Skip to main content

(खंड्याचे मनोगत)

लेखक तिमा यांनी शनिवार, 19/10/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थानः खंड्या जन्मल्यापासून,आकाशात भाईबंधांबरोबर थव्याने स्वच्छंद उडायचे आणि फळे खायची हा माझा दिनक्रम होता. फार छान दिवस चालले होते. एके दिवशी आम्ही सग़ळे एका झाडावर येऊन बसलो. खाली काहीतरी चकाकत होते. आमचा ग़टनेता, 'खाली बघू नका" असे ओरडून सांगत होता. तरी आम्ही एकदोघांनी खाली डोकावून पाहिलेच. खाली एक फासेपारधी आरसा हातात घेऊन सूर्याचे प्रतिबिंब आमच्या डोळ्यावर पाडण्याचा प्रयत्न करत होता. अचानक, माझ्या डोळ्यांवर ती तिरीप पडली आणि जी भोवळ आली! तिरमिरत खाली पडलो. पडताना एका फांदीचा फटका माझ्या डाव्या डोळ्याला लागला, एवढे आठवते आहे. त्यानंतर जो शुद्धीवर आलो तो एका पिंजर्‍यात!

अर्थ

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 19/10/2013 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच असा प्रश्न पडतो मला की मी का नक्की का जगतोय? असं कोणतं काम करायचंय ज्याची आतुरतेने वाट बघतोय? हजारो अपेक्षा होत्या माझ्याकडून त्यांना मी जागलो का? ज्यांना जसे हवे होते तसाच त्यांच्याशी वागलो का? आजपर्यंतच्या आयुष्यात किती जला णांच्या उपयोगी पडलो? माझी मदत हवी होती अश्या किती घरांच्या पायऱ्या चढलो? कितीतरी मनं मी दुखावली असतील… कितीतरीजण मला दुरावले असतील…. माझ्या अश्या वागण्याला तेच लोक काळाच्या ओघात सरावले असतील आपल्याच धुंदीत जगलो … हवा तसाच वागलो.... कोणी कधी काही समजावले तर त्यालाच टाळू लागलो .....
काव्यरस

बाहुला बाहुली

लेखक mohite jeevan यांनी शनिवार, 19/10/2013 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी अचानक आम्हाला माहीत झाले की आमची बाहुली मोठी झाली आहे आणि आम्हाला तिचं लग़्न केले पाहिजे.आम्हाला माहित ही झाले नसते दीदीने आम्हाला साग़ितले नसते तर. बाहुली दीदीनेच आम्हाला बनवून दिली होती.लाल ओठ, लांब केसाची तिला कोणताही ड्रेस सुंदर दिसत आसे.कधी आम्ही तिच्या लांब केसाची वेणी बनवत,तिच्याशी खुप ग़ोष्टी बोलत पण आतापर्यंत तिच्या लग़्नाचा विचार आमच्या डोक्यात आला नव्हता.आम्हीतर नेहमी प्रमाणे शाळेतुन घरी आल्यावर आमच्या पुस्तकाच्या कपाटाजवळ एका लहान कप्प्यात तिचं घर केले होते.त्या कप्प्यात आणखिन जाग़ा नव्हतिच. दीदी आमच्याहून मोठी होती.तिला खुप आभ्यास करावयाचा आसे,तिच्यासाठी एक टेबल खुर्ची सुद्ध

जराजर्जर म्हातारपण ....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 19/10/2013 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात एक ओळखीची व्यक्ती देवाघरी गेली.थोडे वाईट वाटले पण का कुणास ठावूक आनंद जास्त झाला.खरे तर गेलेल्या व्यक्ती विषयी असे बोलू नये, पण खरेच वाटले की सुटली बिचारी..काहीतरी ९०/९२ वय असेल..कुणी मोजलंय… ८५ ओलांडली आणि त्यांना लकवा झाला, पुढची ५/७ वर्षे अंथरुणालाच खिळून होती.रोज देवाची पार्थना करायची की मला घेवून चल.पण देव काही प्रसन्न होत न्हवता..परवा झाला..... मागच्या भेटीत इच्छा नसतांना पण त्यांच्या भेटीला जावे लागले.माझा स्वभाव माणूस घाणा नाही आहे पण महिनोन महिने आजारी असलेल्या माणसांना भेटायला जायला नको वाटते.त्यांच्या पण काही अडचणी असतात. पण अशीच एक जनरीत म्हणून जावे ला

