Skip to main content

तपकिरी डोळे

लेखक म्हया बिलंदर यांनी मंगळवार, 03/03/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
"काय रे? काय करतोस ईथे?" एका रांगड्या आवाजाने विचारले. मी हबकलो, घाबरलो. काहीतरी बोलायचं म्हणून, "म्म..म..मी.." "अरे तू इथे कसा? काही शोधतोयस का? बाबा हा माझ्याच वर्गातला आहे." रांगडा आवाज "हूं " म्हणून नाहीसा झाला. हलके कुरळे केस सावरीत तिने पुन्हा विचारले, "काही शोधत होतास का?" माझ्या तोंडून चटकन निघालं "तूलाच" ती थोडी आश्चर्याने "काय?" "अं.. तूलाच सपना तायडेने ईंग्लीशच्या नोट्स दिल्यात ना! त्या हव्या होत्या" मी कसा बसा हे सगळं बोललो असेन. ती "हो दिल्यात. हव्या आहेत का?" मि "हो." ती "ये ना. ईथेच घर आहे." मि एक पाऊल टाकून दचकलो आणि "न्न.. नको." म्हणालो.

माझी काझिरन्गा सफर

लेखक खंडेराव यांनी मंगळवार, 03/03/2015 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिसळपाव वरिल हा पहिलाच लेख. अजुन मराठी लिहिणे शिकत आहे, चुकिन्बद्दल माफी असावी. आसाम मधे एकटाच काही कामासाठी पोहोचलो. एक दिवस रविवारची सुट्टी मिळाली. स्थानिक मित्राने काझिरन्गा पहान्याचा सल्ला दिला. तसा मी आपखुश असल्यामुळे एकटाच जाण्याचा निर्णय घेतला. गुवाहाटी ते काझिरन्गा अन्तर जवळ जवळ २०० किमी. रस्ता अगदी चान्गला, बराचसा मुबई पुणे सारखा आहे. बसेस सतत चालू असतात. ४ तासात कोहरा येथे पहोचलो, जे अभयारन्याचे प्रमुख दार आहे. रस्त्यावर खुप सारी होटेल्स व गेस्ट होउसेस आहेत. एकटाच असल्यामुळे जे पहिले दिसले तिथे ९०० रुप्यात खोली घेतली. घोडचुक झाली. रात्रभर गाड्याचे आवाज.

माझ्याबद्दल थोडक्यात

लेखक सुचिकांत यांनी मंगळवार, 03/03/2015 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, हिंदूंच्या तर नाहीच नाही! पण आपला तो बाळासाहेब आणि दुसऱ्याच कार्टं या मानसिकतेच्या विरोधात आहे. मी सर्व धर्मांच्या ठेकेदारांच्या विरोधात आहे. मी अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. मी whatsapp आणि facebook वर अफवा आणि चुकीचे संदेश पसरवणार्यांच्या विरोधात आहे. माझे स्वातंत्र्योत्तर भारतावर काडीचे सुधा प्रेम नाही, परंतु स्वातंत्र्यपूर्व भारतावर मी मनापासून प्रेम करतो. त्या काळात जन्म झाला असता तर नक्कीच देशासाठी फासावर गेलो असतो.

हनुमान सुळका (नंदीची धार) - अंजनेरी डोंगररांग, त्र्यंबकेश्वर, नाशिक

लेखक सतीश कुडतरकर यांनी मंगळवार, 03/03/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
हनुमान सुळका (नंदीची धार) - अंजनेरी डोंगररांग, त्र्यंबकेश्वर, नाशिक व्हीडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=rzYdHKPjrCo ---------------------------------------------------------------------------------------- ''अरे सत्या, XXXX किती वर्षानंतर भेटतोयस''! डोंबिवलीतील 'सखाराम हैबती जोंधळे' हे कॉलेज (या नावाची सुद्धा कॉलेजेस असतात) सोडल्यानंतर तब्बल १५ वर्षांनी भेटल्यावर प्रदीपने अशी प्रेमळ 'भकाराने' माझी विचारपूस केली.

शेअरबाजार ; फक्त 'सुवर्ण'संधीची वाट पहाण्यापेक्षा नेहमीच्या 'संधी' साधणे महत्वाचे.

लेखक प्रसाद भागवत यांनी मंगळवार, 03/03/2015 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र नेहमीच विना कटकटीच्या,धोका नसलेल्या आणि फायद्याची शक्यता असलेल्या संधींच्या शोधांत असतो.असलेल्या नसलेल्या सर्व धोक्यांची 'काळजी' करण्याच्या त्याच्या सवयामुळे मी त्याला 'काळजीवाहु' हा दर्जा बहाल केला आहे. बजेटच्या संदर्भात मी त्याला 'ह्मखास फायद्याची' एक आयडिया सांगितली. शुक्रवारी दुपारी मी त्याच्याकडुन 'IDBI Nifty Index Fund' मध्ये गुंतवण्यासाठी २ लाखाचा चेक मागितल्याबरोबर अपेक्षेप्रमाणेच त्याचे "अरे नको रे, मी नाही बाबा अशी रिस्क घेणार....' सुरु झाले. "हे बघ, खास तुझ्यासाठी ही आयडिया आहे.

