Skip to main content

एक संवाद - २

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 19/03/2015 23:53 या दिवशी प्रकाशित केले.

एक संवाद - 1

ती - काय रे ? कुठे होतास इतका वेळ ? ऑन लाईन दिसत नव्हतास…
तो - उशीरा आलो आज.
ती - ओके, काय विशेष? उशीर का झाला?
तो - आता तूपण बायको सारखे प्रश्न विचारायला लागलीस
ती - नाही सांगायचं तर नको सांगूस.
तो - अरे लाँग ड्राईव ला गेलो होतो ना.
ती - ओह्ह.
तो - तुला बोलावलं होतं, नाही आलीस.
ती - कुठे गेला होतास
तो - असं काही ठरवून नव्हतो गेलो
ती - म्हणजे ?
तो - नाशिकरोड ला चालवत राहिलो
ती - ओके, आणि मग
तो - एक रिपोर्ट बनवतो आणि देतो तुला मग वाचत बस. चालेल?
ती - लगेच वैतागलास
तो - मग बोलावले तर आली नाहीस आणि आता सतरा प्रश्न
ती - ओके, एन्जोय केलंस ना मग झालं
तो - मी एन्जोय केलं की नाही हे तुला काय माहित
ती - मला माहीत आहे रे एकट्याला मजा नाही येत.
तो - मी एकटा होतो असं म्हणालो मी ?
ती - "……………."
तो - मला मजा आली
ती - कोण होतं बरोबर?
तो - होतं कोण तरी
ती - सांग ना आता
तो - का तू नाही बोललीस तर कोणीच येणार नाही का माझ्याबरोबर ?
ती - असं मी कधी बोलले ? तुझी मर्जी तू कोणालाही घेऊन जाऊ शकतोस. मला काय फरक पडतोय?
तो - नाही ना फरक पडत ? मग कशाला विचारतेस ?
ती - ओके राहुदे. काय काय केलंत तिकडे ?
तो - थांबलो एका हॉटेल मध्ये
ती - काय ?
तो - हो
ती - आणि मग ?
तो - मग काय , दारू प्यायलो आणि आलो परत….
ती - म्हणजे ती पण दारू प्यायली???. म्हणजे जी कोण होती ती….
तो - ती म्हणजे. तुला कोण बोललं की "ती" होती ?
ती - मग ?
तो - माझा मित्र होता सोसायटीमधला
ती - ओह्हा. हा हा हा हा
तो - दात काढायला काय झालं
ती - काही नाही. करा एन्जोय करा.
तो - केलंच एन्जोय.
ती - काय रे पण ? कोण होता बरोबर ?
तो - तुझा नवरा
ती - "……???????"
तो - काय ग ?
ती - एक मिनिट. मी तुला नंतर पिंग करते. मला एक फोन करायचाय
तो - कोणाला ?

क्रमश:

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3797
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

संवाद की विसंवाद असा प्रश्न हा भाग वाचून पडलाय :-) . कदाचित पुढील भागात याचे उत्तर मिळेल.


कश्यात काय
आणि
फाटक्यात पाय!!

पण एक मात्र नक्की, दोघेही जे आहे त्यात खुष नाहीत.


In reply to by स्पंदना

+१

असेच म्हणतो.

फक्त दोघेही ऐवजी चौघेही ! :(


म्हणजे हे दोघे शेजारी सुद्धा आहेत आणि सहकारी सुद्धा? ह्म्म्म.


In reply to by प्रसाद१९७१

मलाही असंच वाटतंय. नवरा-बायको असणे किंवा बहिण-भाऊ असणे असा पांचट ट्विस्ट टाकला तर बघा हं खटपट्याभौ!