नेहमी प्रमाणे लोकलचे धक्के खाउन स्टेशनवर उतरलो आणि हुश्श केले. बुधवार असल्यामुळे अजून दोन फक्त दोन दिवस रेटायचे आहेत त्यातच बॉस नामक प्राणी दोन दिवस गायब असणार आहे ह्या सुखद कल्पनेमध्ये डुलत डुलत घरी आलो. घरी येताना आजूबाजूचा परिसर थोडा वेगळा वाटला खूप काहीतरी मिसिंग असल्यासारखे वाटले नंतर लक्षात आले. वीज नामक गोष्ट जी नित्यानेमाने सगळ्या घरात आपली उपस्थिती लावत असते ती गायब आहे( हाय मेरी फुटी किस्मत !) आता मेणबत्ती शोधण्यापासून सुरुवात करावी लागणार ह्याची मानसिक तयारी केली. पण म. रा . वि. म. मं. ने एक सुखद धक्का दिला घरी पोचायच्या आत वीज आली(?). चला सुटलो म्हणत घरी पोचलो …. दाराला अडकवलेले विजेचे बिल मिळालं आणि दुसरा धक्का बसला. रु. ५७००/- फक्त. चुकून एक शून्य जास्त वाचले असावे अशी स्वतःची समजूत काढत मी ते बिल परत वाचले अगदी एकम दशम शतम सहत्र करत पण बिल जैसे थे होते तेव्हा खात्री पटली. खरच एवढे (??) बिल आले आहे.
आता पुढचा प्रश्न होता की बिल पडताळून पाहणे. जरा फ्रेश होऊन चहा घेतला म्हणजे डोक्याला तरतरी आली. मग सगळी मागची बिलं काढून चेक केली. सगळी सरासरी बघत एवढे बिल एका महिन्याचे येणे शक्य नव्हते. म्हणून लगेच म.रा.वि.म.मं. च्या ऑफीस मध्ये फोन लावला पलीकडून उत्तर आले नाही साहजिक आहे दिवस ढवळ्या वाजणारा फोन जिथे कोणी उचलत नाही तिथे ७.३० ला रात्री केलेला फोन कोण उचलणार ?? तो फोन ही बिचारा सामान्य माणसासारखा बोंबलून बोंबलून गप्प बसला.
नेहमी प्रमाणे दुसरा दिवस उजाडला ऑफीसमध्ये पोचल्या पोचल्या म. रा. वि. म. मं. च्या ऑफीस मध्ये फोन लावला सगळी साठा उत्तराची कहाणी वाचली आणि उत्तराची अपेक्षित वाट बघताना समोरून हॅलो…हॅलो… काहीही ऐकू येत नाहीये असे म्हणणारा आवाज मला मात्र स्पष्ट ऎकु आला. परत वरील गोष्टी न चिडता, अति शांतपणे करून पाहिल्या, झाला तर आपल्याच फायदा ना !! पण म. रा . वि. म. मं. च्या कर्मचार्यांना ते मान्य नव्हते तर.. आता म. रा.वि. म. मं. च्या ऑफीस वर स्वारी करण्यापलीकडे काही मार्ग शिल्लक नव्हता. मिशन होते म.रा.वि.म.मं. चे ऑफीस... लगेच उद्याच्या रजेचा अर्ज खरडला.