दुलई.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/03/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
परवा दोशी फाऊंडेशनच्या नाट्यमहोत्सवाला जाण्याचा योग आला. त्यात शेवटच्या दिवशी नासिरुद्दीन शाह, रत्ना शाह व हिबा शहा यांनी सादर केलेल्या इस्मत चुगताईंच्या कथाकथनाचा कायम लक्षात राहील असा कार्यक्रम झाला. या तिघांनी त्या कथा त्यांच्या अभिनयाची जोड देऊन इतक्या बहारदारपणे सादर केल्या की बस ! अर्थात नासिरुद्दीन शाहच्या दिग्दर्शनाचा त्यात मोठा वाटा होता हे नाकारण्यात अर्थ नाही. पण सगळ्यात मोठा वाटा होता त्या कथांचाच. आता खाली मी इस्मतआपाची एक कथा मराठीत अनुवाद करणार आहे ती त्यांनी १९४२ साली लिहिली. बाई मोठ्या हिंमतवान, समाजावर ढोंगीपणासाठी हलक्या फुलक्या विनोदाने टीकेचे आसूड ओढत.

आम आदमी पक्षातील दुही......

लेखक निनाद जोशी यांनी मंगळवार, 03/03/2015 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
आम आदमी पक्ष एक फार मोठा विजय मिळवून दिल्लीच्या गादीवर बसला. श्रीयुत केजरीवाल हे गाजावाजा करत मुख्यमंत्री झाले. परंतु लगेचच ह्या पक्षाला ग्रहण लागेल असे वाटू लागले आहे. पक्षाचे मुख्य रणनीतीकार समजले जाणारे योगेंद्र यादव आणि उच्चशिक्षित, यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे असलेले प्रशांत भूषण ह्यांना पक्षातून काढले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास आप मध्ये मोठी फुट पडण्याचा संभव आहे. असे घडल्यास आप दिल्ली नीट सांभाळू शकेल असे वाटते का??? का पुन्हा मागील प्रसंगाप्रमाणे केजारीवालांना मुख्यमंत्री पद सोडावे लागेल.

कॅपिटल गेन- काथ्याकुटातून माहिती हवी.

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 03/03/2015 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझा फ्लॅट विकण्याच्या बेतात आहे. तो मी १९८८ मधे एक लाख ५ हजाराला घेतला. त्यांची इंडेक्सेशन प्रमाणे आता किंमत साधारण ७ लाख होते आहे. पण तो २४ लाखाला विकला जात आहे. म्हण्जे मला २४ वजा ७ बरोबर १७ लाख रूपये ३ वर्षासाठी ६ टक्के दराने बॉन्ड मधे गुंतवावे लागतील तर माझा २० टक्के कॅपिटल गेन टॅक्स वाचेल. आता माझा प्रश्न असा की... अ) जर मी काही सुधारणा या जागेत केली असेल तर त्याच्या सुधारणा खर्चाची इन्डेक्स कॉस्ट मी ७ लाखात भर टाकून १७ लाखास समजा १५ लाखापर्यंत खाली आणू इच्छित असेन तर ही किंमत कोण ठरवणार?. माझ्या माहिती प्रमाणे ही किमतीचे सर्टीफिकेशन सी ए देतात पण ते चूक आहे.

विज्ञान कथा: "शापित श्वास!"

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 03/03/2015 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वीवरचा निसर्ग-बिंदू वेगाने आकाशात चालला होता. तो काळोख्या अनंत आकाशात एका अज्ञात ठिकाणी खूप दूरवर पोहोचल्यावर त्यापासून पाच बिंदू वेगळे झाले- पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी आणि आकाश! ही पंचमहाभूते एका महत्त्वाच्या चर्चेसाठी आणि निर्णय घेण्यासाठी एकत्र आले होते. ते पाचही बिंदू तरंगत होते. अग्नी ने हसतच बोलायला सुरुवात केली, म्हणाला, "कमाल आहे माणसांची! पृथ्वी च्या अंताबद्दल त्यांनी चित्रपट बनवून देखील टाकला. २०१२. पण ते वर्ष उलटून गेले आणि त्याप्रमाणे झालेच नाही. बिचारी माणसे, त्यांना वाटत आहे की विज्ञानामुळे आपण निसर्गावर सुद्धा मात केली आणि निसर्ग आपला अंत कसा करेल हे सुद्धा आपण ठरवू.

थ्रील.....!!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 02/03/2015 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी काही काही आठवणी आपला कधीच पिच्छा सोडत नाहीत. अगदी सावलीसारख्या आपल्याशी जोडल्या गेल्या असतात. अशीच एक आठवण माझ्याही आठवणीत आहे. जी आजही मला रात्रीची झोपू देत नाही. आजही ती रात्र माझ्यासमोर अगदी जशीच्या तशी उभी आहे. आजही तो झाला प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. माझ नाव अमोल परब. गोष्ट तशी साधारण दहा बारा वर्षापूर्वीची. मी नुकताच बी.ई. पास आऊट झालो होतो. ते ही फर्स्ट क्लास विथ डिक्टिंशन. भरीसभर म्हणून मुंबई युनिर्व्हसिटीमधुन तिसराही आलो होतो. घरच्यांच्या आणि खासकरून बाबांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते फार खुश झाले होते.