ओदिशा - ८: चिल्का सरोवर

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 18/10/2013 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
ओदिशा - १ ओदिशा - २ ओदिशा - ३ ओदिशा - ४ ओदिशा - ५ ओदिशा - ६ ओदिशा - ७ चिल्काच्या पश्चिम किनार्‍यावरील भुवनेश्वरपासून १२० किमीवरील रंभा, भुवनेश्वरहून ९७ किमी व

आमचा खंड्या

लेखक mohite jeevan यांनी शुक्रवार, 18/10/2013 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
‘पोपट घेता का पोपट’ आसे म्हणत एक पोपट विकणारा तो पोपटवाला आमच्या दारात उभा राहुन ओरडत होता,उन्हाळ्याच्याचे दिवस होते, त्याने आमच्या दारात येऊन पिण्यास पाणि माग़ितले, त्याने पोपट आणणारी ती जाळी आमच्या कट्ट्यावर ठेवली. ते पाहुन मी आणि माझी बहीन ग़ीता त्या पिंजर्यातील पोपट पाहु लाग़लो,आम्ही आईवडीलांना ही पोपट दाखवायला बाहेर बोलवले. ते ही आनंदाने पोपट पाहु लाग़ले,पण त्यातील एका पोपटाच्या डोळ्याला इजा झाली होती, तो पोपट इतरापेक्षा ग़प्प होता.

ओदिशा - ७ : जगन्नाथपुरी

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 18/10/2013 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
ओदिशा - १ ओदिशा - २ ओदिशा - ३ ओदिशा - ४ ओदिशा - ५ ओदिशा - ६ प्रथम महाजालावरून पुरी मंदिराबद्दल उचललेली माहिती. त्यात वैचित्र्यपूर्ण अशा मनोरंजक धार्मिक कथा देखील दिलेल्या आहेत. त्यात सत्याचा भाग किती ते आपणच ठरवायचे.

हे शाश्वत ज्ञान नव्हे !

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 18/10/2013 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो: 'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.

कोजागिरी स्पेशल

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 18/10/2013 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमचे येथे कोजागिरी निमित्त्य मसाला दूध प्राशनाचा कार्यक्रम आयोजित केला असून प्रतेकानं आपापल्या घरुन २-२ लिटर दूध (आमच्या प्रोव्हिजन स्टोअरमधूनच. आज म्हणून म्हैस : चौरेचाळीस रुपये लिटर ) तशेच पाव किलो साखर प्रतेकी आणि दूध मसाला (२५ रुपये तोळा) (स्पेशल आलाय आमच्या कडे तोच घ्या) संध्या़ काळी चार वाजेपर्यंत आणून द्यावे. कार्यक्रम बिल्डींगच्या टेरेस वर ठीक ९.३० वाजता (रात्री) सुरु होऊन ११.४५ (रात्रीच) ला संपेल. दूध तापवताना वेगळे काही घडत नसल्याने दूध कसे तापत आहे हे पाहण्यासाठी गर्दी करु नये. बसायची व्यवस्था आपली आपण करायची आहे.

एक धाव पोटासाठी

लेखक बलि यांनी शुक्रवार, 18/10/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी लवकर जाग आली म्हणून सहज फिरायला म्हणून गेलो होतो . थंड हवेचा आस्वाद घेत असताना समोर २ वेगवेगळ्या घटना दिसल्या . एक स्त्री सायकलवरून जाताना दिसली . एकंदरीत पेहरावावरून गरीब घरातली असावी . सायकलला पुढे एक थोडीशी मलिन झालेली पिशवी होती . बहुधा जेवणाचा डबा असावा त्यात . धापा टाकत , हळुवारपणे , सावध गिरीने रस्त्यावरील इतर वाहनांचा अंदाज घेत ती सायकल चालवत होती . प्रचंड घामाघूम झालेली . दुसरी घटना म्हणजे थोड्याच वेळाने तिथून आणखी एक लट्ठ अशी स्त्री मॉर्निंग वॉक साठी जाताना दिसली . तीही प्रचंड घामाघूम झालेली, रस्त्याचा अंदाज घेत चालत होती अधून मधून पळत होती .