दुसरे दिवशी सकाळी १० वाजता म. रा. वि. म. मं. च्या ऑफीस मध्ये पोचलो. बरीचशी मंडळी यायला अजून अवकाश होता असे समजले. तेवढ्यात वेळेचा सदुपयोग करत अमृतपान (चहापान उगाच नसते अर्थ काढायला नको म्हणून हा खुलासा) करून आलो. तोपर्यंत १०.३० झाले होते. म.रा.वि.म.मं.चा कर्मचारीगण मुंगीच्या पावलाने ऑफिस मध्ये शिरत होत(घरीं जाताना मात्र सगळे सश्याला ही लाजवतात हो). चौकशीच्या खिडकीमध्ये डोकावून माझी राम कहाणी सांगितली. त्या बाईनी "अजून वर्मा साहेब आले नाहीयेत हो…!!" असे त्रासिक आवाज कपाळावर जमेल तेवढ्या आठ्या चढवून काढला . मी ही बर म्हणत बाजूला जाऊन बसालो. एव्हाना ११. ३० होत आले तरी साहेबाचा पत्ता नव्हता. मग हळूच सरकारी सुरक्षा रक्षकाला विचारले त्यावर त्याने छान स्माईल दिले आणि म्हणाला "वर्मा साहेब आलेत तळमजल्याला हायेत जावा तिथं" तळमजला अलीबाबाच्या गुहेसारखच होता त्यात वर्मा नावाचे वेगवेगळ्या डीपार्टमेन्टचे ३ साहेब होते. आपले तारणहार शोधण्यास अर्धातास खर्ची घालावा लागला. तो पर्यंत घड्याळात १२ वाजून गेले होते. सध्याचे बिल मागचे बिल एकूण घरातील विजेची उपकरणे ह्याचा तपशीलवार अभ्यास केला आणि म्हणाले वरच्या मजल्यावर दत्ता क्लार्कना भेटा आणि प्रोब्लेम सांगा. मग परत आमची स्वारी पहिल्या मजल्यावर आली तिथे "दत्ता क्लार्क कुठे बसतात?" असे विचारले त्यावर "ह्याच ऑफिसमध्ये" असे सुंदर उत्त्तर आले. मग मात्र संयम सुटला आणि परत हीच गोष्ट थोडी आवाज चढवून विचारली आणि मात्रा लागू पडली आणि बरोबर उत्तर आले. मग दत्ता क्लार्कचा मिळालेला पत्ता शोधत तिथे पोचलो माझ्या आधीच बरेच जण दत्ता साहेब कामाला कधी सुरुवात करणार ह्याची वाट बघत होते. फायनली माझा नम्बर आला सगळी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार केल्यावर "तुमचे रीडिंग ह्या महिन्यात जास्त कसं पडलं हो?" असे मलाच विचारले. ह्यापुढे मी खरचं स्पीचलेस झालो. तरी आपले म्हंटले," म्हणूनच साहेब सुट्टी टाकून सकाळपासून आज इथं थांबलोय नं " त्यावर साहेब," बरं बरं… मीटर चेक करावं लागेल तसं ते बिल कमी व्हायचं नाई . १५०/- रु भरा तिथं म्हणजे माणसं येतीलं अन मीटर चेक करतील मग बघू नं बिलाचे काय करता येईल ते" "म्हणजे! मला आधी बिल भरावे लागेल?" इति मी. " हो नं मग मी काय सांगून राहिलो तुम्हाले " असे म्हणून तो माणूस उठला आणि लंच टाईम झाला म्हणून चालता पण झाला. आता मात्र डोक गरगरायला लागले होते. सगळे बजेट कोलमडणार होते पण आपण पैसे का भरायचे हाच एकच प्रश्न मनात येत होता. सध्या तरी सगळे ऐकण्य़ा शिवाय पर्याय नव्हता. मग मीही खाली जाऊन पोटात काहीतरी ढकलून आलो. लंचटाईम संपल्यावर रु १५०/- पण भरले. त्याची रीतसर पावती घेतली
तासभरानंतर दत्ता साहेब उगवले परत समोर मला बघून इकडे तिकडे वेळ काढायला लागले शेवटी निर्लज्जासारखी मीच हाक मारली आणि "आता ह्याचे पुढे काय करू ?" असा सवाल केला. माझ्याकडे न बघता माझ्या हातातले बिल हिसकउन घेतले मीटर रीडिंग च्या ठिकाणी faulty असे लिहून ४३१ असा आकडा टाकला आणि म्हणाले जा आता वर्मा साहेबाना दाखवा. माझी वरात परत वर्मा साहेब शोधत हिंडायला लागली. एव्हाना पहिल्या मजल्यावर सगळ्यांना माझ्या प्रोब्लेम ठाऊक झाला होता त्यामुळे प्रत्येकजण मला वेगवेगळे सल्ले देत होता. ह्यावेळेस मला वर्मा साहेब दुसऱ्या मजल्यावर सापडले. म्हंटले सुटलो बुआ आता काही तरी सोक्षमोक्ष लागेल पण कसलं काय नि कसलं काय? त्यांनी फक्त पहिले आणि average रीडिंग आण म्हणाले आणि परत मला दत्ता बुआंकडे पिटाळले. परत तोच मख्ख चेहऱ्याने दत्ता साहेब बोलते झाले, " आधी सांगायचे नां average रीडिंग हवाय म्हणून.." मी म्हणालो "मला माहित नाही कोणी काही विचारले तर सांगत सांगत नाही आणि सांगितले तर ऐकत नाही ह्यावर मी काय करावे असे तुम्हाला वाटते?" मग त्याला माझी थोडी(च ?) दया आली आणि म्हणाला, "वर्मा साहेबाच्या हातात काही नाही हो…. आता हे त्यांना नेउन दाखवा आणि फक्त सही घ्या मग हे बिल राठोड साहेबाना दाखवा आणि बिलात सुट मिळते का ते बघा. तेच काय ते करू शकतात" दत्ता बुआंना मनापासून धन्यवाद देऊन वर्मा साहेबांची सही घेऊन राठोड नामक प्राण्याला शोधायला निघालो.
