Skip to main content

लघु वाल्गुदभारत-भाग ३.

लेखक बॅटमॅन यांनी सोमवार, 11/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
जो वेळ या वाल्गुदवर्णनाते| लागे, क्षमावे परि या कवीते| कामे जशी येति तैं मूड जाई| तैं दीस-दीशीं लिहवीत नाही || गुहायामपतत्ब्रूसः सपद्येवाचिरात् खलु | तत्रैव हि गृहं तेषां वाल्गुदानां पुरातनम् ||१|| ब्रूसाघातध्वनिना ते सर्वे भयभीता: भृशं खलु | उड्डयन्ति आक्रोशन्ति वारंवारं इतस्तत:||२|| तद् दृष्ट्वा चकितो ब्रूसः भयेन स्तिमितस्त्वहो | पश्चात्पितृप्रयत्नेन गुहाया: उद्धृतः खलु ||३|| स्वप्नेष्वपि खलु त्रस्तः महद्भिर्वाल्गुदै: सदा | भयभीतः सदा ब्रूसः प्राणिभिस्तु निषेवित: ||४|| निजचित्तभयं यावत् अकथत् भीतिमान् बटु: | "भयं सर्वेषु सामान्यं" तातस्तमकथत्तदा ||५|| तया ऐकितां शांत जैं ब्रूस होई | अकस्मात निद्राप्रदेशात जाई | पैं वाघळे येति पुनःपुनःचि ती | घोंघावती कायम आरपार ती ||६|| अथैकदा नाट्यगृहात साचे | घडे महन्नाट्य जे सत्य साचे | मनावरी कोरिला तो प्रसंगू | वर्णू किती त्यास, मी काय सांगू ||७|| नाट्यात गूढे बहु, पाहतांना | तो ब्रूस पाही परि वाघळांना | अंगावरी येति जणों बहूत | बाबा चला, येथुनिया निघूत ||८|| अस्वस्थचित्ते विनवीत राही | ऐकोनिया बाप बाहेर नेई | पैं बाहिरी पिस्तुलधारि चोर | तो द्रव्य मागे, पुरता छचोर ||९|| दिले जरी द्रव्य मातापित्यांही | मारोनि टाके, न विवेक काही | कलेवरे पाहुनि ब्रूस तो रडे | होती न पैं जोवरि नेत्र कोरडे ||१०|| तया मुहूर्तीं परि बाल्य त्याचे | आटोपले क्रूरपणेंचि साचे | प्रवास येथोनि सूडाचिया तो | सवे जनें, पैं मनीं एकटा तो ||११|| (क्रमशः)
लेखनविषय:

वाचने 3910
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

मजा येत आहे वाचायला !!

वाघुळपंत मस्त चाललंय! ती स्मायली मधेच कुठून आली कपाळावर हात मारणारी?

दोन भाषा वापरण्याचं काही विशेष कारण आहे का? कदाचित आधीच्या भागांत या प्रश्नाचं उत्तर असेल -पण मी अजून पहिले दोन भाग वाचलेले नाहीत, वाचते.

सर्वांचे मनापासून आभार!!! @आतिवासः काही खास कारण नाही. ५ श्लोकांनंतर संस्कृतची भट्टी काही जमेना, मग मराठीवर उतरलो झालं :) @लीमाऊजेटः अवघे चतकोरशे वयमान ;)

बॅट्या तुझे हे वल्गुदाख्यान वाचून डोळ्यासमोर महाभारतकालीन कपड्यातलाच बॅट्मॅन उभा राहतोय रे. फुल्ल सोन्याचा मुकुट, उत्तरीय, कटीवस्त्र वगैरेवाला. ;)

In reply to by अभ्या..

सहीच रे अभ्या!!! नेटवर शोध घेताघेता हे सापडलं बघ. महाभारत काळातला नै पण सौदिंडियन अण्णा ब्याटम्यान ऊर्फ गॉथमपल्लिन ब्याटम्यानप्पा ;) h नंतर कधी जमल्यास तसा महाभारतकालीन किंवा मराठेशाही बॅटमॅन काढण्याची एक फर्माईश तुला आलरेडी करून ठेवतो ;)

In reply to by अभ्या..

:) हा रे नक्की. मराठी ब्याटम्यानाच्या संकल्पनेला समस्त वाल्गुदप्रेमी मिपाकरांकडून जोर्दार अनुमोदन!!!!!!!! वाट पाहतोय, मराठेशाही ब्याटम्यान झाला पाहिजे :)

बहुच गम्युं. वांचता रहिये छिये. लखता रहे जो.