मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विचारपूस करणारे आत्मीय (?) सहकर्मी

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जवळपास तीन महिन्यापूर्वी एस्कॉर्ट हॉस्पिटल मध्ये हृदयाची बाय पास सर्जरी झाली होती. प्रदीर्घ सुट्टीनंतर आज प्रथमच कार्यालयात गेलो. आजारी माणूस ठीकठाक होऊन परतल्यावर त्याची विचारपूस करायची आपल्यात पद्धत आहेच. साहजिकच आत्मीय (?) सहकर्मींचे फोन हे येणारच किंवा ते भेटायला तरी येतीलच. मी ही तैयार होतोच. पहिला फोन सुनीलचा आला. हा ही एक औलिया आहे आणि त्याच माझ्यावर अत्यंत स्नेह आहे. फोनवर जोरदार आवाजात म्हणाला, पटाईत कसा आहे? मी म्हणालो मस्त आहे. तो म्हणाला, काही लाज नाही वाटली तुला, धर्मराजाने पुन्हा धक्का देऊन परत पाठवीले याची.

कोळाच्या शेंगा

दिपक.कुवेत ·
मागे जसे कोळ-पोहे दिलेले त्याच कोळातल्या ह्या शेंगा. जीरा राईस किंवा साध्या वाफाळणार्‍या भाताबरोबर अप्रतिम लागतात. सोबत पापड आणि लोणचं/खारातली मिरची द्यायला विसरू नका. Shenga 1 साहित्यः १. उकडलेल्या शेंगा - १ बाउल २. अर्ध्या नारळाचं घट्ट दुध ३. चिंचेचा कोळ - पाव वाटि ४. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं पेस्ट - ३ चमचे ५.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ४

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१८३६ मध्ये पीटर वॉरन डीसने नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर प्रस्थान ठेवलं. डीसच्या मोहीमेत एकूण १२ जणांचा समावेश होता. मॅकेंझी नदीच्या मुखापासून पश्चिमेला पॉईंट बॅरो आणि पूर्वेला हडसनच्या उपसागरापर्यंत किनार्‍याने प्रवास करण्याची डीसची योजना होती. फोर्ट चिपेव्यॅन गाठून त्यांनी हिवाळ्यासाठी मुक्काम केला. १ जून १८३७ ला डीसने फोर्ट चिपेव्यॅन सोडलं आणि महिन्याभरात ग्रेट बेअर सरोवर गाठलं. तिथून निघाल्यावर ९ जुलैला त्यांनी मॅकेंझी नदीच्या मुखाने आर्क्टीकचा किनारा गाठला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?

बबन ताम्बे ·
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील.

परिपूर्ण एकटेपणा

पिंपातला उंदीर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जी ए कुलकर्णी यांच्याबद्दल आणि त्यांच्या एकांतप्रियतेबद्दल बद्दल अनेक कथा ऐकल्या आहेत . मुंबई पुणे सारखी जागा सोडून त्यांनी धारवाड या छोट्या जागी राहणे पसंद केले . त्याना भेटायला अनेक लोक राज्याच्या कानाकोपर्यातून यायची . त्यांना ते फारस आवडायचं नाही . म्हणून ते बाजूला खेळणाऱ्या मुलाला बोलावून त्याला घराला बाहेरून कुलूप लावायला सांगत आणि स्वतहा आत बसून राहत . एका creative genius ची फ़क़्त एक लहर म्हणून त्याकडे बघतात का ? मुळात तुमचा हक्काचा एकांत मिळवण्यासाठी तुम्हाला जी ए सारख creative genius असणेच आवश्यक आहे का ?

रटाळ 'फायंडिंग फॅनी'

समीरसूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे परीक्षण चार-पाच दिवस आधी लिहून ठेवले होते. कार्यालयात खूप काम असल्याने अर्धवट पडून होते. कसेबसे पूर्ण करून आज टाकतोय. चित्रपटाप्रमाणेच परीक्षण देखील रटाळ असल्यास उदार अंतःकरणाने क्षमा करावी. यथा पिक्चर, तथा परीक्षण!

टी.सी.

कविता१९७८ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल ट्रेनच्या परतीच्या प्रवासात एक किस्सा घडला, वेस्टर्न लाईनला आता लोकल्स डहाणु पर्यंत झाल्या आहेत आणि तेव्हापासुन इथे लोकल मध्ये लेडीज डब्यात लेडीज टी.सी. दिसते. पालघर या स्टेशनापासुन डहाणु हे तिसरे आणी शेवटचे स्टेशन असल्याने लोकल तशी रीकामीच होती त्यामुळे बर्‍याच बायका सीटवर पहुडल्या होत्या. ती टी.सी पालघरहुन चढली व एकेक करुन तिकीटे चेक करु लागली. माझ्या मागच्या सीटवर एक काकु झोपल्या होत्या त्यांना तीने उठवले व तिकिट मागितले.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ३

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१८१९ मध्येच विल्यम पेरीच्या नेतृत्वाखाली नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेने इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं. एडवर्ड सॅबीन, फ्रेड्रीक विल्यम बीची यांचा या मोहीमेत समावेश होता. हेकला आणि ग्रिपर या दोन जहाजातून नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्याचा पेरीचा बेत होता. बर्फापासून वाचण्यासाठी जहाजाच्या सांगाड्यावर खनिजाचा लेप देण्यात आला होता. जहाजांच्या बाहेरील बाजूस ३ इंचाच्या लाकडाचा थर देण्यात आला होता. त्याशिवाय हवाबंद अन्नाचे डबे त्यांनी आपल्याबरोबर घेतले होते. इंग्लंडहून निघाल्यावर रॉसच्या मार्गाने न जाता पेरीने थेट लँकेस्टर साऊंडची दिशा पकडली. खाडीतील बर्फातून वाट काढत २८ जुलैला तो खुल्या समुद्रात पोहोचला.