बेगम अख्तर
“हमरी अटरियापे आओ सांवरिया, देखा देखी बलम हो जाये
आओ साजन तुम हमरे द्वारे, सारा झगडा खतम हो जाये”
ठुमरी
“ये मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया”
गझल
पंकज मलिक. सी एच आत्मा व सेहगल ही मंडळी आमच्या आधीच्या पिढीतली. बेगम अख्तर देखिल त्याच पिढीतली. या पुरुष मंडळींच्या आवाजातला दर्दीला भारदस्तपणा अजून ऐकायला बरं वाटत असलं तरी एका दृष्टीने पाह्यला गेलं तर ही पुरुष गायक मंडळी किंचितशी कालबाह्य झालीयत, कारण नंतर तलत मेहमूद, गुलाम अली, भूपिंदर, जगजीत सिंग यांची inning सुरु झाली. तसं बेगम अख्तरचं नाहीं.