लेखकपिनुरावयांनी गुरुवार, 05/02/2015 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविकता आणि स्विकार या दोन गोष्टींनी परिवर्तनाची सुरूवात होते. ‘परिवर्तन’ म्हणजे ‘बदल’, मग तो आपल्या स्वभावात असो किंवा आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत असो. तुमच्या जीवनात वेळ बदललेली असणे म्हणजेच तुमच्या परिस्थितीत परिवर्तन होणे आणि हे शक्य आहे केवळ या दोन गोष्टींच्या मदतीने.
तुम्ही ज्या ठिकणी उभे आहात त्याच ठिकणी विचार करायला सुरूवात करा, मी काय कारत आहे? कशासाठी करत आहे ? आपल्या सभोवती कशी परिस्थीती आहे. मग ति परिस्थिती आर्थिक असो मानसिक असो नाते संबंधा विषयी असो सामाजिक संबंधाविषयी असो किंवा तुमच्या स्वत:विषयी काही समस्या असो.
लेखकसह्यमित्रयांनी गुरुवार, 05/02/2015 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे जिल्ह्याच्या नैऋत्येला असलेला वेल्हे तालुका दुर्गम म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत छोटी छोटी गावे अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेली आहेत. उंच सखल डोंगर दऱ्या, मुसळधार पाउस, सोसाट्याचा वारा, अभावानेच असणारे गाडी रस्ते, शिक्षण, आरोग्य आदी मुलाभूत सोयींचा अभाव अशा परिस्थितीत येथील गावकरी राहत असतात. भात, वरई , नाचणी हि येथील प्रमुख पिके पण त्यासाठी देखील भरपूर मेहनत आणि निसर्गाची लहर हे घटक आहेतच. परिस्थिती आता बदलत आहे पण अजूनही येथील जीवन खडतर आहेच.
तोरणा ते रायगड ह्या भ्रमंतीत हा भाग अगदी जवळून बघता येतो.
लेखकजेपीयांनी गुरुवार, 05/02/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
सबप्राईम क्रायसीस-
साल होत २००५ साहेब दुसर्यांदा सिएम झाले.पण पुन्हा सिएम होण सोप नव्ह्त.स्पर्धा तिव्र होती,साहजीकच सायबांना भक्कम किमंत मोजावी लागली.साहेब त्याला गुतंवणुक समजुन कशी वसुल करता येईल याचा विचार करु लागले.
थोड्याच काळात एक एक सरकारी कार्यालय गावात येऊ लागत.त्या सोबतच नव्या माणसांची गावात भर पडु लागली.
नव्या लोकांसाठी जागेची मागणी वाढु लागली.गावा तस लहान त्यामुळे फारशी जागा नव्हती.त्यामुळे २००८ येता येता
गाव आडवतिडव पसरु लागल.
साल २००९, २६/११ घडल आणी सायबांच पद गेल.गावात निराशा पसरली.पण साहेब धोरणी होते आणी त्यांची गुंतवणुक अजुन वसुल झाली नव्ह्ती.त्यांनी आणखीन गु
लेखकज्योति अळवणीयांनी गुरुवार, 05/02/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
मन... मनाचे पाखरु
घाले गवसणी नभी
कधी बनुन कोकरु
दूर पळे रानोमाळी
मन विशाल सागर
कुशी घेई नदी नाले
मन सशाच्या दिलाचे
दडू बसे बिळामधे
मन कधी असे वारु
कधी प्रेमाचा सागरु
कधी मर्द त्याला म्हणु
कधी कलिकेचा वेणु
मन पियानोची धुन
मन मुरलिची तान
मन गंभीर आरोह
मन सतारीच गान
मन वेल हसणारी
मन नदी पळणारी
मन पर्वत शिखरी
मन पाताळही ढुंडी
मन... मनाची कविता
प्रत्येकाच्या मनि फुले
त्याच्या सुवासाच्या संगे
जीव प्रत्येकाचा डोले
मन हिशोबी काळाचे
नफा तोटा मोजू पाहे
मन पल्याड काळचे
काळजाला भिडू पाहे
----------------
लेखकनरेंद्र गोळेयांनी गुरुवार, 05/02/2015 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान महोदय, सादर प्रणाम,
(हे पत्र २०१२ साली, तत्कालीन पंतप्रधान श्री.मनमोहनसिंग ह्यांना उद्देशून लिहिलेले असले तरी आजही ते संदर्भहीन झाले आहे असे नाही. वाचून सांगा की, याबाबत आपण काय म्हणता?)
