Skip to main content

माहिती

लेखक आयुष्य यांनी गुरुवार, 05/03/2015 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता फॉन्टफ्रिडम हे एका मराठी देवनागरी फॉन्टमधून दुस-या मराठी देवनागरी फॉन्टमध्ये रुपांतरण करणारे एक उत्तम सॉफ्टवेअर आहे ते इंटरनेट वर फ्रि मध्ये उपलब्ध आहे का? या बाबत माहिती द्यावी. किँवा आपल्यापैकी कोणाकडे असेल तर मला ते सॉफ्टवेअर मिळू शकेल का?

भग्न अवशेष

लेखक कहर यांनी गुरुवार, 05/03/2015 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
जिथे राहिले भग्न अवशेष बाकी वदे कोण त्या राउळाची कथा .. पुजारी म्हणे ओळखीचे पुरावे न ओळखे परी देवतेची व्यथा ... --- कहर .
काव्यरस

वेड तिच्या प्रीतीचे……

लेखक निनाद जोशी यांनी गुरुवार, 05/03/2015 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
आता जरी का त्यागिले तिने मजला भेटणे रोज माझ्या स्वप्नी येते घेऊन सोबत चांदणे बैसतो काठी नदीच्या घेउनि हातात हात पाहतो डोळे भरुनी साठवतो तिजला मनात चाहूल त्या सूर्योदयाची लागते जेव्हा तिला विरुनी जाते दवामध्ये सोडून मजला एकला का कळेना सुर्य का इतक्या सकाळी उगवतो का कळेना मी सुद्धा असा अचानक उठतो पाहतो तिजला मनी अन स्वप्न हि पाहतो तिचे म्हणून वाटे लागले मज वेड तिच्या प्रीतीचे……

जडण-घडण 20

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 05/03/2015 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
बघण्या-दाखवण्याचे कार्यक्रम उत्साहात सुरू होते. या बाबतीत माझ्या आई-बाबांच्या बरोबरीने इतर नातेवाईकांचा उत्साह बघून मला मौज वाटत होती. मी या बाबतीत तटस्थ राहायचं ठरवलं होतं, त्यामुळे नव्या कामाकडे लक्ष केंद्रित करता येत होतं. नव्या माध्यमात मी रूळू लागले होते. आमच्या संचालक बंगाली बाई, भरपूर उत्साही आणि प्रयोगशील. सतत नाविन्याच्या शोधात. त्यांचं मराठी बोलणं, हा आणखी एक गमतीचा भाग. त्यांच्या बोलण्यात केवळ नपुंसक लिंगाच्या अनुषंगाने उल्लेख यायचे. ते कामत, ते कागद, ते पंखा, ते टिव्ही, ते मधुरा आणि ते स्टोरी. असं बरंच काही.

नुग्गेहळ्ळी

लेखक पॉइंट ब्लँक यांनी गुरुवार, 05/03/2015 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
होयसाळा राज्यघरण्याने दहाव्या ते चौदाव्या शतकापर्यंत दक्षिण भारतात राज्य केले. त्यांनी जवळपास दोनशे मंदिरे बांधली. त्यातील हळेबेद बेलूरची मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. पण इतर बरीच मंदिरे दुर्लीक्षीत आहेत किंवा मोडकळीला आलेली आहेत. नुग्गेहळ्ळी हे हसन जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. श्रवनबेळगोळा पासून अवघ्या २६ किलोमीटर असूनहि प्रवाश्यांपासून लपून राहिले आहे. ह्या गावात तेराव्या शतकातील दोन सुंदर मंदिरे आहेत - लक्ष्मी नरसिंह आणि सदाशिव .

फोटो ओळखा.

लेखक खंडेराव यांनी गुरुवार, 05/03/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल. उदाहरणार्थ -

Home Loan Balance Transfer विषयी काही प्रश्न आहेत

लेखक jaydip.kulkarni यांनी गुरुवार, 05/03/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
Home Loan Balance Transfer विषयी काही प्रश्न आहेत कर्ज घेवून १८ महिने झालेत , एकूण मुदत २४० महिन्यांची आहे , व्याज दर कमी होण्या साठी हा विचार सुरु आहे १) Balance Transfer साधारण मार्च महिन्यात करणे योग्य होईल का , का नवीन आर्थिक वर्षासाठी वाट पहावी. २) Balance ट्रान्स्फर नंतर माझा मासिक हप्ता barypaiki कमी होतोय ( सध्याचा interest rate : 10.75 एक्सिस बँक ,तर SBI कडून मिळणारा १०.१५ ) पण ह्यात काही छुपे खर्च आहेत का . ३) pre-payment charges RBI ने बंद केले होते असे कळले , तरी काही बँका घेतात म्हणे तर ह्या विषयी कुठून योग्य माहिती मिळू शकेल.

धुळवड

लेखक bharatm यांनी गुरुवार, 05/03/2015 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशचतुर्थी प्रमाणेच कोकणातील आणखी एक मोठा आणि जल्लोषात साजरा होणारा सण म्हणजे 'होळी'. थंडीचे दिवस संपत आल्यावर कोकणी माणसाला शिमग्याची ओढ लागते. 'होळी' या शहरी शब्दापेक्षा 'शिमगा' हा शब्दच कोकणच्या मातीला जुळून जातो. एकंदरीत कोकणापेक्षा तळकोकणातील शिमग्याची प्रथा थोडीशी वेगळी आहे. फाल्गुन पोर्णिमेपासून चालू होणारा हा सण तळकोकणामध्ये साधारणता ५, ७ किंवा ९ दिवस चालतो. पोर्णिमे दिवशी घरोघरी गोड जेवण बनवले जाते. पुरण पोळ्या किंवा शिरवाळे आणि गोड रस हे जेवणाचे पदार्थ असतात. म्हणूनच त्याला 'होळी रे होळी पुरणाची पोळी' असेही म्हटले जाते. शहरामध्ये रंगपंचमी असते तर कोकणातल्या लोकांची 'धुळवड' असते.

सावल्यांनी पोळलो आहे इथे मी ...

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 05/03/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
खोल मी आहे किती पाहून घेतो मी जरा माझ्यामध्ये डुंबून घेतो सावल्यांनी पोळलो आहे कधी मी ऊनही आता जरा फुंकून घेतो बेगडी आहे तुझी दुनियाच सारी मी अता रानीवनी भटकून घेतो मी उद्या होईनही काफर कदाचित ये, तुला थोडी फुले वाहून घेतो तू किती भिनलीस माझ्या आत राणी- ये, तुझ्या नजरेमध्ये पाहून घेतो डॉ.सुनील अहिरराव