Skip to main content

एका शहराची 'खाद्यसंस्कृती'

एका शहराची 'खाद्यसंस्कृती'

Published on 17/11/2013 - 16:28 प्रकाशित मुखपृष्ठ
लेखाचे शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलंच असेल कि लेखाचा विषय किती मोठा आहे . तुम्ही कधी माणूस चरताना बघितलाय का हो ? आणि नुसता गुरासारखा चरत असून परत स्वतःला खवैय्या म्हणताना … लवकर या गावात या … भाई काकांचाच एक वाक्य आहे , खूप गाणी गाणारा गावैय्या नव्हे तसे खूप खाणारा खवैय्या न्हवे. काल अभिषेक ला ….किंवा बेडेकर किंवा अगदीच त्यातल्या त्यात आम्ही पण 'तसले' खातो असे सांगण्यासाठी म्हणून कुठल्यातर पेठेत जाऊन जेवलेले "अस्सल कोल्हापूर हं" असे म्हणत प्यायलेला ( ताक पितात तसा ) पांढरा रस्सा नामक पावडर ने बनवलेला रस्सा हीच या खाद्यसंस्कृतीची सुरवात आहे व शेवट ही … ठिकाणे मात्र इथे खूप कारण 'खात सुटणारे' ( व आता कितीही पैसे मोजून ) खूप … काय ती नावे व काय त्यांची वर्णने … अहाहा ! … बादशाही ??? एक जुनाट वाडा, लोकांना जुन्याचाच मुद्दाम फील देण्यासाठी ठेवलेले ते साहित्य , लोक कसे मुर्ख बनत आहेत हे आनंद लपवत बघणारे ते मालक व अत्यंत घरगुती व कुठेही कमी पैशात मिळेल असले बरेच महागडे जेवण सगळ्यात कहर म्हणजे 'बादशाहीत असंच असतं' याचा अभिमान बाळगून कसल्याही जेवणासाठी रांगा लावणारे लोक बघितले कि खरंच 'अहो धन्यास्मीन ( असेच कायसे !) ओरडावेसे वाटते … खाणारे अनेक लोक असतात . काही आनंदासाठी खातात काही आरोग्यासाठी खातात काही फुकट मिळते म्हणूनही . कोणी , किती , कुठे का व कसे खावे याबद्दल आमचा राग नाही . राग आहे तो त्याला खाद्यसंस्कृती वगैरे गोंडस नावे देऊन जाहिरातबाजी आणि आमच्या या गावात न कसं सगळं सगळं मिळत , इथल्या श्री ची मिसळ ना ( किंवा त्या जागी कुठल्याही गाजलेल्या जागेचे नाव घालावे) तुलनाच नाही हो … वगैरे बाष्कळ बडबड करून आपले खोटे नाणे खरे करण्याच्या प्रयत्न. बाकी या शहराचाच तो स्वभाव आहे … त्याला इलाज नाही. प्रिय व्याक्तीनो , एकदा , भारत सोडा पण किमानपक्षी आपला महाराष्ट्र फिरून या , तिथे खरच काय चांगले आहे ते समजून घ्या व नंतर तुमची संस्कृती जपा … सर्वत्र मेणाचेच पुतळे … आणि परत सांगणे काय कि मेणाचे पुतळे हेच खरे पुतळे . कशासाठी? असो … कसलाही फालतू व चुकीचा अभिमान बाळगणे हेच एकमात्र वैशिष्टय असलेल्या शहरातील लोकांवर मी पामराने काय ( आणि किती ) लिहावे … तुम्ही सुज्ञ असा …
लेखनप्रकार

याद्या 7422
प्रतिक्रिया 33

हां हा हा.....

