साहित्यः
४ वांगी, १ मोठा कांदा, १ छोटा बटाटा, तेल, मोहोरी, हिंग, हळद, केप्र गोडा मसाला, केप्र झटपट उसळ मसाला, तिखट, मीठ
कृती:
१) कांदा उभा चिरून घ्या. वांगी आणि बटाटाही उभट चिरा. (त्याचे ज्युलिअन्स करून घ्या.)
२) एका पसरट कढईमध्ये (किंवा पॅनमध्ये) ४-५ टबलस्पून तेल घ्या. मध्यम आचेवर तेल तापत ठेवा.
३) तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करून घ्या.
४) मग त्यात कांदा टाकून चांगला परतून घ्या. मग त्यात वांगी आणि बटाट्याचे ज्युलिअन्स टाकून चांगले परतून घ्या.
५) गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा थोड्या कमीच आचेवर ठेवा. अधून मधून भाजी परता. भाजी करपणार नाही याची काळजी घ्या.