Skip to main content

बेबी

लेखक mohite jeevan यांनी शनिवार, 16/08/2014 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
'हँलो,कोण आहे?कोणी बोलत का नाही?कोण आहे तेथे?', कोणीतरी लपल्यासारखे तीला वाटत होते, पण ती त्या दरवाज्याजवळ जाण्याचे धाडस करु शकत नव्हती.कारण त्याची तीला भिती वाटत होती.तो येणार व लहान पणाच्या आठवणी काढुण मला त्रास देणार व मी वेड्यासारखी करणार, रात्रीची वेळ कशी तरी काढत होती. जस जसे त्या दरवाजाचा आवाज वाढत होता,तसे ती जोरात ओरडली, 'नाही....नाही.......सोड मला माझ्या डोक्यातुन दुर जा,' डोळे मिटवले......तीला त्या बंद डोळ्यामागच्या आधांराची सवय झाली होती बहुतेक....हळु हळु तीच्या कानात आवाज येऊ लागला, 'बेबी, कम बेबी, मी तुला आझाद करेन, तुला मुक्ती देईन, मी सांगतो ते तु कर,' हे एकताच तीने आपले जो

भारतातील १० वैशिष्ठपुर्ण बाबी

लेखक पारस यांनी शनिवार, 16/08/2014 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
१. "India" हे नाव "Indus" ह्या नदीमुळे पडले आणि सिंंधु व हिंंदु एकञ येउन " हिंंदुस्तान". २. बुध्दिबळ हा खेळ भारतात उदयास आला. ३. बीजगणित, ञिकोणमिती आणि कलनशास्ञ हे विषय भारतात निर्माण झाले. ४. संख्या मुळ पद्धत आणि दशांश पद्धत भारतात तयार झाल्या. ५. जगातले पहिले ग्रेनाइट मंदिर Brihadeshwara मंदिर, तनजावूर , तामिळनाडु येथे आहे. ८० टनाच्या एका ग्रेनाइट दगडापासुन त्याचा कळस बांधला आहे. ६. सापशिडी हा खेळ १३ व्या शतकात कवी संत ङ्यानदेव Gyandev यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव मोक्षपट आहे. त्यामध्ये शिडीचा उपयोग केलातर स्वर्गाचे तसेच सापाने गिळल्यावर नर्काचे दार भेटते असा समज असे. ७. जगामधले सर्वात उंची वरचे क्रिकेटचे मैदान चैल, हिमाचल प्रदेश येथे आहे. ते डोंगरची सपाटि करुन १८९३ मध्ये बांधले आहे. ते समुद्रसपाटी पासुन २४४४ मीटर उंच आहे. ८. ७०० व्या शतकात जगातील सर्वात मोठे विद्यापीठ तक्षशीला येथे निर्माण झाले. तेथे जगातुन १०५०० पेक्शा जास्त विद्यार्थी १६० पेक्शा जास्त विषयांचा अभ्यास करायाचे. ९. नौकावाहन आणि नौकापरिवहन हि कला ६००० वर्षांपुर्वी सिंधु नदीच्या खोर्‍यात जन्माला आली. १०. १८९६ मध्ये भारत हा जगामध्ये एकमेव देश होता की जिथे हिरे सापडायचे.

बोर्डिंग गेम्स्

लेखक समर्पक यांनी शनिवार, 16/08/2014 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रवासवर्णनामध्ये या खेळांचा उल्लेख केला, तेव्हा एका प्रतिसादामध्ये अधिक माहितीविषयी विचारणा केली होती, त्यासाठी हा लेख. संदर्भासाठी साठवणीतीलच छायाचित्रे वापरली आहेत.

कहां गये वो लोग?--रणशूर

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 16/08/2014 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28220 कहां गये वो लोग?--बाबूकाका http://www.misalpav.com/node/28221 कहां गये वो लोग?--आजीबाई http://www.misalpav.com/node/28230 कहां गये वो लोग?--नाथा http://misalpav.com/node/28237 कहां गये वो लोग?--मंग्या मित्रांबरोबर एकदा असाच कट्टा जमलेला असतांना विषय तब्येतीवर घसरला.

आजार!