बादशाही ??? एक जुनाट वाडा, लोकांना जुन्याचाच मुद्दाम फील देण्यासाठी ठेवलेले ते साहित्य , लोक कसे मुर्ख बनत आहेत हे आनंद लपवत बघणारे ते मालक व अत्यंत घरगुती व कुठेही कमी पैशात मिळेल असले बरेच महागडे जेवण सगळ्यात कहर म्हणजे 'बादशाहीत असंच असतं' याचा अभिमान बाळगून कसल्याही जेवणासाठी रांगा लावणारे लोक बघितले कि खरंच 'अहो धन्यास्मीन ( असेच कायसे !) ओरडावेसे वाटते … ओ म्हाराज. बादशाही ची खासीयत म्हणजे तेथील घरगुती जेवण.ते जेवण रास्त किमतीत मिळते.गेली इत्येक वर्षे बादशाहीची जेवणाची चव त्यानी कायम राखलेली आहे. क्वालीटी इज कस्टमर्स मोस्ट डीलाईट हे इथे आल्यावर कळते. असो........ पॉपकॉर्न घेवुन बसतो

@ लोक कसे मुर्ख बनत आहेत >> बरं झालं बादशाहीची आठवण करुन दिलीत.. आज मेस बंद असते. आज मी परत 'मुर्ख' होणार.. *DANCE*
कसलाही फालतू व चुकीचा अभिमान बाळगणे हेच एकमात्र वैशिष्टय असलेल्या शहरातील लोकांवर
याच साठी केला आहे का अट्टाहास? असो........मै भी पॉपकॉर्न घेवुन बसतो .. ;)

ते बादशाही बिदशाही पेशवाई वगैरे सोडा हो पण मिसळ पण पाव भाजीच्या ब्रेड बरोबर खाणाऱ्या शहराला कसली आलेय डोंबलाची खाद्य संस्कृती?

खाणारे अनेक लोक असतात . काही आनंदासाठी खातात काही आरोग्यासाठी खातात काही फुकट मिळते म्हणूनही . कोणी , किती , कुठे का व कसे खावे याबद्दल आमचा राग नाही
मग एव्हढा लेखन प्रपंच कशासाठी

अहो तुमचे सल्लागार जरा पुरेशा कुवतीचे वाटत नाहीत. अन्यथा इतक्या एकाहुन एक जबरदस्त खाण्याचे ठीकाण असतांना तुम्हाला या जागा च का दाखविल्या कुणास ठाउक? यापेक्षा सल्लागार बदला तुम्हाला खरच चांगला अनुभव येईल अहो एकाहुन एक सुंदर हॉटेल आहेत या शहरात आणि डीशेस तर विचारु च नका. !

खरंच ? अनेक ठिकाणी ( याच शहरात नाही तर इतर अनेक गावातही ) फिरून तेथील ठिकाणे बघितल्यानंतर हा अनुभव आहे लेख या शहरातील फक्त अमुकच एका ठिकाणांबद्दल नाहीये तसा उद्देशही नाहीये. पण काही विशेष नसताना त्या ठिकाणांचा नको तेवढा प्रोपोगंडा करत राहणे ही गोष्ट मला याच शहरात घडताना दिसली . कारण तो त्या शहराचा स्वभाव( जो त्याला तेथील जानासामुहाच्या स्वभावामुळे मिळतो ) लेखात ओघाने एक उदाहरण आले आणि त्या उदाहर्णावारच चर्चा चालू झली ? असो … जरा समजून घ्या अवांतर :- कुणाला मिरच्या झ्होमब्ल्या असल्यास क्षमस्व .. चालायचेच …आम्हीही समजून घेऊ . आम्हीही याच शहराचे रहिवासी हे अती अवांतर

केवळ आमचं ते खरं हि एक जानासामुदायिक भावना या शहरात तयार झली आहे . आता मी या लेखात एकदाही या शहराचे नावही न लिहिता केवळ काही खाण्याची ठिकाणे लिहिली तरीही कुणालाही या शहराचे नाव लगेच कळेल. कशामुळे घडला असेल असं . किती जणांना 'गणेश नाष्टा सेंटर' असा लिहिल्यावर ते सांगलीतील एक अत्यंत उत्कृष्ट नाश्ता मिळण्याचे ठिकाण आहे हे माहित्ये ( सांगलीकर सोडून ). किती जणांना औरंगाबाद मधील काही उत्कृष्ट ठिकाणांची नावे माहित्येत. किती लोकांना कोकणातील अशी ठिकाणे माहित्येत फार कशाला मुंबईतील … ( वरची सांग्लीकारांसाठीची अट गावानुसार सर्वत्र लागू ) . केवळ जाहिरातबाजी व प्रोपोगंडा करून खरंच ठिकाणे चांगली होत नसतात त्यासाठी चांगलीच असावी लागतात. हे सत्य उघड करून दाखवल्यावर प्रतिक्रिया ( कुणेकारांच्या ते महित्येच !) येणारच . त्याला इलाज नाही. बहुत काय लिहिणे.

