अहेर
http://www.misalpav.com/node/6840#new या धाग्यावर मी काही विचार लिहिले होते पण धाग्याचा कात्रज होऊ नये यासाठी हा वेगळा धागा काढीत आहे. वेगवेगळ्या लोकांचे विचार ऐकायला मला आवडेल .
परवा मी माझ्या बायकोला एक वेगळा विचार बोलून दाखविला. तिने या विचाराला पूर्ण पाठींबा दर्शविला आहे.( मुलांचा पाठींबा हळू हळू तयार करण्यात येत आहे )आपल्या मुलांच्या लग्नात (याला अजून चार ते पाच वर्षे आहेत) तीन समाजसेवी संस्थांचे स्वयंसेवक पावतीपुस्तक घेऊन तेथे बसवायचे. या तीन संस्था म्हणजे १)श्री बाबा आमटे यांचे आनंदवन २) वनवासी कल्याण आश्रम ३) टाटा कर्करोग रुग्णालय.
सर्व आमन्त्रीताना त्यांच्या इच्छा आणि क्रयशक्तीप्रमाणे त्यांच्या आवडीच्या संस्थेला. तिथल्या तिथे देणगी देण्याचे आवाहन करायचे. हि गोष्ट आमंत्रण पत्रिकात सुद्धा लिहून आवाहन करायचे कि अहेर किंवा पुष्प गुच्छ आणण्या ऐवजी तेच पैसे या संस्थाना देणगी म्हणून द्यावेत. जेवढी देणगी लोकांकडून येईल तितकीच देणगी माझ्या खिशातून.
जेवण अतिशय साधे आणि फक्त सायंकाळी. उगाच लोकांना रजा घ्यायला लावून मनुष्य तास फुकट आणि लोकांची मनातून नाराजी.
लोकांना आगाऊ सूचना किंवा आवाहन आमंत्रण पत्रिकेतून केले (आहेर/ भेटवस्तू ऐवजी आपण रोख व चेक घेऊन यावे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे वरील संस्थाना दान द्यावे आणि वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत) तर लोकांची मानसिक तयारी राहते शिवाय वरील संस्थांची सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रत्यक्ष कार्य लोकांना माहित असल्याने त्याबद्दल शंका राहत नाही.
आपण बहुसंख्य लोक सामाजिक कार्याला मदत करायची आहे अशा मनोवृत्तीचे असतो पण आळशी पणामुळे( यात मी स्वतः येतोच) प्रत्यक्ष काम होत नाही म्हणून हा सुचवलेला एक पर्याय आहे. यात जाता जाता काही समाजकार्य होईल असा विचार आहे.
मुळ हे सर्व का आले याची काही कारणे. माझे लग्न १९९२ साली झाले त्या सुमारास माझ्या मित्राचे लग्न झाले तेंव्हा त्याच्या लग्नात आहेर म्हणून १२ भिंतीवरची घड्याळे आली . त्याकाळात शंभर रुपयात येणारे आणि मोठा अहेर दिसेल अशी ती एक वस्तु होती.
आम्ही काही जवळच्या नातेवाईकाच्या लग्नात अहेर म्हणून रेमंडचा शर्ट आणि पैन्ट पीस दिला (साल १९८५) तोच आम्हाला परत आहेर म्हणून(नजरचुकीने) आला. यात परत अहेर देताना त्याच माणसाला त्यानेच दिलेला अहेर परत करू नये हि साधी गोष्ट कार्यबाहुल्यामुळे त्यांना लक्षात आली नसावी. पण हा एक आमच्यासाठी डोळे उघडणारा अनुभव ठरला. यानंतर आमच्या आईवडिलांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला कि कोणाच्या हि लग्नात अहेर म्हणून फक्त रोख पैसे द्यायचे आणि आपल्या मुलांच्या लग्नात अहेर देणे घेणे काहीही नाही.
