मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खेळाडूवृत्तीचा आणि सर्वसमावेशकतेचा अभाव असलेले खेळ; उर्फ क्रीडा, संस्कृती इत्यादी क्षेत्रातील कंपुगिरी

माहितगार ·
सर्व सामान्य जनतेच लक्ष देशाच्या राजकारणाकडे लागल असताना भारतीय सर्वोच्च न्यायालय क्रिडाक्षेत्रातील राजकारणावर (BCCI) उपाय योजण्यात व्यस्त झाले आहे. क्रिडा, संस्कृती, सहकार, शिक्षण या क्षेत्रातील कंपुगिरी हल्ली राजकारणातील राजकारणावर ताण करताना दिसते आहे.
Many of the associations by virtue of being not-for-profit companies, abuse the system of proxies, and retain control by controlling the memberships. The BCCI uses India in their logo, they use government land for stadium, they use state security for conducting matches, yet they are not agreeable to come under the RTI Act!

साहित्य सहवास

बिपिन६८ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
25th Mar 2014 २५ मार्च १९३३ - २६ जुन २००१ प्रिय वपु, आज तुमचा वाढदिवस, आपल्या समाजात नावाच्या मागे कै लागले कि जयंती म्हणायची पद्धत, पण खरेच तुम्ही गेलात का ? ज्या नियती बद्दल तुम्ही एवढे लिहून ठेवलेत ती नियती अशी का रुसली तुमच्या वर आणि का आमच्या पासून केवळ ६८ व्या वर्षी हिरावून घेतले? ६८ हे जाण्याचे वय नक्कीच नाही, पण शेवटी ग दि माडगुळकर म्हणून गेले तसेच आहे " पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" आज तुम्ही असतात तर आमच्या सारख्या असंख्य चाहत्यांनी, तुमच्या कुटुंबीयांनी नक्कीच तुमचे सहस्त्रचंद्र दर्शन केले असते, पण आता या सगळ्या जर तर च्या गोष्टी.

प्रवास

पैसा ·
लेखनविषय:
बरेच दिवसांनी नवर्‍याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते. आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं. तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे, जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो. स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं. मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली. रूळ क्रॉस करणार्‍या बर्‍याच मंडळीचं निरीक्षण करून झालं. एक पाणचट चहा पिऊन झाला. शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली.

लोकशाहीचा सांगावा

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
लोकशाहीचा सांगावा

आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा ।
पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥

लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर ।
जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥

होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई ।
करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥

धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तृत्व गहाण ।
नको स्वत्वाचा व्यापार । राखा आत्म्याचा सन्मान ॥

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - १

स्पार्टाकस ·
भारताच्या उत्तरेला हिमालयाच्याच तोडीची पण कमी लांबीची एक पर्वतरांग पसरलेली आहे. काराकोरम ! काराकोरम पर्वतरांग सुमारे ५०० किमी पसरलेली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टीस्तान, भारतातील लडाख आणि चीनच्या झिअ‍ॅन्ग्जँग प्रांतात पसरलेल्या या पर्वतश्रेणीत जगातील काही सर्वोच्च शिखरांचा समावेश होतो. काराकोरमचा सुमारे २८ ते ५०% भाग ग्लेशीयर्सने भरलेला आहे. हिमालय (८-१२%) आणि आल्प्स (२-३%) च्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त आहे. धृवीय प्रदेशांचा अपवाद वगळता जगातील सर्वात मोठी ग्लेशीयर्स इथे पसरलेली आहेत.

त्रिशंकु संसदेची शक्यता; प्रणव मुखर्जी: २०१४ ते २०१७ , येती ३ वर्षे भारतीय राजकीय सरकस सांभाळण्याची घटनात्मक आव्हाने

माहितगार ·
जुलै २०१२ मध्ये राष्ट्रपती पदावर आरूढ झालेले प्रणव मुखर्जी साधारणतः जुलै २०१७ पर्यंततरी राष्ट्रपतीपदावर राहतील. एकदा का स्पष्ट बहुमत उभारून सरकार स्थापन झालेकी भारताच्या राष्ट्रपतींना राजकीय काम फारसे राहत नाही. पण तेच त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रपतींची घटनात्मक निर्णय घेताना सत्वपरीक्षेची वेळ असते. राज्य विधानसभेत त्रिशंकु राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि प्रश्न घोडेबाजारकरूनही मिटलाच नाहीतर तर राष्ट्रपती राजवटीचा मार्ग खुला आहे. पण लोकसभेच्या बाबतीत तसे नाही.

निवडणुक २०१४: अनुभव ३: केजरीवाल मुंबईत (२)

आतिवास ·
अनुभव १ अनुभव २ लोकसभा मतदारसंघ ‘मोठे’ असतात हे माहिती आहे, पण ते किती मोठे असतात हे प्रत्यक्ष त्या मतदारसंघाविषयी माहिती घेतली की कळतं. ईशान्य मुंबई मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. ते आहेत शिवाजीनगर (मानखुर्द), मुलुंड, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी आणि भांडूप. २००९ मध्ये या मतदारसंघात सुमारे १६ लाख मतदार होते – गेल्या पाच वर्षांत यात अजून चार लाख मतदारांची भर पडली आहे असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.

शैक्षणीक वळण

रामदास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
साक्षात्कार वगैरे मला कधीच होत नव्हते पण गेल्या शुक्रवारी आमच्या एचआर डिपार्ट्मेंटनी एका एक दिवसीय झंझावाती कार्यशाळेला मला पाठवल्यानंतर हे असं काहीतरी मला व्हायला लागलं आहे. आयुष्यात शिकायचं थांबू नका-आयुष्य तुम्हाला रोज काहीतरी शिकवत राहील असं काहीतरी एक मुलायम कोमलांगी सांगत होती. आता खरं सांगायचं तर हे दिवस काही शिकण्याचे आहेत यावरून विश्वास उडलेल्या लोकांसाठी ही कार्यशाळा होती, म्हणजे आमच्या कंपनीने "पुढील शिक्षणास निकामी" असा शेरा मारलेल्या लोकांचा एक जथ्था या कार्यशाळेला पाठवला होता.