Skip to main content

मॉल संस्कृति

लेखक बलि यांनी बुधवार, 16/10/2013 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम मला सामील करून घेतल्याबद्दल मिपा चे आभार. माझं पहिलं लेखन तुमच्यासमोर ठेवतो आहे . चूकभूल माफ असावी . काही दिवसांपूर्वी मी माझ्या फेसबुक च्या भिंतीवर एक चित्र प्रकाशित केले होते. त्यात एक गरीब स्त्री रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत होति. त्या चित्राचा आशय असा होता कि, " कृपया रस्त्यावर भाजी विकणाऱ्या लोकांबरोबर भाव कमी जास्त करू नका. ते आपल्या शेतातील माल कमी किमतीला विकतात. मॉल मध्ये खरेदी करू नका. शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी भाजी विकत असतो. " ह्या चित्रावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. माझ्या मित्राबरोबर मी ह्या विषयी खूप वेळ गप्पा मारल्या .

शैलू

लेखक अक्षरमित्र यांनी बुधवार, 16/10/2013 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : ही व्यक्तीचित्रणे सत्य घटना व पात्रे यांवर आधारीत आहेत. काळ साधारण इ.स. १९८७ ते १९९३ दरम्यानचा आहे. पात्रांची नावे बदलली आहेत. प्रसंगांतील भाषा काही प्रसंगी शिवराळ व अश्लील वाटण्याची शक्यता आहे. ज्यांना अशा प्रकारच्या वाचनाची नावड असेल त्यांनी कृपया येथेच थांबावे.) शैलू मी तेव्हा साधारण ५ वी / ६वीत असेन. आमच्या चाळीतच शैलू राहायची. शैलूचा बाप तिच्या लहानपणीच तिच्या आईला टाकून गेला होता. तो कुठे होता, काय करीत होता, जीवंत होता की नव्हता ह्याचा पत्ता शेवटपर्यंत चाळीतल्या बायांना आणि बाप्यांना लागला नाही.

वानोळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 16/10/2013 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ धीर गंभीर मेघदळ स्तब्ध अचल का वारा ? चंचल मन बेभान चिंतनी पहाटेस पट कोरा रुधिराचे घर विषम स्वरांचे हृदयी अलख चकोरा अंतर्यामी कल्लोळांचा सागर उसळे खारा नकोच वाटे पण ना त्यजवे कर्तव्याचा तोरा आस आंसवे अभिलाषेची गोचिड सम अंगारा पंख निखळले मिटले डोळे अंध दिशा धांडोळा ना कळते आकळते मग हा जन्म कसा वानोळा ? ........................अज्ञात
काव्यरस

देरसूचा निरोप.............भाग-३....कोरियन गाव..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 16/10/2013 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ - निशाचर भाग-२ - डुकराची शिकार ३ कोरियन गाव... सकाळी मी उठलो तर काय सगळेच उठून आवराआवर करत होते. ‘जरा उशीरच झाला उठायला’ मी मनात म्हटले. पण उठल्या उठल्या माझ्या लक्षात कोणती गोष्ट आली असेल तर ढगाळ आकाश. सूर्यमहाराज त्या ढगाआड अदृष्य झाले होते. सगळे जण संभाव्य पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांचे सामान काळजीने बांधत होते. ते बघून देरसू म्हणाला, ‘घाई नाही. आज रात्री पाऊस. आत्ता नाही.’ मी त्याला विचारले हे तो कसे काय सांगू शकतो तर तो म्हणाला, ‘तुम्हीच बघा. छोटे पक्षी येतात जातात.

आपण असं विचित्र का वागतो?

लेखक मन यांनी मंगळवार, 15/10/2013 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
पुरेसे भंपक ,थिल्लर, उथळ किंवा काही बाबतीत chauvinist झाल्याशिवाय लोकप्रिय (मराठीत पॉप्युलर) होणं अवघड आहे. "ठेचून काढा साल्यांना", "फार झालय आता" , "एखादा अणुबॉम्बच टाकला पाहिजे " असे म्हटल्याशिवाय टपरीवर ढोसल्या जाणार्‍या चहाला चव काही येत नाही. अणुबॉम्ब सोडा, गेलाबाजार नुन्सता बॉम्ब टाकणं सोपय का? तुम्ही त्यासाठी काय काय सोसायला तयार आहात? बॅटल् ऑफ ब्रिटन च्या दरम्यान, दुसर्या महायुद्धात नाझींनी बेसुमार बॉम्बफेक करुन इंग्लंड बेचिराख करायचा चंग बांधला. त्यातही लंडन तर भुइसपाट व्हायची वेळ आली.धडाधड बिल्डिंगा पडल्या.(हो. त्याच.

