माझे Chrome extension: 1toN tabs
ह्याची कल्पना सुचायचे श्रेय जाते ते माझ्या आळशीपणाला. मी विविध फोरम्स वर बरेच वाचन करत असतो, आणि त्यातील बर्याचशा फोरम्स वर प्रतिसादांची ५० एक पाने असतात. एका पानावरील प्रतिसाद वाचून संपले की पुढील पानावर जाण्यासाठी Next अथवा त्या छोट्याश्या > चिन्हावर click करण्याचा - खासकरून त्या लॅपटॉप च्या Trackpad वरून - जाम वैताग यायचा.
ह्याला उपाय म्हणून मी मग साधारणपणे २,३,४… अशा पान क्रमांकावर Ctrl + Click करून ती नवीन टॅब्स मधे उघडून ठेवत असे आणि मग पान वाचून संपले की Ctrl +W ने बंद करत असे. पण बहुतांश साईट केवळ पुढची ५ एक पानांच्याच लिंक्स दाखवतात. त्यामुळे ५ पाने वाचून संपली की मग येरे माझ्या मागल्या.
म्हणून विचार केला की समजा असे काही बनवता आले की ज्यात नंबर टाकून पुढील ३० एक पाने उघडून ठेवता आली तर? बहुतांश फोरम्स ड्रुपल अथवा तत्सम प्रणालीवर चालत असल्याने page अथवा p असे काहीतरी त्यांच्या पत्त्यामधे असते ज्याला URL parameterम्हणतात. हा URL Parameter कोणते पान दाखवायचे ते सर्वरला सांगतो. मग हा URL parameter बनवायचा कोड लिहीला जेणेकरून हे सगळे नवीन टॅब एका click मधेच उघडता येतील आणि मग हे extension तयार झाले.
उदा. खालील screen shot बघा. टिचकी मारल्यास मोठे चित्र दिसेल.
ह्याच्या काही मर्यादा.
![]() |
| From mipa |
- हे फक्त गूगल च्या क्रोम या ब्राउजर वरच चालते. वेळ मिळाला की फायरफॉक्ससाठीही लिहीण्याचा विचार आहे.
- हे फक्त अशाच फोरम्स वर चालते जिथे पान क्रमांक तुम्हाला address bar मध्ये page=2 अशा स्वरूपात दिसतो.
- बर्याच साईट्सवर पहिल्या पानावर हा क्रमांक URL मध्ये दिसत नाही त्यामुळे तुम्ही नवीन साईट वर गेलात जिथे तुम्हाला नक्की URL parameter माहिती नाही तिथे तुम्हाला दुसऱ्या पानावर जाउन नक्की URL parameter माहित करून घ्यावा लागेल. तुम्हाला जर आधीपासून हा parameter माहित असेल तर तो parameter name च्या text box मध्ये टाकून तुम्हाला पुढील पाने उघडता येतील.
वाचने
1434
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
अरे वा झकास ! :)
खरतर अँन्ड्रॉइडवाल्या धाग्यात अॅप्स देताना माझ्या मनात विचार आला होता की क्रोम आणि फायरफॉक्स वापरणारी बरीच मंडळी इथे आहेत तेव्हा अॅडऑन्स किंवा एक्स्टेंशनचा असाच धागा यायला हवा,आणि आत्ताच तुझा धागा पाहिला.
इथे क्रोम आणि फायरफॉक्ससाठी मी वापरत असलेली एक्स्टेंशन्स दिली तर चालतील काय ?
मी ही बरीच extensions वापरतो जी मला रोजच्या कामातील खूप वेळ वाचवतात. तीही मला देता येतील.
चांगला उपक्रम आहे लंबूटांग.
लंबूटांग/बाणा तुमच्याकडे काही ईतर उपयोगी अॅडऑन्स किंवा एक्स्टेंशन असतील तर या धाग्यात नक्की द्या.
पण मला जास्त पाने उघडून ठेवलेली आवडत नाहीत. त्यामुळे मी आपले नेक्श्ट चे बटण वापरते. बाकी काय किडे केलेस ते पण जरूर लिही. आणि बाणा तू पण एक धागा काढ.

अरे वा झकास !