साहेबांची केबिन अगदी पटकन सापडली पण… ह्या पण ने परत घोळ घातला. साहेबच जागेवर नव्हता. परत वाट पाहणे नशिबात आले. जवळ जवळ तासाभाराने साहेब आले लाईनमनला अपघात झाल्यामुळे बाहेर जावे लागले असे आम्हास उद्देशून म्हणाले. (किती सुदैवी जीव होतो आम्ही तेव्हा तो साहेब आम्हाला स्पष्टीकरण देत होता) सुदैवाने त्या रांगेत मी प्रथम असल्यामुळे लगेच मी आत गेलो आणि पुन्हा एकदा आपली रामकहाणी सांगितली. बिल निट तपासून झाल्यावर मीटर चेकिंगचे पैसे भरले का विचारले आणि परत एकदा दत्ता क्लार्कला पाचारण करण्यात आले. (ह्यावेळी मात्र दत्ता साहेब किती फास्ट चालू शकतात आणि किती शांतपणे गोड बोलू शकतात हे मला समजले) १० मिनिटे कामासाठी खल, १० मिनिटे अवांतर चौकशी आणि बरीचशी आकडेमोड केल्यावर रु २३६०/- भरा असे सांगितले आणि वर मीटर चेक केले कि बघू काय करायचे ते असा शेरा आला.
सध्या तरी मी ते बिल ठेऊन दिले आहे कारण अजून माझ्याकडे काही दिवसांचा अवधी आहे पण ज्यांचे हातावर पोट आहे त्यांनी काय करावे? ज्यांची दर महिन्याला हातातोंडाशी गाठ पडते त्यांनी काय करावे? अशा वेळी सरकारी नियंत्रणा किती आणि कशी कुचकामी ठरत आहे हे दिसून येते. मीटर सदोष आहे हे कळण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो. सरकारी बाबू कसे वेळ काढतात आणि त्यामुळे रेंगाळणारी सरकारी कामे ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
ता. क. = मिपावर लेखनाचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे कच्चा लिंबू समजून आउट झाल्यास राज्य घ्यायला लावू नये
वाचने
11135
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)) आवडले
छान अनुभव कथन ,
सेम प्रॅाब्लेम मला जुलै २०१४
व्वा, फारच छान अनुभव ! असे
In reply to सेम प्रॅाब्लेम मला जुलै २०१४ by कंजूस
+१
In reply to व्वा, फारच छान अनुभव ! असे by चौथा कोनाडा
चौ.को.साहेब,
In reply to व्वा, फारच छान अनुभव ! असे by चौथा कोनाडा
पहील्याच प्रयत्नात चांगले
एम ए सी बी वाले वाय झेड असतात साले.
छान अनुभव कथन ...
अतिशय छान आणि मुद्देसूद लिखाण
हे सगळे रामायण केलेय आम्हीही.
छान लिहिलेय. डोळ्यापुढे
मिपावर स्वागत!
मराविम चा एक अतिशय बेकारा
माझ्या आईला मागच्या महिन्यात ५५०० बिल आले.
बिल जास्त
रोचक अनुभवकथन!पुढे काय झाले?
हे कधीचे आहे
बरोबर.
In reply to हे कधीचे आहे by श्रीरंग_जोशी
छान लिहिताय शि बि आय. लिहिते
पहील्या प्रयत्नात चांगले
विलेक्ट्रिसिटीवाले घरा येती …. तेचि दिवाळे वाजविती !!
mseb चे विभाजन झाल्यापासुन
हा असाच त्रास अनुभवला हाय !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeelतो फोन ही बिचारा सामान्य
महावितरणच्या ऑफिसबाहेर सध्या
अजुन राहिलाच गेलो नव्हतो आणि
धन्यवाद मंडळी !
मला वाटते....
In reply to धन्यवाद मंडळी ! by शि बि आय
माझे घडलेले उदाहरण चर्चेसाठीच
लेख वाचला , पन "शि बी आय "
जयन्तराव....
In reply to लेख वाचला , पन "शि बी आय " by जयन्त बा शिम्पि
माझा अनुभव
लेख वाचला , पन "शि बी आय "
बाबा पाटील, माझ्या ' मुर्दाड