Skip to main content

सदू भारतीय क्रिकेट टीम मध्ये?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 20/08/2014 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीयुत सदानंद सुखात्मे उर्फ सदू, खरा मुंबईकर. सचिवालयात कार्यरत. मुंबईत सध्या अच्छे दिन आल्या नसल्याने, सदूची सुखाची नौकरी सुरु आहे. सकाळी ९ वाजता सदू घर सोडतो आणि सांयकाळी ५.३० वाजता पुन्हा घरात. अशी ८ तासाची सुख-चैनीची सरकारी नौकरी. खरोखरंच सदू नावाप्रमाणे सुखात्मे अर्थात सुखी आहे. सचिवालयातल्या इतर बाबूंप्रमाणे सदूला ही क्रिकेटचा भयंकर शौक. क्रिकेट वर ‘एक्स्पर्ट कॉमेन्ट’ देण्यात सदू स्वत:ला पटाईत समजत होता. कुठल्या खेडाळूने कसे खेळले पाहिजे त्याचे विशद वर्णन तो करत असे. इंग्लंड सिरीजमध्ये भारतीय टीमची दुर्दशा पाहून इतरांप्रमाणे तो ही दुखी होता.

एक लघुकथा.....अमान

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 20/08/2014 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बापाचे नाव ‘नासिर’ माझे नाव बुलू. हे माझे लाडके नाव. खरे नाव माझे मलाच माहीत नाही. आमच्या वस्तीचे नाव पुरा. नर्मदेच्या किनाऱ्यावर या वस्तीच्या आसपास आमच्या जमिनी होत्या. वस्तीवर दहा एक घरे असतील. एकूण लोकसंख्या असेल शंभर ! आब्बाचा मी खूप लाडका होतो. माझा भाऊ ‘अमान’ हा माझा लाडका होता. शेतात दिवसभर उंडारायचे आणि गिळायला घरी अम्माच्या मागे भुणभुण लावायची एवढेच काम आम्ही करीत असू. एकदा एका घोड्याला आम्ही विहीरीत पाडले पण कोणी आम्हाला रागावले नाही. आब्बाने तर माझ्या पाठीत लाडाने गुद्दा घातला. आमचे तसे चांगले चालले होते पण कसे त्याची आम्हाला कल्पना असायची कारण नव्हते.

पुण्यात काम करणाऱ्या "खेळघर " या संस्थेविषयी….

लेखक काव्यान्जलि यांनी बुधवार, 20/08/2014 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार. पालकनीती परिवाराचे खेळघर वंचित मुलांच्या सर्जनशील शिक्षणासाठी काम करत आहे.सलगअठरा वर्षं, अनेक आव्हानांशी सामना करत खेळघराचं काम उभं राहिलं, पुढं गेलं. या वाटचालीत आपल्यासारख्या मित्र परिवाराचा फार मोठा वाटा आहे. आज कोथरूडमधल्या लक्ष्मीनगरयेथील १५० मुलां-मुलींबरोबर खेळघराचं अर्थपूर्ण शिक्षणाचं काम जोमदारपणे चालू आहे. वस्तीतील शंभराहून अधिक मुलं-मुली आत्मविश्वासानं आपल्या पायावर उभी आहेत. प्रसन्न संवेदनशीलतेनं आयुष्य जगत आहेत. मात्र हे काम लहानशा गटाचं आणि एकाच झोपडवस्तीतील मुला- मुलींबरोबर केलं जाणारं छोटेखानी काम राहिलेलं नाही.

मुळीच नाही

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 20/08/2014 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
मुळीच नाही शहाणेच सर्व जितके, तितका मुळीच नाही वेडा असून तुमच्या इतका मुळीच नाही सच्चा न मी तरीही, लुच्चा मुळीच नाही माझे न जे तयाची, इच्छा मुळीच नाही तत्वास जे न जपती, जपती कसे स्वतःला स्वतःवरीच ज्यांची, निष्ठा मुळीच नाही किती वेगळाच आहे, हा हर्ष तुझ्या डोळी परका जरी न असला, सख्खा मुळीच नाही त्या विठ्ठलास जातो भेटावयास जेंव्हा माझ्या शिवाय तेथे दुसरा मुळीच नाही पुढती कुणी कुणाच्या, मागे कुणी पडे माझ्या समोर असली चर्चा मुळीच नाही इच्छा मनात यावी, लावून वेड जावी मग कोण काय म्हणतो, पर्वा मुळीच नाही हा कोण रे समोरी, आहे अपूर्व माझ्या या आरशात माझी, प्रतिमा मुळीच नाही - अपूर्व ओक
काव्यरस

पेरू : भाग ५ : अल्टिप्लॅनो

लेखक समर्पक यांनी मंगळवार, 19/08/2014 23:23 या दिवशी प्रकाशित केले.