यानंतर अनेक लग्नांमध्ये मी एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली कि बायका एकमेकीना साड्या घेतात. त्या त्यांच्या स्वतःच्या पसंतीच्या असतात नेसणार्या बाई च्या पसंतीच्या नव्हे. आता जवळच्या नातेवाईकाने साडी दिली तर ती आवडली नाही तरी ती कोणालाही देत येत नाही आणि आवडली नाही म्हणून नेसता येत नाही. म्हणजे परत एक असून अडचण आणि नसून खोळंबा. ( बर्याच वेळेला स्वतः च्या आईने घेतलेली साडी सुद्धा स्त्रियांना आवडत नाही पण तिचे मन दुखवू नये म्हणून ती एक दोनदा तिच्या समाधानासाठी साडी नेसून मग तो कपाटाच्या कोपर्यात जाऊन पडून राहते. हीच गोष्ट जवळच्या नातेवाइकान्च्या बाबतीत हि घडते
अशा अनेक साड्या माझ्या बायकोला आमचे लग्न झाल्यावर आल्या ( आमचा साखरपुडा, लग्न नंतर तिच्या भावाचा साखरपुडा लग्न नंतर दोन्हीकडे डोहाळे जेवण बारसे इ इ.मुळे तिला इतक्या भारीपैकी साड्या आल्या कि पुढच्या दहा वर्षात माझ्या बायकोला आपल्या पसंतीची साडी घेता आली नाही. अगोदरच्या डझनावारी साड्या ब्लाउज शिवायचा राहिल्यामुळे कपाटात पडून होत्या आणि हि गोष्ट मी आमच्या आई वडिलांना सांगितली तेंव्हा त्यांना ती पटली आणि ते जेंव्हा आमच्या घरात समारंभासाठी साडी घेण्याची वेळ येते तेंव्हा आपले बजेट सांगतात( किंवा तेवढे पैसे सरळ पाकिटात घालून देतात) आपल्याला त्या बजेट मध्ये साडी आली तर ठीक अन्यथा वर काही पैसे भर घालून त्या व्यक्तीला आपल्या पसंतीची साडी घेणे शक्य होते.
हें असे करायचे असते किंवा हि काय पद्धत झाली का किंवा लोकांना कसे दिसेल या विचाराने बहुसंख्य लोक गतानुगतीकाप्रमाणे चालत असतात. बर्याच वेळेला असे काही करायचे धैर्य नाही म्हणूनही लोक धोपट मार्गाने चालत राहतात.
आज साधारण मध्यम वर्गीय स्त्रीच्या कपाटात पन्धरा ते पन्नास ( काही वेळा अजून खूप जास्त) न आवडणाऱ्या साड्या पडून असतात. किंवा फार तर वर्षात किंवा दोन वर्षात एकदा नेसली जाते. हा एक अनुत्पादक खर्च आहे त्यामुळे याला कुठे तरी काट बसावी असेही वाटते.
मी यात फार मोठा सामाजिक बदल घडावा अशी अपेक्षा करतो आहे असे नाही पण जर दहा कुटुंबांनी जरी साड्या न्बद्दल असा विचार केला तर पंचवीस पन्नास हजार रुपये सामाजिक कार्याला उपलब्ध होतील. शिवाय त्या स्त्री ला आपल्या आवडीची साडी विकत घेत येईल.
या सर्व गोष्टींचा विचार करताना मला वर उल्लेखलेली गोष्ट जाणवली कि लग्नात महागडा शो पीस आहेर म्हणून दिला जातो जो त्या जोडप्याच्या आवडीचा असतोच असे नाही. मग तो देताही येत नाही आणि ठेवताही येत नाही. देणार्याच्या भावना अनमोल असतात पण खर्च वायफळच होतो. हीच गोष्ट पुष्पगुच्छाची. कोणत्याही लग्नाला डझनावारी पुष्पगुच्छ येतात ज्यांची किंमत आजमितीला प्रत्येकी दोनशे ते एक हजार पर्यंत आहे. हे कुठे ठेवावे हा प्रश्न असतो. टाकताही येत नाही आणि ठेवायला जागा नाही. मग हा पण खर्च वायफळच आहे.
असे अनेक खर्च आहेत जे आपण सत्कार्याला खर्च करू शकतो. असे खर्च करण्यापेक्षा तेच पैसे आपण आवाहन करून लोकांना सामाजिक कार्यासाठी दान देण्याबद्दल विनवू शकतो.