नौदलातील आयुष्य -३

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 15/10/2013 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
हि मी अश्विनी या नौदलाच्या कुलाबा रुग्णालयात काम करीत असतानाची गोष्ट आहे. तो मंगळवार होता. एके दिवशी रात्री दहा वाजता मला नौदलाच्या पोलिस स्टेशन वरून फोन आला कि लवकर रुग्णवाहिका पाठवा. मी चौकशी केली तेंव्हा आमच्या दोन रुग्णवाहिका बाहेर गेल्या होत्या.एक रुग्णाला पोहोचवायला आणि दुसरी आणायला गेली होती. इतर दोन रुग्णवाहिका उभ्या होत्या पण त्यात चालक नव्हता(रात्रपाळीला दोन चालक असत). मी तिथे सूचना देऊन ठेवली होती कि रुग्णवाहिका जशी येईल तशीच पोलिस स्टेशन ला पाठवा. पुढच्या दहा मिनिटात परत दोन वेळा फोन आला कि ताबडतोब रुग्णवाहिका पाठवा.

दुबई सफरनामा - भाग 5 व 6

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 15/10/2013 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
दुबई सफरनामा - भाग 5 हरवले ते गवसले का? 1 ‘अटलांटिस’ची आठवण हॉटेल अटलांटिस पाम प्राचीन ग्रीक पुराणात अटलांटिस नावाचे एक संपन्न समाजव्यवस्था असलेले बेट समुद्रात बुडाल्याचा उल्लेख पाश्चात्य लोकांचा एक विरंगुळ्याचा विषय आहे. ते बेट जसेच्या तसे समुद्रातून परत अवतीर्ण झाल्याचा भास निर्माण करायचा प्रचंड खटाटोप शेखदुबईकरांनी केला नाही तरच नवल! आमच्य़ा सफरीतील ते बेट आता हॉटेलच्या रुपात पहायला निघालो. राजू गाईडने अटलांटिसची माहिती नेहमीच्या झोकात सांगितली.

तुझिया डोळ्यांत तेंव्हा पाऊस दाटला होता …

लेखक घन निल यांनी मंगळवार, 15/10/2013 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुझिया डोळ्यांत तेंव्हा पाऊस दाटला होता … तुझा हात जेंव्हा माझ्या हातून सुटला होता …. तू थांबवलीस असावे तुझी , पण बांध तरीही फुटला होता … ऊन पिऊन अंगणात सुकला पारिजात माझ्या, निळा कोवळा पाऊस मी नियतीस विकला होता … ओंजळीत भरलेस तू श्वास तुझे सुगंधी, मी हात त्यावरी एक झाकला होता … मी न थांबलो तिथे , न वळून बघितले निघताना, विश्वास तुझा तरीही न थकला होता … मी चेतविल्या पुन्हा तुझ्या आठवणी, मी विझलो तेंव्हा त्यांचा उजेड फाकला होता …
काव्यरस

म्हैस माजावर येते

लेखक धन्या यांनी मंगळवार, 15/10/2013 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
माज आलाय म्हशीला सालीला. लहानपणी गाय, म्हैस किंवा अगदी एखादया लहान मुलीचा किंवा स्त्रीचा काही कारणास्तव प्रचंड राग आला की ही शिवी आम्ही मुलं देत असू. गाय किंवा म्हशीला दयायची असेल तर समोरासमोर. स्त्री किंवा लहान मुलगी असेल तर ती व्यक्ती नजरेआड झाल्यावर. त्या वयात शब्दांच्या अर्थाशी काही देणं घेणं नसायचं. अर्थात जेव्हा प्रौढ व्यक्तीसुद्धा जेव्हा एखादयाला आई किंवा बहिणीवरुन शिव्या देते तेव्हा त्या व्यक्तीला तरी कुठे त्या शिवीच्या अर्थाशी घेणे देणे असते.