Skip to main content

( चला नांगरूया शेत सारे )

लेखक मोदक यांनी मंगळवार, 15/10/2013 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल. चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा.. *************************************************** बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगर

Gas Cylinder सुरक्षितता उपाय

लेखक प्रमोद देर्देकर यांनी मंगळवार, 15/10/2013 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो आपण सर्वांनी Gas Cylinder च्या बाबतीत जागरूक असले पाहिजे या दृष्टीने मी आज एक गोष्ट महित झालि आहे ती तुम्हाला सांगू इच्छितो. आपण स्वतः बरोबर इतरांनाहि जागरूक करावे. आपल्या रोजच्या वापरत येणारा Gas Cylinder हा कोणत्या दिवसा पर्यन्त कार्यक्षम राहाणार आहे हे कसे ओळखावे ते पहा. १) Cylender च्या volve च्या भोवती ज्या 3 पट्ट्या असतात त्यावर A B C D अशा खुणा असतात आणि ज्या वर्षी Cylender expire होणार त्याचे वर्ष छापलेले असते.
आकृती मध्ये पिवळ्या वर्तुळातील खुणा पहावी.
म्हणजे जसे कि A /१२, किंवा D/१५ यापैकी पहिले A B C D म्हणजे वर्षाचे चार भाग केलेले असतात.

चट्पटीत शंकरपाळे (दिवाळी स्पेशल)

लेखक अनन्न्या यांनी मंगळवार, 15/10/2013 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट, ओवा, हळद, मैदा, तळण्यासाठी तेल. कॄती: प्रथम अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट (चवीनुसार), थोडीशी हळद हे सर्व एकत्र करून उकळावे. आणि गार करण्यास ठेवावे. ओवा थोडा बारीक करून घ्यावा. आणि तयार पाण्यात मिसळावा. पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात मावेल एवढा मैदा मिसळावा. गोळी करून त्याची पोळी लाटावी. शंकरपाळे कापावेत. तेलात तळून घ्यावेत. मस्त कुरकुरीत होतात. shankarpale

पुणे :

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 15/10/2013 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे हे एक ऐतिहासीक शहर आहे.औरंगाबाद देखील तसेच आहे. मात्र औरंगाबाद मध्ये आलेल्या पाहुण्याना फिरवण्यासाठी बीबी का मकबरा , पाणचक्की यासारखी स्थळे दाखवता येतात.

देरसूचा निरोप..........भाग २ - डुकराची शिकार !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 15/10/2013 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ - निशाचर २ रानडुक्कराची शिकार चहाचे दोन तीन कप प्यायल्यानंतर सैनिकांनी घोड्यांवर सामान लादायला सुरवात केली. देरसूनेही त्याचे सामान आवरायला घेतले. माझे त्याच्याकडे बारीक लक्ष होते. त्याने पहिल्यांदा त्याचा पिट्टू एका झटक्यात पाठीवर चढवला व झाडाच्या बुंध्याला टेकवून ठेवलेली त्याची रायफल उचलली. थोड्याच वेळात आमची पलटण मार्गस्थ झाली. ज्या घळीतून आम्ही मार्ग काढत होतो ती एखाद्या सापासारखी पसरली होती. तिला मधेच अनेक छोट्या घळी येऊन मिळत होत्या. त्या सगळ्या मार्गावर झरे व धबधबे त्या दरीत पाणी ओतत होते.

सारु अहमदावाद; सारु गुजरात

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 15/10/2013 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सद्ध्या मोदी चा काळ आहे. पंतप्रधानपदाच्या दिशेने त्याची चालू असलेली वाटचाल जबरदस्त आहे. शिवाय त्या माणसाने गुजरात मधे केलेल्या कार्याच्या जोरावर त्याला लोकांचं पाठबळही भक्कम मिळतंय. त्याच्याच या कार्यक्षेत्री जाण्याचा योग गेल्या वर्षी आला होता. तेंव्हा तिथे काढलेली काही छायाचित्रे आपल्यासमोर मांडतोय. खरं तर वर्णनही लिहायचं होतं, परंतु 'वेळ' मिळत नाही ... नेहमीचं रडगाणं. असो.