हि माझी कल्पना आहे यावर मला लोकांची मते जणू घेणे आवडेल. यात मी काही नवीन जगावेगळी कल्पना मांडतो आहे असा माझा मुळीच दावा नाही. अशी कल्पना इतर अनेक लोकाना सुचली असेलच किंवा यावर काथ्याकुट झाला असेलही जर तसे असेल तर त्याचा दुवा येथे मांडावा अशी विनंती आहे
लग्नात किती लोकांना बोलवायचे, सजावटीवर किती खर्च करायचा आणि जेवणावर किती खर्च करायचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.
वाचने
21682
वाचनखूण
प्रतिक्रिया
74
डॉक्टर तुमचे विचार पटले . मी
In reply to डॉक्टर तुमचे विचार पटले . मी by दिव्यश्री
+१०० उत्क्रुष्ट कल्पना.
आहेर देवू पण नये आणि
In reply to आहेर देवू पण नये आणि by मुक्त विहारि
+1 टु मुवी .
In reply to आहेर देवू पण नये आणि by मुक्त विहारि
भारी आहेर
In reply to आहेर देवू पण नये आणि by मुक्त विहारि
मान्य
In reply to मान्य by सुबोध खरे
आवडले. तुमची कल्पना खूप
मी असे एक लग्न पाहिले आहे
In reply to मी असे एक लग्न पाहिले आहे by पिलीयन रायडर
मुळात शेकडो माणसं बोलावुन
In reply to मुळात शेकडो माणसं बोलावुन by सस्नेह
आपल्याकडे काय अन कुठेही काय
In reply to आपल्याकडे काय अन कुठेही काय by मारकुटे
लग्न समारंभ, सण हे आथिक
In reply to लग्न समारंभ, सण हे आथिक by अनुप ढेरे
ईद, ख्रिसमस हे सुद्धा येतात
In reply to ईद, ख्रिसमस हे सुद्धा येतात by मारकुटे
हनुका पण येत असावं
In reply to हनुका पण येत असावं by अनुप ढेरे
सगळंच येतं हो.. माणसाला खर्च
आम्ही ज्या संस्कृतीत
In reply to आम्ही ज्या संस्कृतीत by मारकुटे
बक्षीस = आहेर
In reply to बक्षीस = आहेर by मुक्त विहारि
बक्षिस काय अन अहेर काय
डॉ़क यु सिरीअसली रॉक! >> ___/\_O
नक्कीच चांगला उपक्रम होईल. पण
In reply to नक्कीच चांगला उपक्रम होईल. पण by कवितानागेश
हल्ली लग्नकार्यात आहेर घेत
In reply to हल्ली लग्नकार्यात आहेर घेत by दिव्यश्री
ग्रहमख म्हणजे काय ?
In reply to ग्रहमख म्हणजे काय ? by खटपट्या
ग्रहयज्ञ ,ग्रहमख, देवब्राह्मण
In reply to ग्रहयज्ञ ,ग्रहमख, देवब्राह्मण by दिव्यश्री
असं आहे होय, झालं असेल
In reply to असं आहे होय, झालं असेल by खटपट्या
लग्नाचा अल्बम ,सीडी ई.
दानधर्म करायचा तर सुमडीत
In reply to दानधर्म करायचा तर सुमडीत by अनुप ढेरे
>>दानधर्म करायचा तर सुमडीत
In reply to >>दानधर्म करायचा तर सुमडीत by सूड
+२
In reply to दानधर्म करायचा तर सुमडीत by अनुप ढेरे
उगाच हवा कशाला?
