मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फ़्यंड्री...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनप्रकार
राम राम मंडळी. मंडळी, मिपावर फ्यंड्रीबद्दल उत्तम लिहून आल्यानंतर आणि इतरही ठिकाणी फ़्यांड्रीवर येता जाता चर्चा व्हायला लागल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सूकता लागली होती. मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. पारंपरिक चित्रपटापेक्षा काही तरी वेगळे मराठी चित्रपटातून यायला लागले आहे. वास्तवतेवर आधारित सकस कथा, ध्वनी, छायाचित्रण,कलाकार, या आणि विविध अशा बदलांनी मराठी चित्रपट जरा हटके यायला लागले आहेत. मराठी चित्रपटांना विषय फुलवता यायला लागले थेटरात शांतपणे चित्रपट बघायला जावे, इथपर्यंत मराठी चित्रपटांनी भरारी घेतली आहे, असे वाटायला लागले आहे.

मराठी भाषा

Bhagwanta Wayal ·
लेखनविषय:
ममराठी भाषादिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी भाषा भाषा किती छान आपुली भाषा किती छान महाराष्ट्राची शान आपुली भाषा किती छान संत महत्मे होऊन गेले मराठी ग्रंथ लिहुन गेले आपुल्यासाठी ठेऊन गेले अद्वयताचे ज्ञान 'आपुली भाषा किती छान कवी लेखक अनेक झाले मराठी साहित्य लिहुन गेले आपल्यासाठी ठेऊन गेले शब्दरत्नांची खाण आपुली भाषा किती छान तिला बोलावी तशी ती बोलते तिला ओळवावी तशी ती वळते परप्रांतीयांना ही सहज कळते वाटे मला अभिमान आपुली भाषा.... माय लेकराचे नाते आपुले ह्रदयामध्ये त्याला मी जपले नाजुक शब्दांमध्ये गुंफले चरणी ठेऊन ध्यान आपुली भाषा किती छान बी डी वायळ

वांग्याची भाजी

Pearl ·
साहित्यः ४ वांगी, १ मोठा कांदा, १ छोटा बटाटा, तेल, मोहोरी, हिंग, हळद, केप्र गोडा मसाला, केप्र झटपट उसळ मसाला, तिखट, मीठ कृती: १) कांदा उभा चिरून घ्या. वांगी आणि बटाटाही उभट चिरा. (त्याचे ज्युलिअन्स करून घ्या.) २) एका पसरट कढईमध्ये (किंवा पॅनमध्ये) ४-५ टबलस्पून तेल घ्या. मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. ३) तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करून घ्या. ४) मग त्यात कांदा टाकून चांगला परतून घ्या. मग त्यात वांगी आणि बटाट्याचे ज्युलिअन्स टाकून चांगले परतून घ्या. ५) गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा थोड्या कमीच आचेवर ठेवा. अधून मधून भाजी परता. भाजी करपणार नाही याची काळजी घ्या.

श्वास लय

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
स्फटिक निर्मळ स्वर अभंग रोम रोमी चाळ ते दूर कोठे गाव माझे अंतरीचे चाळते श्वास लय; अदृष्य सारे लुप्त शब्दी वेधते चांदण्या गर्दीत कांही हरवलेले शोधते त्या आभा भासात अजुनी संभ्रमी मन धावते गोडशी हुरहूर अंगी; स्वप्न नादी लावते पाश मय रागा-स्वरांचे सोसलेले घाव ते चंदनी आनंद त्यांचे बाळकोषी दावते …………… अज्ञात

मेन्स टॉक

अज्ञात ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(शुक्रवारी संध्याकाळी जुन्या मित्रांची ओली-सुकी पार्टी करायचा बेत एका गार्डन रेस्टारंन्ट मध्ये ठरला. सगळ्यांना कधीनव्हे ते बायकांकडुन परमिशन पण मिळाली) कारे जानव्या! उरफाट्या न्हाई आला अजुन? … बन्ट्या (ठुश्या वैतगलेल्या सुरात) तुले लै आठोन येउन र्‍हायली त्याची? असन भहिनमाय कुठ्तरी फकाल्या तानत! ...ठुश्या तु काहुन अंगार मुतुन र्‍हायला बे? ...बन्ट्या अंगार? भाडखाव परवा घरी आला अन भांड्न लाउन गेला आम्च्यात. हीले सायचा हा वहीनी नाय म्हन्नार तं, काय, " ताई! कश्या आहात? बरं चाल्लये ना? आजकाल काम जरा वाढलयं वाटतं साहेबांच? फीरायला नाही गेले एव्हाना कुठं?

