मारतो..बोचकारतो..लाथा मारतो आणि वर "हा हा" करुन हसतो..

राधेचा कन्हैया -

लेखक विदेश यांनी बुधवार, 28/08/2013 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
इकडे तिकडे शोधुन राधा बसली हिरमुसुनी झाडाला टेकताच अवचित सूर आले वरुनी .. फांदीवरती डोलत होता कन्हैया मुरली धरुनी इथेच होता दिसला नव्हता हिरव्या पानामधुनी .. पाहुनिया वर खुषीत आली राधा मनोमनी हरखुन गेली कितीक धडधड वाढे हृदयातुनी .. लटका रुसवाफुगवा वाटे तिला दावुया मनी पट्कन फांदीवरून उतरे कन्हैया ते जाणुनी .. मुरली लावी अधरास तिच्या एक हात धरुनी जवळीकीने गेला रुसवा झणि राधेचा विरुनी .. पुष्प हातचे मुकुटी ठेवुन भाळासी चुंबुनी उभी होतसे अधोवदन ती हात हाति गुंफुनी .. लिपटे जैसी वृक्षास लता, एकरूप होऊनी गाली लाली क्षणात येई कन्हैयास बिलगुनी .. .
काव्यरस

४ निमिष, ३९ क्षण - अग्निसराव

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 28/08/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या संस्थेत (कंपनी) अग्निसराव (फायर ड्रील) नुकताच पार पडला, त्यातील एकूणच अनुभव इथे मांडत आहे. लेख मुद्दामच पूर्ण मराठीत लिहित आहे, काही शब्दांना कंसात पर्यायी आंग्ल शब्द लिहिले आहेत. या लेखातील नावे / व्यक्ती काल्पनिक आहेत, कुणाचा संदर्भ जुळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.   आमच्या संस्थेत सहामाही अग्निसराव असतो, या सरावात मी एक सहायक/अधीक्षक (फायर वॉर्डन) म्हणून काम करतो. मागल्या वर्षी देखील मी हे काम केले होते.

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (४)

लेखक शिवोऽहम् यांनी बुधवार, 28/08/2013 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (१) पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (२) पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (३) ..त्यानं पुढ्यात पेटी घेऊन असा काही रंग उभा केला म्हणता की अनुरागने तिथल्या तिथे त्याला गुलालचे संगीत कॉम्पोज करायला आवतान दिले! ************************************************************************************** जब शहर हमारो सो गयो

मोर पंखी कावळा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 28/08/2013 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
एक काळा कावळा, मोरांच्या देशी गेला. मोर पंखी ‘बपतिस्मा’, लाऊन घरी परतला. ‘श्रेष्ठत्वाची’ जाणीव, त्याला आता झाली. पोरांसाठी वेगळी, ‘संस्कृती’ शाळा बांधली. जेवणाची सोय ही, त्याने वेगळी केली. पाण्याची विहीर आता, कालबाह्य होती. ‘त्यागण्या’ साठी बांधले, टॅायलेट चकाकी. सुगंधित लहारदार, कोक पेक्षा स्वादिष्ट आवडत होते त्याला, त्याचेच शिवाम्बू कुणा शुद्राच्या घामाच्या, दुर्गंधी कसे झाले? मोरपंखी कावळ्याची, इनसल्ट कोणी केली? तुज्याच पूर्वजाने, केली होती विहीर अशुद्ध.
काव्यरस

कृष्ण नाही गोकुळी

लेखक जुईचे फूल यांनी बुधवार, 28/08/2013 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
रंग नाही गंध नाही रास नाही गोकुळी विरह वेड्या गौळणीचा श्वास नाही गोकुळी गोपिकांचे लक्ष भारी दूध लोणी लपविती दूध लोणी चोरण्याची आस नाही गोकुळी सांज वेळी कृष्ण जाई वाजवूनी बासुरी अधर वेड्या बासुरीचा वास नाही गोकुळी मोहनाने मोहलेल्या गौळणीला गाठली कृष्ण प्रेमी गुंगण्याचा भास नाही गोकुळी आठवांचे लोट येती नंदराणी सांगते गोकुळीला जगविणारा त्रास नाही गोकुळी

गेट आयडीया !

लेखक चाफा यांनी बुधवार, 28/08/2013 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
" कल्पना सर्व्हीसमध्ये आपलं स्वागत आहे सर, मी आपली काय सेवा करू शकतो ? " " माझी सेवा नका करू हो, तुम्ही समाजसेवक नाही आहात, माझ्या तक्रारीचं काय झालं ? " " कोणती तक्रार सर ? " " मी गेले तीन दिवस फोन करून सांगतोय माझ्या नेटसेटरचा स्पिड कमी झालाय म्हणून" " सर कृपया आपण शेवटचा रिचार्ज कधी केला हे सांगू शकाल का ? " " ही तुमच्या नेटवर्क बद्दलची खात्री आहे की माझ्या जिवनरेषेबद्दल संशय ? " " मी समजलो नाही सर" " नाही, शेवटचा रिचार्ज असं विचारताय म्हणून म्हंटलं " " त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो सर, पण मला पुन्हा एकदा आपला प्रॉब्लेम सांगू शकाल का ?