In reply to उगाच हवा कशाला? by सुबोध खरे
पाच वाजता माझी बायको ब्युटी
In reply to पाच वाजता माझी बायको ब्युटी by टवाळ कार्टा
हो, मेक अप १ तासात असेच नव्हे
In reply to हो, मेक अप १ तासात असेच नव्हे by रेवती
आता जगातला सगळा नट्टापट्टा
In reply to हो, मेक अप १ तासात असेच नव्हे by रेवती
ह्याच मुळे लग्नात वधुने
In reply to ह्याच मुळे लग्नात वधुने by माझीही शॅम्पेन
सरळ सरळ
In reply to उगाच हवा कशाला? by सुबोध खरे
थाटामाटात लग्न करणं ही अनिष्ट
In reply to थाटामाटात लग्न करणं ही अनिष्ट by अनुप ढेरे
+१
In reply to दानधर्म करायचा तर सुमडीत by अनुप ढेरे
सहमत
काहि नविन
अहेर - एक नाजूक विषय
In reply to अहेर - एक नाजूक विषय by नितीन पाठक
पाठक साहेब
कल्पना उत्तम आहे हे या
तथाकथित अनावश्यक , तथाकथित
In reply to तथाकथित अनावश्यक , तथाकथित by गवि
इकॉनीमी विरुद्ध गरज.
In reply to इकॉनीमी विरुद्ध गरज. by बॅटमॅन
इकोनोमी "चालते" ती
In reply to इकोनोमी "चालते" ती by गवि
क्वांटिटी हे एकमेव
In reply to क्वांटिटी हे एकमेव by बॅटमॅन
ब्याम्याशेठ..इथे खर्चिक
In reply to ब्याम्याशेठ..इथे खर्चिक by गवि
मुद्दा इतकाच आहे की बाकीची
In reply to ब्याम्याशेठ..इथे खर्चिक by गवि
लग्न या विषयाने तुला असं वाटत
लग्न या विषयाने तुला असं वाटत असेल तर lodge ऐवजी ताज मधे राहणे.. बिझनेस क्लास प्रवास, रेनोल्डऐवजी पार्कर पेन अथवा मारुतीऐवजी मर्सिडिज असे सर्व झगमगणे त्यात ॲडव. मग हिस्सा बघू टोटल इकोनोमीतला.हे सगळं खिशात असलेल्या / खात्रीने येणार्या पैशातून होत असेल तर तो ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पण जर ते केवळ इकॉनॉमीला वर नेते या समजूतीने त्याकडे दुर्लक्ष केले तर (१) ऋण काढून सण साजरा करू नये या आपल्या जुन्या म्हणी मागील शहाणपण उमजले नाही आणि (२) अमेरिकेच्या डेट-बेस्ड (खरं तर डेट-हूक्ड) प्रयोगांनी इकॉनॉमी वर नेण्याच्या अनुभवाच्या गेल्या दोनतीन दशकांच्या प्रवासावरून आणि त्याच्या सर्व जगाच्या अर्थव्यवस्थेला बसलेल्या प्रचंड फटक्यावरून काहीच बोध घेतला गेला नाही, असेच होईल.In reply to लग्न या विषयाने तुला असं वाटत by डॉ सुहास म्हात्रे
खर्चिक लग्ने म्हणताना कर्ज
In reply to तथाकथित अनावश्यक , तथाकथित by गवि
येस! यालाच म्हणतात प्रांजळता
In reply to तथाकथित अनावश्यक , तथाकथित by गवि
मतभेदाबद्दल खेद असण्याचे कारण नाही
In reply to तथाकथित अनावश्यक , तथाकथित by गवि
तुमचा प्रतिसाद बहुतेक
फारच चांगली चर्चा इथे
आहेर जर रोखीने दिला तर दिलेली
लेखन आवडले. १०० टक्के पटले
चांगला धागा
सत्पात्री दान
सत्पात्री दान
इट इज अबाऊट देम, नॉट अस!
In reply to इट इज अबाऊट देम, नॉट अस! by पिवळा डांबिस
पि डा साहेब,
हे म्हणजे परदेशात
In reply to हे म्हणजे परदेशात by निनाद मुक्काम …
आपले म्हणणे कुठेतरी पटते.
आहेर ... संताप आणणारा शब्द !
एक्दम बरोबर
चांगली चर्चा.
In reply to चांगली चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१००% सहमत.
असाही अनुभव...
उत्तम कल्पना
In reply to उत्तम कल्पना by मैत्र
फारच उत्तम उदाहरण आहे !
उत्तम कल्पना!
एक सुचना करू का?
In reply to एक सुचना करू का? by ऋषिकेश
साहेब,
एक सुंदर उदाहरण.....
नेमके हेच
बर्याच लग्न समारंभात अन्नाची