Skip to main content

भुताळी जहाज - २ - यूबी - ६५

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 08/08/2014 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींचे अनुभव अनेकदा जहाजांच्याच वाट्याला येत असले तरी यात एका पाणबुडीचाही समावेश आहे - यूबी-६५ !! पहिल्या महायुध्दाला तोंड फुटल्यावर जर्मनीने ज्या अनेक पाणबुड्या बांधण्यास सुरवात केली त्यापैकी एक म्हणजे यूबी-६५. १९१६ मध्ये या हॅम्बुर्ग इथे या पाणबुडीचं बांधकाम सुरु झालं. बांधकाम सुरु असतानाच या पाणबुडीवर ती शापित असल्याचा शिक्का बसण्यास सुरवात झाली. पाणबुडीचा मुख्य सांगाडा बांधण्याचंं काम सुरु झाल्यावर आठवड्याभरातच सांगाड्याला आधार देणारे दोरखंड तुटून वर असलेला भाग दोन कामगारांवर कोसळला!

अधुरी प्रेम कहाणी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 07/08/2014 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
अधुरी प्रेम कहाणी *************************************** माधव जोशी मंडईत भाजी घेत होता.. माधव रिटायर्ड झाला होता..तसा संसार मार्गी लागलेलाच होता.. मोठा मुलगा लग्न करुन अमेरिकेत सेटल झालेला मुलिचे हि लग्न झाले होते ..ति बंगलोरला.. भाजी घेत असताना त्याचे बाजुला लक्ष गेले.. ति पाठमोरी उभी होति.. बहुतेक स्मिता साने च असावी... माधव तिच्या कडे गेला अन म्हणाला "तु स्मिता साने" ना.. अन तु माधव जोशी..ति हसत म्हणाली.. अरे काय...

स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 07/08/2014 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्य रचना आणि अंदमान येथे लिहिलेल्या उर्दू गजलांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं - हम ही हमारे वाली है या ध्वनीफीतीचे प्रोमो नुकतेच ऐकले/ पाहिले. अमिताभ बच्चन यांच्या घनगंभीर आवाजातील निवेदन या ध्वनीफीतीला लाभलं आहे. जसपिंदर नरूला, सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, स्वराधीश बलवल्ली, शंकर महादेवन, जावेद अली, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, शान आणि साधना सरगम अशा गुणी गायकांच्या आवाजात या रचनांचा आस्वाद घेता येईल. सावरकरांच्या तीन मूळ आणि सात अनुवादित अशा एकूण १० रचनांचा समावेश या ध्वनीफीतीमध्ये आहे.

फेकूचंद...

लेखक बबन ताम्बे यांनी गुरुवार, 07/08/2014 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात कुणी ना कुणीतरी फेकूचंद उर्फ थापाडया भेटलेला असतो. मग तो ग्रुपमधला असू शकतो/शकते, ऑफीसमधला किंवा नातेवाईकांमधे पण असू शकतो/शकते.(आपण पण आयुष्यात कधीतरी फेकूगीरी केलेली असतेच. खोटं का बोला!) पण काही लोकांना सतत थापा मारायची सवयच असते. अशा लोकांना आम्ही "बंदुक्या" किंवा "ठ्ठो " असे चिडवायचो. काही काही थापा मात्र कायम लक्षात रहातात. आमच्या ऑफीसमध्ये असाच एक बंदुक्या होता. आमच्या साहेबाचा पी.ए.! साउथ इंडीयन होता. आपण त्याचे नाव अय्यर होते असे समजू. (खरे नाव देत नाही.) एक दिवस ऑफीसमधे अय्यरने मला विचारले, "क्या रे, कल दांडी मारा ऑफीसको?

भुताळी जहाज - १ - इव्हान व्हॅसिली

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 07/08/2014 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
अमानवीय आणि अतिंद्रीय शक्तींबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. आपल्याला आलेल्या अनुभवांचं शास्त्रीय स्पष्टीकरण करणं हे कधीकधी अशक्यं होतं आणि रुढार्थाने त्याचं भूतं-खेतं किंवा 'बाहेरचं' असं वर्गीकरण केलं जातं. अर्थात अमानवीय अनुभवांच्या ज्या कहाण्या सांगितल्या जातात त्या प्रत्यक्षात कितपत खर्‍या असतात आणि कोणाच्या सुपीक मेंदूतून बाहेर पडलेल्या असतात हा भाग अलाहिदा. गेल्या कित्येक शतकांपासून मानवाने सप्तसागरांत संचार केला आहे. या संचारासाठी वापरण्यात आलेल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांनी सागराचा तळही गाठलेला आहे.

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ५

लेखक कविता१९७८ यांनी बुधवार, 06/08/2014 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447 माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४ - http://misalpav.com/node/28482 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ५ आजचा ७ वा दिवस , १ एप्रिल २००९ .

श्रद्धांजली.... स्मिता तळवलकर .

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 06/08/2014 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत चित्रपट ,टीव्ही मालिका, नाटके यात अभिनेत्री व निर्माती म्हणून अतिशय जिद्दीने काम करणारी स्मिता तळवलकर आज आपल्यात नाही. वयाच्या ५९ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला ही सर्व रसिकाना चटका लावणारी घटना आहे. कृष्णधवल अशा दूरदर्शनवर निवेदिका म्हणून तिने आपल्याला रसिकांसमोर प्रथम आणले. त्याला फार मोठा काळ लोटला आहे. त्यानंतर स्वत: चा अस्मिता चित्र या संस्थेमार्फत सर्व समस्यांशी झगडत तिने अवंतिका सारख्या मालिकेची तर कळत नकळत, चौकट राजा अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केलीय.

ताई दीर तुझा गं वेडा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 06/08/2014 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असा चित्रपट आपण मराठीतही करायचा हे आम्ही त्याच वेळी ठरवले होते. त्याच्या आधिच, म्हणजे साधारण १९९४ सालच्या आधिच आम्ही एक गाणे लिहिले होते. ते आमच्या आगामी चित्रपटासाठी योग्य आहे असे आम्हाला वाटले. आज आम्ही ते रसिकांच्या चरणी अर्पण करत आहोत. तरी सुध्दा एक खुलासा करावासा वाटतो. ही कविता संपूर्ण पणे स्वतंत्र आहे आणि तीचा इतर कोणत्याही मराठी किंवा हिंदि किंवा इतर कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या कवितेशी कोणताही संबंध नाही.

असा मी तसा मी--भाग-४

लेखक अविनाश खेडकर यांनी बुधवार, 06/08/2014 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
चार आण्याचा प्रसाद देवाजीच्या दारात अन् डोंगराएव्हढ्या कामना भक्ताच्या मनात. ****************************** सगळ्यांच्याच जीवनाच एक सामाईक धोरण आयुष्याची दोन टोकं जिवण आणि मरण. ****************************** साव कुनाला म्हणावं, सगळेच हात बरबटलेले साधु-संताचे मठही एथं गुन्हेगारीत गुरफटलेले. ****************************** अशीच तु मला एकदा उदास्-उदास दिसलीस तेव्हा पासुन मला तु माझ्यासारखीच भासलीस. ******************************* आजकालचे प्रेमविवाह चार दिवसात विटतात त्याच्या तिच्या मनामध्ये तिचे त्याचे दोष साठतात. ******************************* भीती नावाची हडळ एक आपल्याच