लेखक कवितानागेश यांनी शनिवार, 16/08/2014 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजार हल्ली मनोविकारांवर काही वाचन झाले. ज्या रोगाचे हजारात निदान ७ जण बळी अहेत, अश्या एका कष्ट्साध्य रोगाबद्दल काही विशेष मुद्देसूद माहिती मिळाली. त्या निमित्ताने हे प्रकटन. स्किझोफ्रेनिया -Paranoid schizophrenia या आजाराबद्दल खरं तर फार लहानपणीच कळले होते. कधीतरी मेंदूतच काहीतरी बिघडते आणि हार्मोनल इम्बॅलन्स होतो इतके नक्की माहित होते. हे लोक अचानक विनाकारण चिडतात, त्यांचा सोशल सेन्स संपतो. पण अजूनही अश्या पेशंट्स चे नक्की कधी, कसे काय बिघडते हे अज्ञातच आहे. फक्त कुठल्यातरी गोष्टीचा अचानक आत्यम्तिक 'गंड' निर्माण होतो, आणि सतत त्याबद्दल बोलतात. रोजच्या गोष्टी, जमेनाश्या होतात.

जगाच्या कल्ल्याणा संतांच्या विभुती (साईविलास) !!!!!!!!

लेखक विलासराव यांनी शनिवार, 16/08/2014 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही. प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती. शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) जिवनात चढउतार येतच असतात. हार-जीत,सुख-दुख,मान-अपमान, मनासारखे -मनाविरुद्ध काही घडणे अशा विरोधाभासी घटनांची निरंतर साखळी म्हणजे आपले जीवन. म्हणुन घडतय ते १००% आपल्या नियंत्रणात नाही याचा बोध व्हावा यासाठीच साधनावीधी.सोप्या शब्दात सांगायचं तर दोन्हीही विरोधाभासी घटनांमधे मनाचे संतुलन ढळु न देणे. कुठल्याही टोकावर न जाता मध्यम मार्गाने चालणे.

One Night Stand आणि आपण सगळे

लेखक पिंपातला उंदीर यांनी शनिवार, 16/08/2014 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत .

किस्सा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 16/08/2014 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक वाचलेला किस्सा सादर करीत आहे.. इंदोर मध्ये एक धनी मराठी परिवार रहात होता..पिढीजात श्रीमंती व त्या बरोबर परिवार रसिक पण होता व श्रद्धाळू पण.. कोजागरी च्या रात्री त्यांचा कडे रात्र जागवण्याचा मोठा कार्यक्रम असे. नामवंत गायक कलाकार हजेरी लावत असत. व नंतर केशरी दूध सर्व उपस्थितांना दिले जाई व कार्यक्रमाची सांगता होत असे... एका वर्षी असाच कार्यक्रम झाला ..पाहुणे गेल्यानंतर यजमान व यजमान बाई आवराअवर करत होते.. त्यांचे केशरी दूध घ्यायचे राहिले होते..

मेरा नाम करेगा रोशन .....

लेखक मार्मिक गोडसे यांनी शनिवार, 16/08/2014 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतील दिवस म्हणजे गोल्डन मेमरीज असतात.शाळेतील प्रत्येक दिवस म्हणजे एक मजाच असायची.शाळेत मस्ती आणि खोड्या काढणे यासाठीच जवळ जवळ सर्व मुल येत असतात कारण शिकण्यासाठी क्लास लावलेला असतोच.पण खोड्या काढण्याची मजा काही वेगळीच असते. आमच्या शाळेत मजा म्हणून प्रत्येक मुलाला त्याच्या वडिलांच्या म्हणजेच बापाच्या नावाने हाका मारायचे.जर कोणाचे वडील रिक्षा चालवणारे असतील तर त्याला रिक्षा म्हणून हाका मारायचे आणि जोर जोरात हसायचे.जे मुल हसायचे अशा मुलांमध्येच एका मुलाच्या वडिलांचे नाव तानाजी होते.त्या मुलाचे नाव काय होते हे आठवत नाही कारण त्याला सर्व जन “ताना” म्हणायचे.ताना हा मस्ती करण्यात एक नंबर होता.जे

फेसबुक आणि संवादक्षम मराठी संकेतस्थळे प्रेरणा साम्य आणि फरक कोणते ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 15/08/2014 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
आदूबाळ यांचा मिपावर मंत्रचळाच्या मागोव्यावर (http://www.misalpav.com/node/28407) असा एक विश्लेषणात्मक आणि चर्चा रंगलेला लेख बर्‍याच जणांनी वाचला असेलच. त्यापुढे जाऊन काही अधिक माहिती चर्चा करून हवी आहे. १) संवादक्षम मराठी संकेतस्थळांच्या विवीध धागाचर्चात सहभागी होणार्‍या मंडळींचे मुख्य एरीआ ऑफ इंटरेस्ट/सब्जेक्ट्स कोणते असतात, सहभागाच्या मागच्या मुख्य प्रेरणा कोणत्या असतात इत्यादी प्रकारचे अधीक खोलवर खीस पाडून विश्लेषण आणि अभ्यास उपलब्ध करून हवा आहे.