गालिब च्या शायरी चा आस्वाद भाग ५

लेखक गुल-फिशानी यांनी सोमवार, 14/10/2013 19:58 या दिवशी प्रकाशित केले.

गालिब का छ्लक़ता़ जा़म

१ गो हाथ को जुंबिश नही, ऑखो मे तो दम है रहने दो अभी साग़र-ओ-मीना मेरे आगे. आस्वाद- या शेर मध्ये बघा गालिब च एक extreme passion व्यक्त होत आहे.हा आता मरणाच्या दारात टेकलेला आहे,शरीराची अवस्था गलितगात्र अशी झालेली आहे, इतकी की हातांची हालचाल ही करण आता मुश्किल आहे (जुंबिश=हालचाल).तर अशा निपचीत अवस्थेत पडलेल्या गालिब समोरुन जेव्हा कोणी दारुचे पेले उचलुन नेउ लागले तर हमारे साह्ब ने कहॉ अरे रुको हातो मे हलचल नही तो क्या अभी ऑखो मे तो दम है अब हम आख से शराब पिते पिते ही दम छोडेंगे.इसलिये

रामचंद्र पुरुषोत्तम जोशी

लेखक तिमा यांनी सोमवार, 14/10/2013 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
रुढ अर्थाने ही समीक्षा नाही. कारण समीक्षाकाराला चित्रपटाच्या तांत्रिक बाबींचीही माहिती असायला हवी. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून काय वाटले ते मांडण्याचा प्रयत्न करतो.. शक्यतो गोष्ट विस्ताराने न उलगडता लिहिली आहे. त्यामुळे , हे वाचूनही ज्यांना हा चित्रपट बघायचा असेल, त्यांनीही हे वाचायला हरकत नाही. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी, नांवाचा चित्रपट आला आहे असे कळल्यावर, तो जरा वेगळा, आशयघन असेल असे वाटले होते. म्हणून बघायला गेलो. रिकामे प्रेक्षागृह पाहून तर, हा नक्कीच अ‍ॅवॉर्ड जिंकणारा असावा असे वाटू लागले होते. चित्रपट सुरु झाला तोच मुळी नरकाच्या दृष्याने!

देरसूचा निरोप..........भाग १ - निशाचर !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 14/10/2013 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
१ निशाचर १९०२ साली माझ्यावर एका अनवट प्रांताचे नकाशे तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हा प्रदेश अत्यंत दुर्दम्य आणि मानवी वस्ती नसल्यामुळे याचे कुठल्याही प्रकारचे नकाशे उपलब्ध नव्हते हे सांगायला नकोच. या प्रदेशाच्या पश्चिमेला आमुर व युसुरी या दोन अवखळ वाहणाऱ्या नद्या आहेत तर पूर्वेला जपानचा समुद्र आहे. व्लाडिओस्टॉकच्या उत्तरेला असलेल्या या प्रदेशाचा इंग्लिश नकाशांमधे ‘ मॅरीटाईम प्रॉव्हीन्स ’ असा उल्लेख आढळतो पण खुद्द या प्रदेशात त्याला युसुरिया म्हणूनच ओळखले जाते, ते युसुरी नदीमुळे.

(चल परत नव्याने सुरू करू सारे)

लेखक धन्या यांनी सोमवार, 14/10/2013 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
चल परत नव्याने सुरू करू सारे नांगरले नव्हते कधीच शेत असे पुन्हा नांगरु पाटाला येईलच पाणी वरच्या त्या पाण्या समेच आपलं बियाणं पेरुन टाकू खुप केले आपण नियोजनाने पीक घेणे त्या पल्ल्याड जाऊन फक्त पीकासाठी राबू असेल अजूनही सळसळता जोम आपल्यातही त्या रगेल पणाची थोडी चव चाखून पाहू चल बरोबर मिळून राबू जरासे भूगर्भातील अंकुरापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू शेतात असणारच उंचसखल थोडेसे खोलगट त्यातूनच आपल्या मेहनतीचा अर्थही नव्याने उमजू
काव्यरस