रयतेचा राजा
लेखनविषय:
एके दिवशी सहजपणे ओळी सुचत गेल्या आणि त्या मी लिहून काढल्या. काही सुधारणा असतील तर अवश्य सांगा! :)
रयतेचा राजा
हाती घेऊन तलवार अंगी लेऊन तो शेला,
मातीतला वीर रणी लढाया चालीला…
नको आहे त्यास मान अन सेवक चाकरीला,
मायभूमीस ताराया तो जिद्दीने पेटला…
शत्रू आहे मोठा द्वाड अन उत-मातलेला,
जोडीस तयाच्या मोठे लष्कर सेवेला…
कोणी म्हणे त्यास काळ, कोणी दैत्य माजलेला,
घोड्यावर बसून जणू यमच आलेला…
पण काळ्या मातीच्या वीराला नसे फिकीर कोणाची,
ना दैत्य-दानवाची ना आलेल्या यमाची…
करुनी गर्जना दिली घोड्यासी त्या टाच,
अन शत्रूच्या दिशेने तो त्वेषाने चालीला…
होते सैन्य थोडेफार अन सह्याद्री जोडीला,
कडे-कपार्यान्मधून यांनी गाठीले शत्रूला…
शत्रू होता बेसावध त्यास लगेच घेरला,
गाजवुनी पराक्रम त्यास पुरता मारिला…
होते हात जोडलेले अन चेहरा पडला,
शत्रू सेनापती आता शरण तो आला…
फुकाचा अहंकार अन सत्तेने माजला,
रयतेच्या राजापुढे नतमस्तक जाहला!
आशिष
वाचने
1531
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
७४ वाचने आणि एकही प्रतिक्रिया
छान लिहिलंय.
खूप छान कविता.
धन्यवाद!
छान लिहिलंय. आवडलं.
सर्वांचे आभार! _/\_