'गणेश नाष्टा सेंटर'
सांगलीच्या विश्रामबाग मधील काय हो? कशाला आठवण करून दिलेत भाऊ तुम्ही ? पाच वर्षांपूर्वीच्या स्मृती जाग्या झाल्या व तोंडाला पाणी सुटले काय ते शिरा पोहे , कट वडा , बासुंदी मधील दुधा सारखा आटवलेला चहा आणि काय तो गुरुवारचा फ़ेमस शाबुवडा … खल्लास !! वालचंदवासियांचे नाश्ता वजा मेस च! अजूनही सुरु आहे काय?

Bakar wadi war ghasarala asata naa, century fast zali asti.. abhyas kami padala tumcha

In reply to by अग्निकोल्हा

माझ्या अनुभवाप्रमाणे पुण्यात चितळ्यांच्या दुकानातुन घेतलेली बाकरवडी मऊसर आणि अजिबात खारट नसते. पुण्याबाहेर मिळणारी बाकरवडी जास्त दिवस टिकावी म्हणुन त्यात कृत्रिम मसाले आणि रंग घातलेली असल्यामुळे ती खारट आणि गडद पिवळ्या रंगाची दिसते. पुणेकर या माहितीत भर घालतीलच.

बाकरवडी पॉप्युलर करणारे चितळे हे मुळचे सातार्‍याचे. नंतर ते सांगली /भिलवडी कडे सरकले. ते मूळ पुणेकर नव्हेत. फक्त दगडूशेठ हे मूळचे पुणेकर. काका हलवाई हे काही फार मोठे प्रस्थ नव्हे. त्यांचे नाव फक्र रीक्षावाल्याला पत्ता सांगण्यासाठी उपयोगी पडते

प्रिय व्याक्तीनो , एकदा , भारत सोडा पण किमानपक्षी आपला महाराष्ट्र फिरून या
+१. प्रत्येक शहरात काही शहराभिमानी लोक असतात.बेंगळूरुत एम्.टी.आर. नामक बरेच जुने हॉटेल आहे.साधे शाकाहारी जेवण जेवायला ४५/६० मिनिटे थांबायची लोकांची तयारी असते.काही जुने राजकारणी/कलाकार जेवताना/ढेकर देतानाचे मोठे फोटो लावले असतात.जगात ह्यांच्याशिवाय चांगली कॉफी कोणालाही बनवता येत नाही असे स्थानिकांचे म्हणणे असते. दुसरे एक विद्यार्थी भवन नामक उपाहारगृह आहे. येथे फक्त केवळ पाच पदार्थ मिळतात्.त्यामुळे मालक अभिमानाने 'आम्ही मेनु कार्ड ठेवत नाही' असे सांगतात. वर म्हंटल्याप्रमाणे बादशाही सारखे 'एम्.टी.आर्./विद्यार्थी भवन जेवून तृप्त झालो' असे सांगण्याचे पद्धत आहे.

In reply to by बॅटमॅन

बंगळूर, मैसूर इ. शहराना कर्नाटकाचे पुणे म्हणता येईल त्यामुळे असल्या गोष्टी तिथे घडत असल्यास नवल नाही. ;) कर्नाटकाचे मुंबई म्हणता येईल असे एकही शहर नाही हे प्लीजच नोटा. --- कर्नाटकच्या गडचिरोलीत रहाणारी - साती.

In reply to by साती

अगदी सहमत!!! बंगळूर म्हैसूर हे कर्नाटकचे पुणेच! अन कर्नाटकची कशाला, अन्य कुठल्याच राज्याची मुंबै नाही. :) लिटरली अन फिगरेटिव्हली सुद्धा.