बरं झालं मी नोकरी करतो
लेखनविषय:
बरं झालं मी नोकरी करतो
नाहीतर,
लोक म्हणाले असतेच
की कविता करून काय पोट भरतं का
किंवा हसले असते काहीजण कुचेष्टेने
मला...
मग मी ही दाढी वगैरे वाढवून
कवितेने पोट भरायच्या मागे लागलो असतो
धडपडत राहीलो असतो
नसलेलं काहीतरी
सिद्ध करून दाखवायला
आणि भेटत राहीलो असतो जगाला
एक तकलादू स्वाभिमान खिशात घेवून
माझ्या शबनम मधून काढून काढून
आल्या गेल्याला दाखवला असता मी
माझ्यातला एक 'उपेक्षित कलाकार'....
अगदी मला टाळेपर्यंत
ऐकवल्या असत्या लोकांना मी
माझ्या कविता आणि गझला
आयताकृती घडी केलेला
कुठलातरी साप्ताहिक किंवा दिवाळी अंक
बनला असता मग
माझ्या कवी असण्याचा पुरावा....
पण आज?
आज कसंय ना,
की माझी नोकरी हाच पुरावा आहे
जणू
मला लिहिता वगैरे येतं याचा
मी लिहिलेलं
कुठे काही छापून यायलाच हवं
असं काही नाही
शिवाय,
काहीतरी कमवत असल्यामुळे
एक चांगली सोय झालीये;
'कामाच्या रगाड्यात लिहायला वेळ मिळत नाही'
असं मी म्हणू शकतो सतत दांभिकपणे
.........'ताठ' मानेने
आणि ऐकणारेही म्हणू शकतात
'खरंय रे, तुझी लाईन चुकलीच'
बरं झालं मी नोकरी करतो....
- चाणक्य
१७/११/२०१३
वाचने
3557
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
*****
अरेरे
__/\__!!
छानच!
उपेक्षित कलाकार.
In reply to उपेक्षित कलाकार. by प्रभाकर पेठकर
(No subject)
सुंदर कविता!
अगदी मनातून उतरलेत शब्द.....
बहोत खूब!
हं!
छान...
फारच छान
आवडली
भारी !!!
कवितेतल्या भावनांशी सहमत ..
वा! छानच!