खेळ मांडला !!
लहानपणी आम्ही भावंड (मी ,मोठा भाऊ ,दोन चुलत बहिणी ) दुपारच्या वेळी घरात लपाछुपी खेळायचो . घरात शक्य होईल तितका गोंधळ घालणे , हा त्या मागचा उद्देश असायचा. घरातील मोठयांना आमच्या आवाजाचा त्रास व्हायचा . पण आम्हाला त्याची फिकीर नव्हती. मग खेळात आणखी मजा यावी म्हणून आम्ही दोघादोघांचे दोन गट तयार केले. आपल्या सोयीसाठी माझ्या आणि चुलत बहिणीच्या गटाला आपण "आघाडी" असं नाव देऊ . आणि मोठा भाऊ व दुसर्या बहिणीच्या गटाला "युती" म्हणुया. एकदा आघाडीने युतीला शोधायचं मग युतीने आघाडीला शोधायचं असं ठरलं . आणि खरंच आम्हाला खेळण्यात जास्त मजा येऊ लागली .
मिसळपाव