Skip to main content

Lumber Spondylosis .............

लेखक नितीन पाठक यांनी सोमवार, 09/02/2015 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी .............. दि. 27 आणि 28 डिसेंबर रोजी मित्राच्या मुलीचे कोल्हापूर येथे लग्न होते. त्यानिमित्त अहमदनगरहून कोल्हापूर ला जायचा योग आला होता. कोल्हापूरला जाण्यासाठी लक्झरी बस होती. आम्ही दोघे सकाळीच मित्राच्या घरी पोहोचलो. मित्राच्या घरी गेल्यावर थोडे फार कामे केली. सामान, बॅग उचलणे इ इ कामे केली. बस मध्ये मागील बाकावर बसून, साधारण 8 तास प्रवास करून आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. संध्याकाळचा सीमंतपूजन कार्यक्रम झाला. जेवणे झालीत आणि आम्ही सर्व जण झोपी गेलो. दुस-या दिवशी सकाळी उठलो तर काय ... माझी पाठ पूर्णपणे आखडून गेली होती. प्रचंड पाठ दुखत होती. मला तर सरळ असे उभे रहाता येईना.

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा - २०१५

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 09/02/2015 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यांची ११ वी विश्वचषक स्पर्धा शनिवार १४ फेब्रुवारी २०१५ या दिवशी सुरू होत आहे. १४ फेब्रुवारीला न्यूझीलँड वि. श्रीलंका हा स्पर्धेतील सर्वात पहिला सामना खेळला जाईल. १८-२१ मार्च या चार दिवशी ४ उपांत्यपूर्व फेरीचे सामने आहेत, उपांत्य फेरीचे २ सामने २१ मार्च व २४ मार्च रोजी आहेत व अंतिम सामना रविवार २९ मार्च या दिवशी खेळला जाईल. ही स्पर्धा न्यूझीलँड व ऑस्ट्रेलिया हे दोन देश संयुक्तपणे आयोजित करीत आहेत.

रोम आणि व्हेनिस

लेखक अज्ञात यांनी रविवार, 08/02/2015 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी एकदाचे ठरले भटकंती करायला जायचे. एकदाचे म्हणण्याचे कारण म्हणजे प्लान साधारण ५-६ दिवसाचा ठरला होता आणि छोट्या अडिज वर्षाच्या मुलासोबत फिरायला जाणे म्हणजे १० वेळा विचार करायला लागतो . या आधी बर्याच वेळा फिरण्याचा प्लान ' आता नको मुलगा थोडा मोठा झाल्यावर बघू ' या सबबीवर बायकोचे आणि माझे एकमत झाल्यामुळे बारगळलेला असतो पण आता युरोप ला आलोच आहे कामानिमित्त तर निदान आसपास ची २-४ जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे तरी किमान बघू ,क्या पता कल हो न हो ... आणि या मुद्यावर (परत) एकमत झाले.( क्या पता कल हो न हो फिलिंग : हे फिलिंग फक्त ट्रिप च्या खर्चाशी रीलेटेड होते.

अमृतसर ६ - खरेदी

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 08/02/2015 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
अमृतसर १ - अमृतसर २ - अमृतसर ३ - अमृतसर ४ - अमृतसर ५ - खरंतर मुंबईत राहणार्‍याला बाहेर गेल्यावर आठवण म्हणुन घ्यायच्या शोभेच्या वस्तूंव्यतिरिक्त काहीही घेण्यासारखे नसते. सगळं काही इथे मिळतं. मात्र हा विचार मनातच ठेवावा लागतो. उगाच बौद्धिक ऐकण्यापेक्षा आलीया भोगासी असावे सादर असं मनातल्या मनात म्हणत आपण निमूटपणे जायचं.

त्या फुलांच्या गंधकोषी....सांग तू आहेस का?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 08/02/2015 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
काल पासून हे शब्द माझ्या मनाला अनंत यातना देत आहेत. अर्थ मी लावावा,तर अभिप्रेत अर्थ सुटून ..होणार्‍या अनर्थाचे भय. आणि तरिही लावला,तर मूलार्थाचे काय? याची चिंता! मला प्रतीत होणारा असा एक अर्थ आहेच..प्रतिबिंब म्हणून आलेला..! पण मूळ बिंबाचे काय मग??? ते कसे आहे??? तर कविने ते मानले आहे..मानवाच्या अज्ञेयवादाचे बीज असलेल्या परमेश्वरी स्वरूपात..! मानवाच्या अस्तित्वाचा (त्यानीच मानलेला..)काल्पनिक सहभागिदार:- परमेश्वर्,देव ,भगवंत,सखा ,सोबती,निर्मिक..सारे काहि! (मग मी म्हटलं.की आपण आज आधी "हे" पाहू! आणि आपल्या तडफडिचं बीज कशात आहे?

मुंबईत ६ हजार सीसीटीव्ही

लेखक नांदेडीअन यांनी रविवार, 08/02/2015 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी http://www.business-standard.com/article/companies/l-t-to-complete-installation-of-6-000-cctv-cameras-in-mumbai-by-2016-115020700860_1.html
म्हणजे एका CCTV कॅमेर्‍याला (दुरूस्ती, देखभाल) १५ लाख ८३ हजार समथिंग रूपये ! प्रामाणिकपणे सांगतो, माझे गणित खूप कच्चे आहे. :( काही चुकत असेल तर कृपया दुरूस्त करा. खरंच इतके पैसे लागतात का ?

गलित आहे गात्र अजुनी

लेखक चिमिचांगा यांनी शनिवार, 07/02/2015 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर... तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय !

दिल्ली मतमोजणीपूर्व धागा

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 07/02/2015 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच दिल्ली विधानसभेसाठीचे मतदान पार पडले.मतमोजणी १० फेब्रुवारीला होईल.बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजांप्रमाणे आआपला जबरदस्त यश मिळायची शक्यता आहे.एक एक्झिट पोल भाजपला २७ ते ३५ तर आआपला ३१ ते ३९ अशा जागा देत आहे तर अन्य एक एक्झिट पोल भाजपला काठावरचे बहुमत देत आहे.अजून मतमोजणी झालेली नाही तेव्हा प्रत्यक्ष निकाल काहीही लागला तरी दोन्ही परिस्थितीत माझे निकालांनंतरचे मत कसे असेल हे लिहिणे हा या धाग्याचा उद्देश आहे.यापैकी आआप जिंकल्यास माझे मत काय असेल हे या लेखात आणि भाजप जिंकल्यास माझे मत काय असेल हे नंतर प्रतिसादात लिहेन. दोन्ही मला लेखातच लिहायचे होते पण विस्तारभयास्तव ते टाळतो.

खरी कविता..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 07/02/2015 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्या खर्‍या कविता..म्हणुनी शब्द कल्पना सांगत नाही. येतील आज..? पुन्हा? .. का कधिही!(?) अश्या कुठे त्या.. थांबत नाही. बोलावुनी वा हाकारुनी त्या ढुंकुन कधिही पहात नाही. आणि घेतले टाळे लावुनी येणे-असता.. रहात नाही. बासरी ,पुंगी..नाद कसाही निश्चित त्यांचे स्वरूप नाही. किंवा स्वये त्या नाद-घेऊनी येतील..त्याचे अप्रुप नाही. वार्‍या समं ते शब्द वाहती कवेत त्यांना घेता..
काव्यरस