हनी केक - मसाला मारके (Gewürzter Honig Kuchen)
बेकिंग आणि केक्सच्या पाककृतींचे एक पुस्तक बरेच दिवसांपासून कपाटात आहे असा साक्षात्कार शनिवारी रात्री अचानक झाला. मग बघुयात काही करता येतंय का म्हणून चाळायला सुरुवात केली आणि Gewürzter Honig Kuchen (Honey Cake) ची पाकृ वाचताना लक्षात आले की बहुतांशी सगळे साहित्य हे आपल्या भारतीय स्वयंपाकातील मुलभूत मसाले दिसताहेत. शिवाय करायला सोपी कृती. मग लगेच रविवारी हा प्रयोग करायचा हे पक्के झाले. त्यात काही बदल करता येतील का यावर विचार करून सकाळी सकाळी तयारीला सुरुवात केली. आता प्रयोग आहे, तोही बेकिंगचा म्हणजे तो अपयशी होण्याची शक्यता नाकारणे हे अतीच झाले.
मिसळपाव