कुमारी मैत्री विश्वास आठवणी
एकदा एका वळणावर जुनी मैत्री भेटली
आठवणी घेउन थांब ना... ऐक ना... हट्ट धरून बसली
ऑफिसची वेळ; नव-याचा डबा...
पोरांची शाळा; boss चा चेहरा..
आठवल क्षणात सार; अन् पाठ केली तिच्याकड़े...
थोड़ी हिरमुसली-थोड़ीशी फुगली...
निघून गेली दुसरीकडे...
जाणवल तिच हिरमुसण फुगण...
पण वेळ नव्हता मला... मनात होत office ला वेळेत पोहोचण
संध्याकाळी परत train च्या डब्यात दिसली..
ओळख दाखवू की नको... या confusion मधे होती;
मी हसले...
मिसळपाव