अहेर

सुबोध खरे ·
http://www.misalpav.com/node/6840#new या धाग्यावर मी काही विचार लिहिले होते पण धाग्याचा कात्रज होऊ नये यासाठी हा वेगळा धागा काढीत आहे. वेगवेगळ्या लोकांचे विचार ऐकायला मला आवडेल . परवा मी माझ्या बायकोला एक वेगळा विचार बोलून दाखविला. तिने या विचाराला पूर्ण पाठींबा दर्शविला आहे.( मुलांचा पाठींबा हळू हळू तयार करण्यात येत आहे )आपल्या मुलांच्या लग्नात (याला अजून चार ते पाच वर्षे आहेत) तीन समाजसेवी संस्थांचे स्वयंसेवक पावतीपुस्तक घेऊन तेथे बसवायचे.

शेजारचा फँड्री !!!

सुधीर मुतालीक ·
फँड्रीची मी आतुरतेने वाट बघत होतो. त्यामुळे पहिल्या दिवशी पहिला शो हे माझे अगदी ठरले होते. सर्वात मागच्या दोन रांगांमध्ये आराम खुर्च्या आहेत. त्यामुळे मी आणि बायको आरामात सिनेमा सुरु होण्याची वाट बघत मस्त रेललो होतो. पहिला शो असूनही गर्दी ब-यापैकी होती. नागराजला - फँड्रीचा कथा लेखक आणि दिग्दर्शक - लगेच SMS करून अभिनंदन केले. " nashikacha pahilaach show full ! Congrats Nagraj !!!. सिनेमा सुरु झाल्यावर नेहमी प्रमाणे लोक येतेच होते.

हिन्दुत्ववादी ते हिन्दुत्वविरोधक मतांतराचा प्रवास

वैनतेय ·
समस्त मिपाकार मंडळी, राम राम! बरेच लेख / प्रतिक्रिया वाचताना मला एक गोष्ट ठळकपणे जाणवली, ती म्हणजे आपल्यापैकी अनेकजण "पुर्वी हिन्दुत्ववादी होते". याचाच अर्थ आपले मतांतर झाले आहे. ते का झाले हे समजावुन घेण्याचा हा प्रयत्न... १. आपण कशामुळे हिन्दुत्ववादी विचारांकडे झुकलात? २. असे काय घडले ज्यामुळे आपण हिन्दुत्वविरोधक झालात? वरील दोन्ही प्रश्नांची ऊत्तरे परिस्थिती, घटना, व्यक्ती, वाचन, संघ शाखा, शिवसेना अथवा भा.ज.पा.

मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी); मराठी भाषादीन २७ फेब्रुवारी २०१४ च्या निमीत्ताने चर्चा

माहितगार ·
विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले.त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

इंटरनेट चे भविष्य

मंदार कात्रे ·
संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय नुकत्याच अमेरिका स्थित MDIF नामक संस्थेने संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा देण्याची योजना जाहीर केली आहे . या योजने अंतर्गत जगभरातील कोणत्याही देशात कोणत्याही निर्बंधा शिवाय/ सरकारी नियंत्रण किंवा हेरगिरी ला टाळून मोफत इंटरनेट वापरता येणार आहे. कंपनी पुढच्या काही वर्षात पृथ्वीभोवती अवकाशात फिरणाऱ्या शेकडो क्यूब -SAT उपग्रहांचे जाळे निर्माण करणार आहे ,ज्यायोगे आज ज्याप्रमाणे जीपीएस सेवा दिली जाते ,त्याच प्रमाणे भविष्यात फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा दिली जाइल .