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज पासष्ट वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरी अजूनही, भारतात कर्त्यास त्याचे उचित उत्तरदायित्व सुपूर्त करण्यात आलेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मी हे का म्हणत आहे ते आधी स्पष्ट करतो. भारतातील सर्वात प्रमुख व्यवसाय शेतीचा आहे असे मानले जाते. सरकार नागरिकांकडून कर प्राप्त करून त्याचे बळावर शासन-व्यवहार चालवत असते. थेट कराचा मुख्य हिस्सा प्राप्ती कर समजला जातो.
लेखकबहुगुणीयांनी गुरुवार, 05/02/2015 04:58 या दिवशी प्रकाशित केले.
याआधी मी वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं या टॉम प्रॅक्स्टन-लिखित गाण्याचं रुपांतर केलं होतं. आज आंतर्जालावर भटकतांना त्याचंच आणखी एक गाणं आवडलं.
The Last Thing on my Mind या Tom Paxton लिखित गाण्याचं हे मुक्त रुपांतरः
जाण उशीराने आली
गेली निसटून रेती
राणी दृष्टीआड गेली,
माझा जीव तिच्या हाती
साधा निरोपही नाही
काही ठेवली ना खूण
खोट प्रेमात माझ्याही
कसे कठोर हे मन
तुला माहिती ना राणी
माझ्या मनाची विराणी?
लेखकफिझायांनी गुरुवार, 05/02/2015 04:57 या दिवशी प्रकाशित केले.
दोघी ……( भाग ४ )
भाग ४
दुसऱ्या दिवशी बी एड कॉलेज चा पहिला दिवस छान पडला . आई आणि किरण रात्री जेवत असतानाच फोन वाजला . आता फोन वाजला कि आपसूकच किरण च्या अंगावर काटा यायचा . आता आदित्य चा आणि तिचा रीतसर बघण्याचा प्रोग्राम होईल त्याच संदर्भात फोन असेल असा उगीचच पटकन वाटून जायचं मनात . फोन वाजला तसं आई ने तिला घ्यायला सांगितला .
" हेल्लो …."
" हेल्लो , कोण किरण , मी बाबा बोलत आहे . "
" ओह , बाबा ! कसे आहात ,आणि कधी येणार आहात . कधी संपणारे तुमची अष्टविनायकाची ट्रीप . या लवकर आता . " किरण वेगळ्याच उत्साहात बोलत होती .
लेखकचिमिचांगायांनी बुधवार, 04/02/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले अखिल वैश्विक मराठी चावटसाहित्य संमेलन कालच पुणे येथे संपन्न झाले त्याचा वृत्तांत...
मराठी साहित्यविश्वात संमेलनांची वानवा नाही. नेहमीच्या साध्या साहित्यसंमेलनाबरोबरच कुठे विद्रोही साहित्य संमेलन, कुठे स्त्रीसाहित्य संमेलन, कुठे विद्रोही स्त्रीसाहित्य संमेलन, मुस्लिम साहित्यिक संमेलन, कविसंमेलन, नाट्यसंमेलन, झालंच तर वैदर्भी, कोकणी, खानदेशी अशा प्रादेशिक फ्लेवरची संमेलने, खेरिजकरून विविध साहित्यजत्रा, उरूस, यांचा रतीब सर्वकाळ चालू असतो.