विदेशातील प्रवासाचा महत्वाचा पैलू म्हणजे 'ब्रँड इंडिया'! जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा कळत नकळत आपल्या देशाचे आपण ब्रँड प्रमोटर बनतो. या संदर्भात बरेच अनोखे, कधी मजेशीर अनुभव आले. भारतीयांना तेथे सरसकट 'हिंदू' म्हणतात, आणि स्पॅनिशमध्ये ह उच्चाराचा लोचा असल्याने काहिसा 'इंदू' असा उच्चार करतात. आणि आपण पेरूविषयी जितके जाणतो त्याच्या कैक पटींनी अधिक ते भारताविषयी जाणतात.

जवाबदेही

लेखक रसिया बालम यांनी मंगळवार, 19/08/2014 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाशीव विस्मरणात गेली वस्ती आता एक झाली मनं तशीच राहीली जातीभेदांनी विटाळलेली उतरंड संपली, भिंती पडल्या अजुन करतो जातीचा उपहास हा 'भटक्‍या' तो 'मागास' उच्चत्वाचा मिथ्या आभास दोन अनोळखी भेटताना नवीन ओळख होताना आडनाव महत्वाचं वाटते कारण त्याची जात सांगते -- रसिया बालम

तिखट-मिठाच्या पुर्‍या ----

लेखक निवेदिता-ताई यांनी मंगळवार, 19/08/2014 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
तिखट-मिठाच्या पुर्‍या ---- साहित्य-- दोन वाट्या कणीक, दोन चमचे बेसन पिठ, दहाबारा लसूण पाकळ्या, दोन चमचे जिरे व दोन चमचे ओवा, लाल तिखट एक चमचा, हळद अर्धा चमचा, कोथिंबीर भरपुर बारीक चिरुन, मीठ चवीनुसार, हिंग थोडासाच, तेल तळणीसाठी. कॄती- - ओवा-जिरे बारीक करुन घ्या, लसुण पण वाटून घ्या, कणीक व बेसन पिठ एक्त्र करुन घ्या, त्यात चवीनुसार मिठ टाका,सर्व वरील इतर साहित्य एकत्र करा, पिठामध्ये एक चमचा कडकडीत मोहन घाला, पिठ घट्ट मळून घ्या, छोट्या पुर्या लाटून कडकडीत तेलात तळुन घ्या. गरम खा ----गार खा --कशाही चांगल्याच लागतात.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 19/08/2014 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती.

एक फ़्रेंच कथेचा भावानुवाद :- बुल दे सुफ़.........

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी मंगळवार, 19/08/2014 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कथेचे नाव आहे "बुल दे सुफ़" म्हणजेच इंग्रजीत "बटरबॉल" अन मायबोलीत बोलल्यास "चरबीचा गोळा". युद्धकालिन फ़्रेंच मध्यमवर्गावर प्रकाश टाकणारी ही कथा समाजवादासोबतच वर्गविग्रह इत्यादी तात्कालिन फ़्रेंच समाजातल्या प्रॉब्लेम्स वर प्रकाश टाकत एक मनुष्य स्वभावाचा मासला देखील ठरते........ लेखक :- हेन्री रेने गाय दे मोपासां....... मी मुळ संकल्पना अन ढाचा तोच ठेवायचा प्रयत्न करुन ह्या नितांत वास्तवदर्षी कथेची पुनर्निर्मिती करायचे धैर्य केले आहे...... जसं जमलंय घ्या गोड मानुन..... आज सकाळपासुनच रोवेन गावावर मळभ पसरल्यागत होत होतं...... इतकं की कसतरीच व्हाव......